महाराष्ट्रातील जिल्हे

district of maharashtra-महाराष्ट्रातील जिल्हे

district of maharashtra

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ३६ जिल्हे- district of maharashtra आहेत. प्रत्येक जिल्ह्याला आपला स्वतः चा स्वतंत्र वारसा आहे. प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ठ्ये आहे. या भागात महाराष्ट्रातील जिल्हे आणि वैशिष्ठ्ये यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

कोकण आणि प.महाराष्ट्रातील जिल्हे आणि वैशिष्ठ्ये

अहमदनगर जिल्हा-district of maharashtra

 • अहमदनगर हा महाराष्ट्रातील  सर्वात मोठा जिल्हा आहे.  
 • महाराष्ट्र सर्वात जास्त सिंचनाच्या सोयी अहमदनगर जिल्ह्यातच आहे. 
 • अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत.
 • अहमदनगर हे निजामशहा ची राजधानी होते.  
 • चांदबिबीचा महाल हे प्रसिद्ध ठिकाण अहमदनगर येथे आहे.  
 • अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना इंग्रजांच्या राजवटीत काही वर्ष तुरुंगात ठेवण्यात आले होते.  
 • अहमदनगरच्या किल्ल्यात त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला.

नाशिक जिल्हा-district of maharashtra

 • गोदावरी नदीवर वसलेले अतिप्राचीन शहर नाशिक काळाराम मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. 
 • नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. 
 • नाशिक शहरापासून जवळच त्रंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आहे.  
 • दर बारा वर्षांनी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर कुंभमेळा भरतो.
 • नाशिक शहरात भारत सरकारचा नोटा व नाणी छापण्याचा कारखाना आहे.  
 • नाशिक शहराजवळील पांडव लेणी प्रसिद्ध आहेत. 
 • नाशिक शहराजवळील देवळाली येथे स्कूल ऑफ आर्टलरी हे सैन्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
 • नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी,अंकाई टंकाई,साल्हेर,मुल्हेर,अलंग कुलंग,मरकिंडा हे प्रसिद्ध किल्ले आहे. 

पुणे जिल्हा-district of maharashtra

 • महाराष्ट्र महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे.  
 • सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडले आहेत.  
 • शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे ओळखले जाते.  
 • पुणे ही पेशव्यांची राजधानी होती.  
 • शिवरायांचे जन्मस्थान असलेले शिवनेरी किल्ला येथून जवळच आहे.  
 • तुकारामाचे निवासस्थान असलेले देहू गाव पुणे जिल्ह्यातच आहे. 
 • सर्वाधिक नागरी वस्तीचा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. 
 • अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था पुणे शहरात आहेत.
 • भारत इतिहास संशोधन मंडळ
 • भंडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र  
 • महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था  
 • कृत्रिम अवयव केंद्र.
 • आर्मी फोर्स मेडिकल कॉलेज.
 • राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था.
 • नॅशनल केमिकल लॅबोरेटरी अशा अनेक महत्त्वाच्या या संस्था पुणे शहरात आहेत. 
 • राजगड,पुरंदर,सिंहगड,तोरणा,शिवनेरी हे किल्ले पुणे जिल्ह्यात आहेत. 

मुंबई जिल्हा-district of maharashtra

 • महाराष्ट्राची राजधानी..
 • भारताचे राष्ट्रीय प्रवेश द्वार.
 • सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला जिल्हा.
 • भारताची आर्थिक राजधानी.  
 • राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या संस्था मुंबईत आहेत  
 • भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर.
 • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर.  
 • नेव्हल  केमिकल अँड मेट्रोलॉजिकल लॅब.  
 • प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. 
 • इन्स्टिट्यूट बॉम्बे रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया.
 • इडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅग्नेटिझम.  
 • कॉटन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च लॅबरोटरी.  
 • केंद्रीय मत्स्यव्यवसाय संशोधन संस्था.
 • भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय. 

सिंधुदुर्ग जिल्हा-district of maharashtra

 • शंभर टक्के साक्षर झालेला पहिला जिल्हा.
 • पर्यटन जिल्हा.पहिला ई गव्हर्नन्स जिल्हा.
 • सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा.
 • सिंधुदुर्ग,विजयदुर्ग,देवगड, मनोहरगड,पद्मगड,महादेवगड,शिवगड,रांगणा हे किल्ले या जिल्ह्यात आहेत.  
 • मॅंगनीज,अभ्रक,लोह खनिज,जिप्सम हे खनिजे या जिल्ह्यात सापडतात. 
 • नारळ व काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा.

रत्नागिरी जिल्हा-district of maharashtra

 • महाराष्ट्रात सर्वाधिक किनारपट्टी असलेला जिल्हा.
 • दर हजारी स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेला जिल्हा. 
 • बॉक्साईट, क्रोमाइट ही खनिजे या जिल्ह्यात सापडतात. 
 • हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा.

रायगड जिल्हा

 • मिठागरांचा जिल्हा. 
 • तांदळाचे कोठार. 
 • रायगड,कर्नाळा,लिंगाणा, खांदेरी-उंदेरी, सुधागड,सरसगड,मुरुड,मुरुड जंजिरा हे किल्ले या जिल्ह्यात आहेत. 
 • बॉक्साईट हे खनिज रायगड जिल्ह्यात सापडते. 

ठाणे जिल्हा

 • सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा.
 • सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा.

सोलापूर जिल्हा

 • सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहे. 
 • सोलापुरला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. 
 • सर्वात जास्त लोहमार्गाची घनता असलेला जिल्हा.  
 • सर्वात कमी पावसाचे ठिकाण सोलापूर जिल्ह्यात आहे. 
 • सोलापूर जिल्ह्यात डाळिंब पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

कोल्हापूर जिल्हा

 • कुस्ती या खेळा साठी प्रसिद्ध असलेला जिल्हा. 
 • चामड्याचे उद्योगासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा.
 • पन्हाळगड,विशाल गड यासारखे प्रसिद्ध किल्ले या जिल्ह्यात आहेत. 

सातारा जिल्हा

 • शूरवीरांचा जिल्हा 
 • यशवंतराव चव्हाण यांची समाधी. 
 • प्रतापगड सज्जनगड,अजिंक्यतारा असे सत्तावीस किल्ले या जिल्ह्यात आहे. 

सांगली जिल्हा

 • क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा.
 • जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावचे नागपंचमी जगप्रसिद्ध आहे आहे.  
 • मिरज येथील तंतुवाद्य जगभर पाठवली जातात. 
 • कृष्णा व वारणा नद्यांच्या संगमावर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्मृतिस्थळ 
 • सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे
 •  वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक गाळप क्षमतेचा कारखाना आहे. 

मराठवाड्यातील जिल्हे आणि वैशिष्ठ्ये

औरंगाबाद जिल्हा

 • मराठवाड्याची राजधानी म्हणून औरंगाबादला ओळखले जाते.  
 • आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ख्याती आहे. 
 • डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आहे.  
 • औरंगाबादला बीबी का मकबरा हे आग्र्याचा ताज महालाची प्रतिकृति असणारे प्रसिद्ध ठिकाण आहे. 
 • औरंगाबादची हिमरू शाल जगप्रसिद्ध आहे. 
 • औरंगाबाद जवळच वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास लेणे प्रसिद्ध आहे.
 • अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेण्या औरंगाबाद पासून जवळच आहेत. 
 • सातवाहन राजाचे राजधानी असलेले पैठण शहर औरंगाबाद पासून जवळच आहे.
 • वेरुळचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग येथून जवळच आहे.
 • दौलताबादचा किल्ला येथून जवळच आहे. 

जालना जिल्हा

 • जिल्ह्यात पोलादाचे कारखाने प्रसिद्ध आहेत.  
 • जिल्ह्याला बियाण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
 • राजूर येथील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे.  

बीड जिल्हा

 • ऊसतोड कामगारांचा जिल्हा. 
 • जुन्या मराठी कवींचा जिल्हा.
 • आद्य कवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान. 

लातूर जिल्हा

 • लातूर येथील शिकवण्याच्या या पद्धतीमुळे लातूर पॅटर्न देशभर प्रसिद्ध आहे.
 • माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे गाव 
 • 15 ऑगस्ट1982 या दिवशी लातूर जिल्हा उस्मानाबाद पासून वेगळा करन्यात आला.

नांदेड जिल्हा

 • संस्कृत कवींचा जिल्हा  
 • शीख धर्मीयांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी असलेला गुरुद्वारा याच शहरात आहे. 
 • रेणुका देवीचे प्रसिद्ध मंदिर. 

हिंगोली जिल्हा

 • बारा ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग जिल्ह्यात आहे.  
 • संत नामदेवाचे जन्मस्थान नरसी (नामदेव) याच जिल्ह्यात आहे.  

उस्मानाबाद जिल्हा

 • जिल्ह्यातील तुळजाभवानी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. 
 • जिल्ह्यात तेर या ठिकाणी प्रसिद्ध पुराण वस्तुसंग्रहालय आहे. 
 • जिल्ह्यात नळदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आणि वैशिष्ठ्ये

जळगाव जिल्हा

 • केळी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा
 • सोने-चांदीच्या व्यापारात अग्रेसर जिल्हा
 • भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती. प्रतिभाताई पाटील याच जिल्ह्यातील आहेत.  

धुळे जिल्हा

 • इतिहासाचार्य वि.हेका. राजवाडे वस्तुसंग्रहालय

विदर्भातील जिल्हे आणि वैशिष्ठ्ये

नागपूर जिल्हा

 • महाराष्ट्राची उपराजधानी, 
 • संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा, 
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेले शहर.  
 • सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च 
 • महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ 
 • महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ 
 • नॅशनल इन्व्हायर्नमेंटल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट 
 • संगमरवर दगडासाठी प्रसिद्ध असलेल्या खाणींचा जिल्हा

गडचिरोली जिल्हा

 • सर्वाधिक जंगल असणारा जिल्हा . 
 • चुनखडक,तांबे,लोह खनिज ही खनिजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सापडतात.

चंद्रपूर जिल्हा

 • खनिज संपत्तीचा जिल्हा, 
 • गोंड राजाचा जिल्हा.
 • चंद्रपूर जिल्ह्यात अनेक सिमेंट कारखाने आहेत. 
 • बल्लारपूरचा कागद कारखाना चंद्रपूर जिल्ह्यात आहे.  
 • सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा, 
 • सर्वात जास्त दगडी कोळशाच्या खाणी याच जिल्ह्यात आहेत.  

नंदुरबार जिल्हा

 • सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा 
 • आदिवासी जिल्हा.

गोंदिया जिल्हा

 • गोंदिया जिल्ह्यात तांबे,लोह खनिज ही खनिजे मोठ्या प्रमाणावर सापडतात. 
 • तलावांचा जिल्हा गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे.  

बुलढाणा जिल्हा

 • लोणार हे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर. 
 • जिजाबाईचे माहेर असलेले सिंदखेड राजा हे शहर याच जिल्ह्यात आहे. 
 • शेगावचे गजानन महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान. 

यवतमाळ जिल्हा

 • कापसाचा किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा .
 • चुनखडक,दगडी कोळसा ही खनिजे मोठ्या प्रमाणावर सापडतात.

भंडारा जिल्हा

 • तलावांचा जिल्हा.  
 • भंडारा जिल्ह्यात शासनाचे शस्त्रास्त्रांचे उद्योग आणि ट्रक बनवण्याचे उद्योग प्रसिद्ध आहेत.
 • मॅंगनीज,क्रोमाइट ही खनिजे या जिल्ह्यात सापडतात. 

“भारत देशातील सर्व जिल्ह्याची यादी आणि त्यांची वैशिष्टे”

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *