महाराष्ट्रातील मृदा

महाराष्ट्रातील मृदा Maharashtratil Mruda /mati

Maharashtratil Mruda

मृदा म्हणजे काय ? Maharashtratil Mruda /mati

खडकाचे विखंडन होऊन त्याचा झालेला भूगा,अर्धवटपणे किंवा पूर्णतः कुजलेले सेंद्रिय पदार्थ आणि असंख्य सूक्ष्मजीव ज्या मातीत असतात त्याला मृदा असे म्हणतात.मृदा ही एक प्रकारची परिपूर्ण परिसंस्था असते. Maharashtratil Mruda /mati मृदेमधील मृदेमध्ये अनेक जैविक आणि अजैविक घटक उपलब्ध असतात.त्यात सातत्याने आंतरक्रिया घडत असते.

जमिनीवरील या मातीच्या पातळ थराला मृदा किंवा जमीन असे संबोधले जाते.
कोणत्याही प्रदेशातील शेती ही तेथील मृदेवर अवलंबून असते.मृदेच्या सुपीक असण्यावरच शेतीची प्रगती अवलंबून असते.

सुपीक असणाऱ्या मृदेत विविध प्रकारचे अन्नधान्य आणि कृषी उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.त्या परिसराची सुबत्ता आणि समृद्धी ही तेथील मृदेवर अवलंबून असते.

ज्या भागातील मृदा ही सुपीक असते तेथे लोकसंख्या किंवा लोकवस्ती ही दाट प्रमाणात आढळते. शेतीचा विकास हा मृदेवरच अवलंबून असतो.

मृदा कशी तयार होते ?

मृदा किंवा जमीन तयार होण्यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत असतात.

१.खडकाचा प्रकार-मृदेच्या निर्मितीसाठी त्या परिसरातील मूळ खडकाचा प्रकार,खडकाची काठीण्य पातळी किती आहे,यावर त्या परिसरातील मृदा अवलंबून असते.

महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागात वेगवेगळ्या प्रकारचे खडक आढळतात.त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मृदा आढळते.

२.हवामान-मृदा तयार होण्यासाठी त्या परिसरातील हवामान कसे आहे. यावर तेथील खडकाचे विदारण होणे अवलंबून असते.

वेगवेगळ्या हवामानात खडकाची ठिसूळता वेगवेगळी दिसून येते.

महाराष्ट्राच्या विविध भागात हवामान सारखे नाही त्यामुळे तेथील मृदा ही इतर भागापेक्षा वेगळी असते.

३.विविध जैविक घटक-महाराष्ट्राच्या विविध भागात विविध वनस्पती आणि विविध प्राणी संपदा पाहायला मिळते.

वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनातूनच तयार झालेले पदार्थ मृदेत मिसळत असतात.

वनस्पतींची मुळे,पालापाचोळा,फांद्यांचे भाग, प्राण्यांचे मृत प्राण्यांचे विविध अवयव,वेगवेगळ्या प्रकारचे कीटक त्यांचे घटक मृदेत सतत विघटित होत असतात.

४.जमिनीचा उतार

५.कालावधी– मृदा तयार होण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया असते.खडकाचे विदारण होणे, वेगवेगळ्या हवामान जैविक घटक या सर्व बाबींचा त्यात समावेश असतो.

ही प्रक्रिया खूप मंद गतीने होत असते.कमी अधिक तापमान,कमी अधिक पाऊस याचा मृदा निर्मितीवर परिनाम होत असतो.

मृदा ही एक जिवंत परिसंस्था असते. उच्च दर्जाच्या मृदेच्या 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागत असतो. यावरून मृदा प्रचंड अनमोल असते हे लक्षात येते.

महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार Maharashtratil Mruda /mati

१. जाडी भरडी मृदा-महाराष्ट्राच्या कमी पाऊस असणाऱ्या विविध भागात ही मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते.

महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागातील घाटमाथ्यावर अजिंठाचे डोंगर,बालाघाटचे डोंगर,महादेवाचे डोंगर या डोंगर रांगांच्या परिसरात ही मृदा आढळते.यात ह्युमस किंवा जैविक घटक कमी प्रमाणात असतात.

२. काळी मृदा-ज्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो तेथे ही मृदा तयार होते.महाराष्ट्राच्या विविध नद्यांच्या खोऱ्यामधील गाळाची मैदानी आणि विविध दऱ्यांच्या भागात ही मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते.दख्खनचे पठार आणि विदर्भाच्या पूर्व भागात ही मृदा आढळते.
३. जांभा मृदा-सह्याद्रीच्या दक्षिण भागात आणि पूर्वेकडील उंच भागात रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच सातारा व कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिम भागात ही मृदा आढळते.जास्त पाऊस आणि उष्ण आणि दमट हवामान असणाऱ्या भागात ही मृदा तयार होते.या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते.उलट विविध खनिजांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.लोह या घटकाच्या जास्त प्रमाणामुळे या मृदेचा रंग लाल दिसतो.पोटॅश,फॉस्फरस,चुना इत्यादी घटक द्रव्याचे प्रमाण कमी असते.त्यामुळे लाल रेताड मृदेपेक्षा ही मृदा वेगळी ठरते.या मृदेत भात, भुईमूग,फळे यांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
४.कोकण किनारपट्टीवरील गाळाची मृदा-कोकण किनारपट्टीवरील विविध जिल्ह्यात आढळून येते.कोकणातील नद्या वेगाने वाहल्यामुळे तेथील जमिनीची मोठ्या प्रमाणावर झीज घडवून येते. या झिजीतूनच भरपूर प्रमाणात गाळ, माती,वाळू,खडकाचे तुकडे वाहत जाऊन आजूबाजूच्या प्रदेशात जमा होतात. समुद्राजवळ जमा झालेल्या मृदेत रेती ही मोठ्या प्रमाणावर आढळते.रेतीमिश्रित मृदेत आंबा,नारळ,काजू, भात,भाजीपाला,सुपारी या प्रकारची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
५. पिवळसर तपकिरी मृदा-सह्याद्रीच्या उत्तरेकडील भागात पालघर,ठाणे,रायगड या जिल्ह्यातील पूर्व भाग आणि महाराष्ट्राच्या पूर्वेकडील वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील विविध जिल्ह्यात आढळते. पिवळसर तपकिरी मृदा ही बेसॉल्ट खडकापासून तयार होते.ज्या भागात पावसाचे प्रमाण अधिक असते,तेथे बेसॉल्ट खडकाची झीज होऊन या मृदेची निर्मिती होते.या मृदेत रेती आणि लोह खनिजाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्या प्रदेश लाल रंग दिसतो. या मृदेची सुपीकता कमी प्रमाणात असते. येथे बाजरी नाचणी यासारखी पिके घेतली जातात.

महाराष्ट्रातील विविध पिकांची माहिती घेण्यासाठी येथे भेट द्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *