महाराष्ट्रातील पशुधन

महाराष्ट्रातील पशुधन Maharashtratil Pashudhan

Maharashtratil Pashudhan

मानवाचे आणि प्राणी यांचे हजारो वर्षांपासून सहसंबंध निर्माण झालेले आहेत. मानवाची प्रगती प्राण्यांच्या सोबतीनेच झाली असे म्हणावे लागेल. Maharashtratil Pashudhan अनेक पशु पक्ष्यांचा उपयोग मानवाने अन्न म्हणून केलेला आहे. माणसाला प्राण्यांच्या अनेक गोष्टींचा उपयोग होत असतो. पशुधनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागतो. कुक्कुटपालनात महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. मानवाच्या जीवनातील प्राण्यांचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील विविध पशु धना विषयी माहिती या भागात घेतली जाणार आहे.

अर्थव्यवस्थेतील पशुंचे महत्त्व

खाद्य पुरवठा

प्राण्यांपासून मानवाला अनेक प्रकारचा खाद्य पदार्थ मिळतात.दूध,मास, अंडी,असे पदार्थ माणसाला प्राण्यापासून मिळतात.

शेतीमध्ये प्राण्यांचा उपयोग

महाराष्ट्रातील शेती अजूनही मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचे उपयोगाने केली जाते. शेतीतील अनेक कामे पारंपारिक पद्धतीने प्राण्यांच्या मदतीने केली जातात.

वाहतुकीसाठी पशुंचा वापर

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पशुंचा वापर केला जातो. कृषी मालाची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर पशुंच्या साहाय्याने केली जाते. शेतीतील माल घरापर्यंत पोहोचवणे,तयार झालेला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे ही महत्त्वाची कामे पशुंचा वापर करून केली जातात.

पशुधनावर आधारित विविध उद्योग

वेगवेगळ्या पशु पासून वेगवेगळ्या वस्तू मिळतात.दूध,मांस,चरबी,लोकर,कातडी, हाडे,शिंगे अशा अनेक वस्तू वेगवेगळ्या प्राण्यापासून प्राप्त होतात. वरील वस्तूवर आधारित अनेक उद्योग महाराष्ट्रात कार्यरत आहेत.या वस्तू पासून अनेक प्रकारच्या वेग वेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. त्यावर अनेक लोकांचे जीवनमान अवलंबून आहे.

शेणखताचा पुरवठा Maharashtratil Pashudhan

प्राण्यांच्या विष्ठेपासून उत्तम प्रकारचे शेणखत प्राप्त होते.जमिनीमधून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.शेणखत हे उत्तम प्रतिचे सेंद्रिय खत असते. त्यासाठी जनावराच्या विष्ठेचा वापर होतो.

जळण आणि ऊर्जा Maharashtratil Pashudhan

प्राण्यांच्या विष्ठेपासून ग्रामीण भागात गोवऱ्या तयार करतात. गोवऱ्याचा उपयोग अन्नपदार्थ शिजवण्यासाठी जळतण म्हणून केला जातो.

जनावराच्या शेना पासून गोबर गॅस तयार केला जातो. शेनापासून तयार झालेला गोबर गॅस अतिशय स्वस्त आणि चांगल्या प्रकारचा गॅस असतो.

महाराष्ट्रातील पशुधनाचे प्रकार Maharashtratil Pashudhan

गोवंश गाय वा बैल

महाराष्ट्रात वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या जाती पाळल्या जातात. महाराष्ट्रात खालील पाच गायीच्या जाती आहेत.

गायीच्या जातीवैशिष्ठ्ये
डांगीया जातीच्या गाई नाशिक,अहमदनगर,रायगड,
पालघर,ठाणे या जिल्ह्यात आढळतात. या परिसरात आढळणारे बेर, मारवेल या प्रकारचे गवत या गाईंचे मुख्य खाद्य आहे.डांगी जनावरांचा रंग साधारणपणे काळा असतो.ही जनावरे काटक आणि जास्त पाऊस सहन करणारी असतात.या गाईच्या जाती साधारणत पाच ते सहा लिटर दूध देतात.
खिलारखिलार जातीची जनावरे ही साधारणपणे कमी पावसाच्या प्रदेशात आढळतात.खिलार जातीचा रंग साधारणपणे पांढरा असतो.त्यांची शिंगे मागे वळलेली असतात.खिलार गाईच्या जाती दूध कमी प्रमाणात देतात. या जातीचे बैल चपळ असतात. शर्यतीसाठी या बैलांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. खिलार जातीच्या महाराष्ट्रात चार उपजाती आढळतात.
1. आटपाडी खिलार-ही उपजात सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात आढळते.
2. म्हसवड खिलार-ही जात सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात आढळते.
3. तापी खिलार-ही उपजात तापी नदीच्या खोऱ्यातील जळगाव धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यात आढळते.
4. नकली खिलार-खऱ्या खिल्लार
प्रमाणे दिसणारी ही जात उत्तर महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वतातील सीमा भागात मोठ्या प्रमाणावर आढळते.
देवणी  देवणी ही जात साधारणपणे लातूर
आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आढळते.कमी पावसाच्या प्रदेशात आढळल्यामुळे ही जनावरे साधारणतः कमी वाढणारे गवत आणि धान्याचा कडबा यावर अवलंबून असतात.
लाल कंधारी ही उपजात साधारणपणे नांदेड
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते.ज्वारीचा कडबा, गवत हे या जनावरांचे
मुख्य खाद्य आहे.या जातीचा रंग साधारणपणे लाल असतो.
या जातीचे बैल हे मजबूत आणि काटक असतात.त्यामुळे त्यांचा वापर शेती
आणि वाहतुकीसाठी होतो.
गौळाऊ ही जात विदर्भातील वर्धा व नागपूर जिल्ह्यात आढळते.विषम स्वरूपाच्या हवामानात सापडते.ज्वारीच्या कडबा तुरीच्या चुऱ्यावर ही जात जगते.या जातीचा रंग साधारणपणे पांढरा शुभ्र असतो.
संकरित गायदोन वेगवेगळ्या जातींचा संकर घडवून ह्या जाती निर्माण केल्या आहेत.
संकरीत गाई या दूध मोठ्या प्रमाणावर देतात.
म्हैस1.जाफराबादी 2.सुरती 3.मुरा 4.मेहसाणा 5.नागपुरी 6.निळीरावी 7.तोडा
शेळ्या1.उस्मानाबादी 2.संगमनेरी 3.सुरती
मेंढीदख्खनी
कोंबडी1.गावराण 2.ब्रॉयलर

महाराष्ट्रातील पिके आणि पाऊस यांची उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *