महाराष्ट्र राज्य सीमा,विस्तार,स्थापना,प्रशासकीय विभाग

Maharashtra Rajya/State
महाराष्ट्र राज्याचा सीमा दर्शवणारा नकाशा चित्र”

Maharashtra Rajya Sima Region-स्थापना,सीमा,विस्तार आणि प्रशासकीय विभाग

महाराष्ट्र राज्याची (Maharashtra Rajya Sima Region) स्थापना 1मे1960 रोजी झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक भागांमध्ये भाषावार प्रांतरचना व्हावी यासाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या. त्यात मराठी भाषकांचे एक वेगळे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणून एक मोठा लढा उभारला गेला. सांस्कृतिक,साहित्यिक,वैचारिक आणि राजकीय अशा सर्व बाजूनी ही चळवळ उभी राहिली. संघर्ष उभा केला गेला.अनेक लोकानी आपले प्राण गमावले. शेवटी 105 लोकांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात आले.1मे1960 रोजी  मराठी भाषकांचे राज्य निर्माण करण्यात आले म्हणून यादीवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.खालील भागातील महत्वाचे मुद्दे

Information About Maharashtra Rajya Sima Region-महाराष्ट्र राज्य माहिती

राजधानी-महाराष्ट्र राज्याची राजधानी ही मुंबई आहे.खूप मोठ्या संघर्षाच्या नंतर महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले.अनेक मोठी शहरे असतांना सुद्धा मुंबई हे शहर महाराष्ट्राच्या राजधानी साठी निवडले गेले कारण मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे तसेच तेथे अनेक उद्योग धंदे यांची रेलचेल आहे.भारताची आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा मुंबईला ओळखले जाते. भारताची स्वातंत्र्य चळवळ खऱ्या अर्थाने मुंबई पासूनच सुरु झाली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हीसुद्धा मुंबईतच उगम पावली.कालांतराने मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली.

उपराजधानी-नागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर आहे. राज्याचा राज्य कारभार चालवण्यासाठी राजधानी आवश्यक असते.तसेच उपराजधानी ही आवश्यक असते.महाराष्ट्र राज्याने राजधानी आणि उपराजधानी ही संकल्पना स्वीकारली आहे. उपराजधानी म्हणून विदर्भातील नागपूर हे शहर निवडण्यात आले.नागपूरला विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्यात येते.नागपूरला संत्र्यांचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते.नागपूर हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे.  

भाषा-महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे.महाराष्ट्रात मराठीच्या अनेक बोली भाषा बोलल्या जातात. कोकणात कोकणी,विदर्भात वऱ्हाडी आणि खानदेश म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात अहीराणी या बोली भाषा तसेच आदिवासी भागात अनेक वेगवेगळ्या आदिवासी भाषा बोलल्या जातात . 

विस्तार-महाराष्ट्र राज्याचा विस्तार देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत बऱ्यापैकी मोठा आहे. देशाच्या अनेक मोठ्या राज्यांपैकी असलेले असलेले महाराष्ट्र हे एक राज्य आहे.अक्षवृत्तीय विस्तार- 15 33 46 उत्तर ते 22  02 13 उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार -72 38 45 पूर्व ते 80 53 17 पूर्व अशा पद्धतीने महाराष्ट्राचा विस्तार झालेला आहे.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे ३०७७१३ चौरस किलोमीटर एवढे आहे. महाराष्ट्राचे दक्षिण ते उत्तर अंतर सुमारे ७०० किलोमीटर आहे आणि पूर्व-पश्चिम हे अंतर ८०० किलोमीटर आहे. महाराष्ट्राला समृद्ध असा समुद्र किनारा लाभला आहे.महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी 720 किलोमीटर आहे.महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा पश्चिम दिशेला आहे. 

Boundaries of Maharashtra Rajya Sima Region-महाराष्ट्राच्या सीमा

  • पूर्व दिशा-पूर्व दिशेस छत्तीसगड हे राज्य आहे.
  • पश्चिम दिशा-पश्चिम दिशेस अरबी समुद्र आहे.अरबी समुद्राचा 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूस आहे. 
  • दक्षिण दिशा-दक्षिण दिशेला सर्वात छोटे असलेले गोवा आणि कर्नाटक राज्याचा भाग आहे. 
  • उत्तर दिशा-उत्तर दिशेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. 
  • ईशान्य दिशा-ईशान्य दिशेस छत्तीसगड राज्याचा काही भाग आहे. 
  • आग्नेय दिशा-आग्नेय दिशेस तेलंगणा राज्याची सीमा आहे. 
  • वायव्य दिशा-वायव्य दिशेस गुजरात राज्याचा काही भाग व दादरा नगर हवेली या संघराज्याच्या सीमा आहेत.
  • महाराष्ट्र राज्यात या सर्वात जास्त सीमा ही मध्य प्रदेश या राज्याची आहे व सर्वात कमी सीमा ही दादरा नगर हवेली या राज्याची आहे.

महाराष्ट्र राज्यात एकूण सहा प्रशासकीय भाग आहेत.राज्यकारभार व्यवस्थित चालावा आणि त्या भागातील जनतेच्या सरकारी कामांत सुलभता यावी म्हणून राज्याचे वेगवेगळे प्रशासकीय विभाग बनवले जातात.”

Administretive Region-प्रशासकीय विभाग

१.कोकण-कोकण विभागात एकूण सात जिल्हे आहेत.महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला असलेल्या समुद्र किनार्‍यावर असलेली ही सात जिल्हे कोकण म्हणून ओळखली जातात.कोकण विभागात महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई हे शहर वसलेले आहे.पालघर हा जिल्हा नव्याने तयार झालेला आहे.कोकण विभागाचे मुख्यालय मुंबई येथे आहे.मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी सुद्धा आहे. 

Maharashtra Rajya/State
मुंबईरत्नागिरीठाणे
मुंबई उपनगरसिंधुदुर्गरायगड
पालघर 

२.उत्तर महाराष्ट्र-महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला असलेल्या पाच जिल्ह्यांचा मिळून हा उत्तर महाराष्ट्र विभाग तयार केलेला आहे.हा विभाग बऱ्यापैकी आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहे.जिल्ह्यात ऊस आणि द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.नाशिकला द्राक्षाचे आगार म्हटले जाते.या विभागाचे मुख्यालय नाशिक येथे आहे.  

Maharashtra Rajya/State
नाशिक धुळे
जळगाव अहमदनगर
नंदुरबार

३.पश्चिम महाराष्ट्र-नावावरूनच पश्चिम दिशेला असलेल्या पाच जिल्ह्यांचा मिळून हा प्रशासकीय विभाग तयार झाला आहे. पुणे ही तर महाराजांची कर्मभूमी आहे.या विभागाचे मुख्यालय ऐतिहासिक पुणे शहर आहे.पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.पश्चिम महाराष्ट्र हा विभाग समृद्ध विभाग म्हणून ओळखला जातो.

पुणे सातारा
सांगली कोल्हापूर
सोलापूर

४.मराठवाडा,किंवा आरंगाबाद विभाग-महाराष्ट्राच्या साधारणपणे मध्यभागी असलेला हा विभाग एकूण आठ जिल्ह्यांचा तयार झाला आहे.महाराष्ट्रातील सर्वात मागास विभाग म्हणून हा विभाग ओळखला जातो.पावसाचे प्रमाण या विभागात सिंचनाच्या सोयी सुविधा खूप कमी प्रमाणात आहे.या विभागाचे मुख्यालय ऐतिहासिक औरंगाबाद आहे.या विभागात अनेक प्रेक्षणीय स्थळे आपल्याला पाहायला मिळतात.

महाराष्ट्र राज्य
औरंगाबाद हिंगोली लातूर
.जालना नांदेड उस्मानाबाद
परभणी बीड

५.अमरावती विभाग-महाराष्ट्राच्या साधारणपणे पूर्व दिशेला असलेला हा विभाग आहे.अमरावती हे या विभागाचे मुख्य ठिकाण आहे.अमरावती विभाग आणि नागपूर विभाग मिळून साधारणपणे विदर्भ या नावाने ओळखले जातात. 

महाराष्ट्र राज्य
अमरावती बुलढाणा 
अकोला वाशिम 
यवतमाळ

६.नागपूर विभाग-महाराष्ट्राच्या पूर्व भागात असलेला हा विभाग एकूण सहा जिल्ह्यांचा मिळून तयार आहे.गोंदिया,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात प्रचंड निसर्गसंपदा पाहायला मिळते.वनसंपत्ती, खनिजसंपत्ती,प्राणीसंपत्ती या जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात आढळते.या विभागाचे मुख्यालय नागपूर शहरातच आहे.नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. 

नागपूर वर्धा भंडारा
गोंदिया चंद्रपूर गडचिरोली

महाराष्ट्र राज्य सीमा,विस्तार,स्थापना,प्रशासकीय विभाग या भागावर आधारित 20 गुणांची सराव चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *