Current Affairs Date-12 August 2022

Author Salman Rushdie Attacked in New York-लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे हल्ला.

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे एका कार्यक्रमानिमित्त प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. Current Affairs Date-12 August 2022 सलमान रश्दी यांनी दि सैटेनिक वर्सेस हे पुस्तक लिहिले आहे.

ते पुस्तक वादग्रस्त ठरले आहे त्यामुळे अनेक लोकांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील अकरा पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर Current Affairs Date-12 August 2022

गुन्ह्यात केलेल्या उत्कृष्ट तपासासाठी दरवर्षी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे देशभरातील अधिकाऱ्यांना पदके दिली जातात.यावर्षीसाठी महाराष्ट्रातील 11अधिकाऱ्यांना ही पदके जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील राणी काळे,दीपशिखा वारे,कृष्णकांत उपाध्याय,प्रमोद तोरडमल,मनोज पवार,दिलीप पवार,अशोक वीरकर,अजित पाटील,सुरेशकुमार राऊत,जितेंद्र वनकोटी,समीर अहिरराव यांचा समावेश आहे.

सरपंच निवडला जाणार थेट जनतेतून.Current Affairs Date-12 August 2022

महाराष्ट्रातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान होणार.याचवेळी ग्रामपंचायती मधील सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाणार आहे.

ग्राम पंचायतीची ही निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार आहे.जयंत कुमार बांठीया आयोगाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.

झिम्बाम्बुळे दौऱ्यासाठी भारताचे प्रशिक्षक म्हणून क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यांची नियुक्ती.

27 ऑगस्ट पासून झिम्बाब्वे येथे तीन दिवशीय क्रिकेट सामन्याची मालिका होणार आहे. त्यासाठी व्ही व्ही एस लक्ष्मण याची संघ प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डवेन ब्रावो क्रिकेटमध्ये 600 विकेट घेऊन विश्वविक्रम.

Current Affairs Date-12 August 2022

क्रिकेट मधील ट्वेंटी-ट्वेंटी सामन्याच्या प्रकारामध्ये वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू डवेन ब्रावो याने विश्वविक्रमी कामगिरी केली आहे.या प्रकारामध्ये 600 विकेट घेऊन त्याने नवीन विश्वविक्रम निर्माण केला आहे.सध्या ब्रावो याचे वय 38 वर्ष असून तो दि हंड्रेड लीग मध्ये खेळत आहे. त्याने नॉर्दन सुपर चार्जेस या संघाकडून खेळून हा विश्वविक्रम केला आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व लोकेश राहुल यांच्याकडे.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या झिम्बाब्वे येथील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारताचे कर्णधार म्हणून लोकेश राहुल याची निवड करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच या दौऱ्यासाठी बी.सी.सी.आय ने शिखर धवन च्या नावाची घोषणा केली होती.

भारतातील विविध खेळ आणि त्यांचे खेळाडू यांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *