महाराष्ट्रातील खडक

महाराष्ट्रातील खडक

Maharashtratil Khadak

पृथ्वी ही विविध प्रकारच्या आवरणापासून तयार झाली आहे. पृथ्वीच्या सर्वात वरचे आवरण किंवा कवच असते त्याला शिलावरण असे म्हणतात. Maharashtratil Khadak शिलावरण हे माती आणि खडक यांच्या मिश्रणापासून पासून बनलेले आहे.

खडक म्हणजे काय ? Maharashtratil Khadak

भूपृष्ठाच्या वर किंवा खाली शिलावरणात तयार झालेल्या वेगवेगळ्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात.

खडकात अनेक प्रकारचे वेगवेगळे गुणधर्म असणारे खनिज पदार्थ एकत्र झालेले असतात.सिलिका,ॲल्युमिनियम,मॅग्नेशियम,लोहखनिज आणि इतर अनेक घटक किंवा खनिजे खडकात एकत्र आलेले असतात. विविध खनिजे एकत्र येऊन खडक बनण्याची नैसर्गिक प्रक्रिया होत असते.

खडकाची निर्मिती प्रक्रिया काही दिवसात पार पडत नाही.शेकडो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून खडक निर्माण होतात.

खडकालाच सोप्या भाषेत दगड,पाषाण,अश्म,शिला,शिळा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

खडकांचे प्रकार Maharashtratil Khadak

निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार आढळतात .

  • अग्निजन्य खडक किंवा अग्निज खडक किंवा मूळ खडक
  • गाळाचे खडक किंवा स्तरित खडक
  • रूपांतरित खडक

अग्निजन्य खडक

ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या दरम्यान अनेक वेळा ज्वालामुखी जमिनीच्या पृष्ठाच्या वर येतो त्यास लाव्हारस असे म्हणतात.

तो लाव्हा कालांतराने थंड होत जातो. जमिनीच्या खालील ज्वालामुखीचा शिलारस किंवा मॅग्मा कालांतराने थंड होत जातो.

भूपृष्ठाखालील आणि भूपृष्ठावरील लाव्हा थंड होऊन त्याचे घनीभवन होत असते.ही प्रक्रिया अनेक वर्ष सतत सुरू असते या प्रक्रियेतून तयार होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात.

अग्निजन्य खडक हे पृथ्वीच्या आतील मूळ पदार्थापासून तयार होतात म्हणून त्यांना मूळ खडक अशी ही म्हणतात. अग्निजन्य खडक हे अत्यंत कठीण आणि एक जिनसी असतात. ते वजनाने प्रचंड जड असतात.

अग्निजन्य खडकामध्ये बेसॉल्ट नावाचा खडक हा प्रमुख आहे.अग्निजन्य खडक हे ज्वालामुखीच्या लाव्हापासून तयार झाल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचे जीवाश्म आढळत नाही.

ज्वालामुखीच्या फेसापासून प्युमिस नावाचा खडक तयार होतो. तो सछिद्र असतो. त्याची घनता अतिशय कमी असते त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो.

गाळाचे खडक

तापमानातील सतत होणाऱ्या बदलामुळे खडकावर त्याचा परिणाम होतो.तसेच खडकामधून पावसाचे पाणी आत जाते.त्यामुळे आतील खनिजे विरघळतात.

खडकाचा अपक्षय होऊन खडक विरघळले जातात. त्याचा भुगा होतो आणि हाच भुगा पाणी वारा यांच्या प्रवाहासोबत सखल प्रदेशाकडे वाहत जातो.त्याचे एकावर एक असे अनेक थर साचत जातात.ही प्रक्रिया शेकडो वर्ष सुरू असते.थरांच्या संचयनामुळे त्यावर प्रचंड दाब निर्माण होतो.

हे थर कालांतराने एक संघ होऊन जातात.या प्रक्रियेद्वारे तयार झालेल्या खडकांना गाळाचे किंवा स्तरित खडक म्हणतात.

स्तरित खडकामध्ये गाळाचे वेगवेगळे स्तर स्पष्टपणे दिसत असतात. गाळाचे हेच स्तर  साचत असताना काही प्राणी वनस्पती कीटक यांचे अवशेषही या थरात गाडले जात असतात. शेकडो वर्षानंतर त्या काळाच्या थरात हे जीवाश्म आढळतात.गाळाचे खडक हे वजनाला हलके ठिसूळ आणि सचिद्र असतात.नक्षीकाम करण्यासाठी गाळाच्या खडकांचा वापर केला जातो.

रूपांतरित खडक

ज्वालामुखीचा उद्रेक आणि इतर भूहालचाली या सतत घडत असतात.त्यामुळे अग्निजन्य आणि स्तरीत खडकावर मोठ्या प्रमाणावर दाब आणि उष्णता निर्माण होते.त्या प्रक्रियेमधून मूळ खडकाचे प्राकृतिक स्वरूप आणि रासायनिक गुणधर्मात बदल होत असतात.

वेगवेगळ्या स्पठिकाचे पुनर्स्पटीकीकरण होते. म्हणजेच त्या खडकाचे मूळ स्वरूप बदलून रूपांतरण होते.अशा पद्धतीने तयार झालेल्या खडकांना रूपांतरीत खडक असे म्हणतात.

रूपांतरित खडक वजनाला जड आणि कठीण असतात.त्यात जीवाश्म आढळत नाही.रूपांतरित खडक महाराष्ट्रात विदर्भाच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आढळतात.

दगडी कोळशावर प्रचंड दाब  पडल्यामुळे आणि अति उष्णतेमुळे दगडी कोळशाचे रूपांतरण होते आणि तेथे हिऱ्याची निर्मिती होते. म्हणूनच आपण म्हणतो कधीकधी कोळशाच्या खाणीत  हिरा सापडतो.

मुळ खडक आणि रूपांतरित खडक

अग्निजन्यग्रॅनाईटनीस
अग्निजन्यबेसॉल्टअंफिबोलाईत
स्तरीतचुनखडकसंगमरवर
स्तरीतकोळसाहिरा
स्तरीतवाळूचा खडकक्वार्टझाईट
स्तरीतपंकाश्म सेलस्लेट

महाराष्ट्रातील मृदा याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *