महाराष्ट्रातील वने

Maharashtratil Vane

महाराष्ट्रातील वने Maharashtratil Vane

नैसर्गिकरित्या वाढलेली वने ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. Maharashtratil Vane पर्यावरणाच्या दृष्टीने वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.वनामुळे पुराचे नियंत्रण,मृदेची धूप कमी होते ,हवा स्वच्छ राहण्यास मदत होऊन ,प्रदूषणास आळा बसतो, तसेच पर्यटनात वाढ होते.

वनाचे महत्त्व Maharashtratil Vane

वनापासून अनेक प्रकारच्या वस्तू मानवाला प्राप्त होतात. विविध प्रकारचे उद्योग वनावर आधारित आहेत.वनात राहणारे आदिवासी लोकांचे जीवन वनावरच आधारित असते.आदिवासी विविध प्रकारचे व्यवसाय करून वनाच्या आधारे आपले जीवन जगत असतात.

वनावर परिणाम करणारे घटक

विविध भागातील वनांची वाढ ही वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते. वनाच्या वाढीवर परिणाम करणारे घटक खालील प्रमाणे आहेत.

  • सूर्यप्रकाश 
  • जमीन किंवा भूरचना 
  • हवामान 
  • पाण्याची उपलब्धता

वरील चार घटकावर वनांची वाढ अवलंबून असते.वरील घटक महाराष्ट्राच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात वनाच्या वाढीवर परिणाम करत असतात म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागात वनांची भिन्नता आढळते.

वनांचे प्रकार Maharashtratil Vane

सदाहरित वनेबाराही महिने हिरवी,3000
मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस
पडतो त्या भागात ही वने वाढतात.
सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात आढळतात.नाग,चंपा,जांभूळ,
फणस,तेल्या ताड,बांबू,आंबा,
पिसा,अंजन,हिरडा यासारखे वृक्ष
निम सदाहरित वने1000 ते 3000 मिलिमीटर पर्जन्यवृष्टी
होते त्या भागात ही वने आढळतात.
सह्याद्री पर्वताच्या पूर्व आणि पश्चिम पायथ्याशी,ऐन,किंजळ,
फणस,ऐन,
कदंब,वावली,बिबळा,
शिसव,बांबू,शेवरी यासारखी वृक्ष
पानझडी वने/मोसमी वने600 ते 1000 मिलिमीटर पाऊस,नावाप्रमाणेच या
वनातील वृक्षांची पानझड होते.कोकणातील काही भाग,
सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश,सातपुडा
पर्वताचा प्रदेश,महाराष्ट्र पठारावरील डोंगररांगा आणि राज्याच्या पूर्व भाग,साग,हिरडा,वड,
पळस,सालई,
मोह,तीवस,साल,
हिरडा,धावडा,तेंदू,पळस,
आवळा
झुडपी व काटेरी वने600 मिलिमीटर पेक्षा कमी
पावसाच्या प्रदेश,झाडांची पाने आकाराने अतिशय लहान,वनस्पतीमधील
पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये
यासाठी निसर्गाने केलेली ही योजना.
झाडांना मुख्यतः काटे
पर्जन्यछायेच्या प्रदेश,पुणे,
अहमदनगर जिल्हा,
सातारा,सांगली जिल्हा,सोलापूर
आणि मराठवाडा बाभूळ,बोर,
निवडुंग,खैर,चिंच,
धामण,निर्मली,हिवर,हिरडा
खारफुटी वने (Mangroves)पश्चिम किनारपट्टीवरील
खाड्यांच्या भागात समुद्राच्या
क्षारयुक्त गढूळ पाण्यात वाढ.
दलदलीच्या आणि
खारी मृदा असलेल्या क्षेत्र,
या वनामुळे किनारपट्टीचे
समुद्राच्या लाटापासून
संरक्षण.जलचर प्राण्यांना
आश्रय चिप्पी,मारांडी
यासारखी वृक्ष
Maharashtratil Vane

महाराष्ट्रातील वनोत्पादने

महाराष्ट्रातील वनामधून इमारती लाकूड,जळाऊ लाकूड,बांबू,लाख,विड्यांची पाने,विविध अर्क आणि तेल,विविध प्रकारचे तंतू,डिंक,वराळ,कंदमुळे आणि फळे,विविध प्रकारचे गवत,विविध प्रकारचे प्राण्यापासून मिळणारे प्राणीजन्य पदार्थ,औषधी गुणधर्म असणाऱ्या अनेक बिया,साली,पाने.

वनावर आधारित असणारे उद्योग

लाकूड कटाई,लगदा व कागद उद्योग,प्लायवूड उद्योग,फर्निचर उद्योग,काडे पेट्या उद्योग,अर्क व तेल उद्योग,विविध फळावर प्रक्रिया उद्योग,औषध तयार करणे.

महाराष्ट्रातील विविध अभयारण्याची माहिती जाणून घ्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *