महाराष्ट्रातील प्रमुख 11 खनिजे आणि उपयोग

Major 11 Minerals khanij sampatti

Maharashtratil Pramukh Khanij Sampatti-महाराष्ट्रातील प्रमुख 11 खनिजे आणि उपयोग

महाराष्ट्र राज्यात अनेक प्रकारची खनिज संपत्ती सापडते. ही Maharashtratil Pramukh Khanij Sampatti महाराष्ट्राच्या सर्वच भागात सापडत नाही. कारण महाराष्ट्राचा खूप मोठा भाग हा बेसॉल्ट खडकांनी तयार झाला आहे. बेसॉल्ट अतिशय मजबूत असा खडक आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती ही पूर्व महाराष्ट्र आणि नैऋत्य महाराष्ट्र या भागात आढलते. पूर्व महाराष्ट्र म्हणजेच  विदर्भ आणि नैऋत्य महाराष्ट्र म्हणजे कोकणाच्या दक्षिणे कडील भाग. या ठिकाणी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर सापडते. विदर्भ आणि कोकणामध्ये जांभा खडक असल्यामुळे तेथे मुबलक खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्ती ही जमिनीतून खोदून काढली जाते म्हणून त्या कामाला खाणकाम असे म्हटले जाते. ज्या भागात मुबलक खनिज संपत्ती आहे त्या भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Maharashtratil Pramukh Khanij Sampatti And Uses -प्रमुख खनिजे त्यांचे उपयोग आणि सापडणारे जिल्हे

खनिजाचे नावखनिजाचा उपयोगसापडणारे जिल्हे
मँगनीजलोखंड आणि पोलाद उद्योगात,बॅटरी उद्योगात,रंग बनवणे,जंतुनाशक बनवणे,काच सामान बनवणे,औषध निर्माण करणे. विदर्भातील नागपूर,गोंदिया,भंडारा आणि सिंधुदुर्ग जिल्हा
लोह खनिजअशुद्ध लोखंड आणि पोलाद यांना शुद्ध लोखंड आणि शुद्ध पोलाद बनवणे .
लोहखनिज विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर,भंडारा,गोंदिया
या जिल्ह्यात तसेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा
बॉक्साईटबॉक्साईट हे खनिज ॲल्युमिनियम बनवणे. बॉक्साईट हे खनिज कोकणाच्या नैऋत्य भागातील सिंधुदुर्ग,
रत्नागिरी,कोल्हापूर व रायगड जिल्हा
चुनखडकरसायन निर्मिती उद्योगात आणि सिमेंटबनवणे .
बांधकामासाठी लागणारा चुना बनवणे .
क्रोमाइट खनिज भंडारा,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सापडते.
डोलोमाईटलोखंड आणि पोलाद निर्मितीडोलोमाईट खनिजाच्या खाणी यवतमाळ आणि रत्नागिरी जिल्हा
सिलिका (गारगोटी)काच कामासाठी वापरले जाते.सिलिकाच्या खाणी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात.
दगडी कोळसादगडी कोळसा हा वीज निर्मितीसाठी औष्णिक विद्युत निर्मिती
दगडी कोळसा विदर्भातील नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्हा
तांबेतांब्याच्या वस्तू बनवणे . तांबे हा धातू अशुद्ध रूपात विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली आणि गोंदिया जिल्हा
अभ्रकविजेच्या वेगवेगळ्या साहित्य निर्मिती
औषध निर्मिती क्षेत्र
अभ्रक हे खनिज नागपूर,चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग हा जिल्हा.
जिप्सम (प्लास्टर ऑफ पॅरिस)सिमेंट आणि रंग काम
मुर्त्या बनवण्यामध्ये,घर सजावटीसाठी
जिप्सम खनिजाच्या खाणी पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.

महाराष्ट्रातील विविध अभयारण्याची माहिती जाणून घ्या. येथे क्लिक करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *