महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या

महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या

Maharashtratil Pramukh Nadya Upnadya

महाराष्ट्र अनेक नद्या व उपनद्या Maharashtratil Nadya Upnadya यांनी संपन्न असा प्रदेश आहे. महाराष्ट्र पठार,कोकण या भागातील नद्या,उपनद्या यांचा अभ्यास खाली करण्यात आला आहे.

नद्या आणि उपनद्या Maharashtratil Nadya Upnadya

विभाग नदीचे नाव उपनद्याची नावे
महाराष्ट्र पठारगोदावरीप्रवरा,इंद्रावती,दुधना,दारणा,
वैनगंगा,मांजरा
तापीपूर्णा,गिरणा.पांजरा,मोरणा,
काटेपूर्णा
कृष्णापंचगंगा,येरळा,कोयना
भीमासीना,नीरा,मान, इंद्रायणी
विदर्भ वैनगंगा कन्हान
पैनगंगा आढळा ,वर्धा
कोकण वैतरणासुर्या,पिंजाळ,तानसा आणि दरहेजा
उल्हाससालपे,पायारमल,काळू,
वालधुनी

प्रमुख नद्या व महत्वाची माहिती Maharashtratil Nadya Upnadya

गोदावरी नदी

गोदावरी नदीला दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखले जाते. गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.

या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. ही नदी पूर्व दिशेला वाहणारी नदी आहे.

पूर्वेला बंगालच्या उपसागराला समुद्राला जाऊन मिळते.गोदावरीची लांबी सुमारे 1465 किलोमीटर आहे.गोदावरी नदीवर अनेक प्राचीन शहरे वसलेली आहेत.नाशिक,कोपरगाव,पैठण,गंगाखेड,नांदेड ही महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आहेत.गोदावरी नदी ही नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्यात प्रवेश करते.

पैठण शहराजवळ जायकवाडी हे धरण बांधण्यात आले आहे.पुढे नांदेड जवळ विष्णुपुरी धरण बांधण्यात आले आहे.विष्णुपुरी धरणामुळे नांदेड शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.

तापी नदी

ही महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेतील नदी आहे.तापी नदी पश्चिम वाहिनी म्हणून ओळखली जाते.तापी नदीचे उगम स्थान हे मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मूलताई हे आहे.

तापी ही मध्यप्रदेशातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते.नदीची लांबी 724 किलोमीटर आहे.

सातपुडा डोंगर रांगामधील अनेक छोट्या नद्या तापी नदीला मिळतात.तापी नदीवर उकाई धरण,हतनुर धरण,काकरापार धरण अशी अनेक धरणे आहेत. 

कृष्णा नदी

कृष्णा नदी ही सांगली,सातारा,कोल्हापूर या जिल्ह्यातील मुख्य नदी आहे.सांगली,सातारा,कोल्हापूर या जिल्ह्यात कृष्णा नदीचे पाणलोट क्षेत्र आहे.कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे.महाबळेश्वर येथून ही नदी पूर्व दिशेला वाहते.

महाराष्ट्रातील कमी भागात ही नदी वाहून पुढे कर्नाटक,तेलंगाना,आंध्रप्रदेश या राज्यातून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.कृष्णा नदीची लांबी सुमारे 1400 किलोमीटर आहे. 

भीमा नदी

ही नदी भीमाशंकर जवळ उगम पावते.या नदीला पंढरपूर जवळ चंद्रभागा नदी असे म्हणतात.पुणे,अहमदनगर,सातारा,सोलापूर जिल्ह्यातून ही नदी वाहते.भीमा नदीवर उजनी धरण प्रमुख धरण आहे.भीमा नदी कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते.ही नदी हरिश्चंद्र डोंगरातून उगम पावते.

वैनगंगा नदी

वैनगंगा नदी महाराष्ट्राच्या अति पूर्व भागात वाहते.विदर्भाच्या पूर्व भागात हि नदि पूर्वेकडून दक्षिणेकडे वाहते.विदर्भातील घनदाट वनांनी आणि डोंगर युक्त भागातून ही नदि वाहते. नदी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करते.भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हयातून महाराष्ट्राच्या सीमेजवळ गोदावरी नदीला मिळते.

पैनगंगा नदी

पैनगंगा नदी ही मध्य विदर्भातील प्रमुख नदी आहे. विदर्भाच्या बुलढाणा,यवतमाळ,वर्धा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यातून ही नदी वाहते.

चंद्रपूरनजीक पैनगंगा ही प्राणहिता नदीला मिळते. ही विदर्भातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे . 

कोकणातील नद्यांची माहिती

वैतरणा नदी

वैतरणा नदी कोकणाच्या पालघर जिल्ह्यामधील महत्त्वाची नदी आहे. ही नदी त्र्यंबकेश्वर येथे ही नदी उगम पावते.त्रंबकेश्वर येथे दोन नद्या उगम पावतात. गोदावरी नदी पूर्वेकडे वाहते.वैतरणा नदी पश्चिमेकडे वाहते.

मोडक सागर,नाना शंकरशेठ धरण,इगतपुरी ही महत्वाची धरणे आहेत.वैतरणा नदीवर मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठीची अतिशय महत्त्वाची धरणे बांधण्यात आली आहेत.

वैतरणा नदीची लांबी 154 किलोमीटर आहे. दातीवरे खाडीजवळ वैतरणा नदी अरबी समुद्राला मिळते. वैतरणा कोकणातील अतिशय महत्त्वाची नदी म्हणून ओळखली जाते.वैतरणा नदी कोकणातील सर्वात जास्त लांब नदी आहे.

उल्हास नदी

उल्हास नदी कोकणातील महत्त्वाच्या नद्या पैकी अतिशय महत्त्वाची नदी आहे. कोकणातील मोठमोठी शहरे उल्हास नदीवर वसलेली आहेत.सह्याद्री पर्वतातील लोणावळा या ठिकाणाहून ही नदी उगम पावते.ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर,ठाणे,वसई ही शहरे आणि मुंबईसारखे महा विशाल शहर उल्हास नदी वरील शहर आहे.उल्हास नदी ही मुंबई शहरातूनच अरबी समुद्राला मिळते.मुंबई हे शहर उल्हास नदीच्या मुखाजवळ बेटावर वसलेले आहे.

सावित्री नदी,वशिष्ठ नदी,वाघोटान नदी,काजळी नदी,तेरेखोल नदी या कोकणातील उर्वरित महत्त्वाच्या नद्या आहेत. 

कोकणातील सर्व नद्या या सह्याद्री पर्वतात मध्ये उगम पावतात .पश्चिम दिशेला जवळच असणाऱ्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोकणातील सर्व नद्या या अतिशय वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. सह्याद्री पर्वताच्या उंच भागावरून या नद्या उगम पावल्यामुळे सह्याद्री पर्वतापासून समुद्रापर्यंत संपूर्ण परिसर हा डोंगराळ आहे. तीव्र उताराचा असल्यामुळे सर्व नद्या व उपनद्या या अति वेगाने वाहतात. “

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची माहिती घेण्या साठी येथे क्लिक करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *