Current Affairs 16 August 2022

Current Affairs 16 August

Current Affairs 16 August-महाराष्ट्रातील कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत.  

यावर्षी अतिवृष्टी झालेल्या नुकसानासाठी महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे.Current Affairs 16 August

यावर्षी ओरडवाहू शेती सोबत बागायती शेतीला सुद्धा मदत दिली जाणार आहे.जिरायती शेतीसाठी यंदा 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत मदत होईल.

बागायती शेतीसाठी 27000 रुपये प्रति हेक्‍टरी तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.

महाराष्ट्रातील शेती,हवामान आणि पाऊस याविषयी महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ Current Affairs 16 August

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ 31 टक्क्यावरून 34 टक्क्यावर महागाई भत्ता वाढविण्यात आला आहे.

जानेवारी 2022 या महिन्यापासून महागाई भत्ता लागू होईल.महागाई भत्ता केंद्र शासनाच्या महागाई निर्देशांकावरून दर सहा महिन्याला निश्चित केला जातो

75 वर्ष वरील ज्येष्ठ लोकांना आता एसटी बस मध्ये मोफत प्रवास

आता 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस मध्ये मोफत प्रवास करता येईल.

याआधी साठ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना पन्नास टक्के रक्कमेत प्रवास करता येत होता.

गोविंदांना दहा लाखाचे विमा संरक्षण

महाराष्ट्रातील कृष्ण जन्माष्टमी निमित्त होणाऱ्या दहीहंडी खेळात सहभागी गोविंदांना दहा लाखाचे  विमा संरक्षण देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.या विम्याचा हप्ता राज्य शासन भरेल. . 

इंडो तिबेट सीमा पोलीस दलाची बस दरीत कोसळून सात जवानांचा दुर्दैवी मृत्यू

इंडो तिबेट सीमा पोलीस दलाच्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून सात जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काश्मीर राज्याच्या पहेलगाम जिल्ह्यात इस्लाम जवळ घाटातून जात असताना हा अपघात घडला.

मृत झालेल्या जवानांची नावे 1.दूला सिंह पंजाब, 2.अभिराज बिहार, 3.अमित के उत्तर प्रदेश, 4.डी राज शेखर आंध्र प्रदेश, 5.सुभाष बैरवाल राजस्थान, 6.दिनेश बोहरा उत्तराखंड, 7.संदीप कुमार जम्मू.

नितीश कुमार यांच्या महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार Current Affairs 16 August

नव्याने स्थापन झालेल्या बिहार मधील नितीश कुमार यांच्या महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला.

त्यात 31 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.जनता दलाचे 16,जनता दल युनायटेडचे 11,काँग्रेस पक्षाचे दोन,हिंदुस्थानी आवाम मोर्चा या पक्षाचा एक आणि एक अपक्ष सदस्य यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

जागतिक फुटबॉल संघटनेची भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कार्यवाही

 जागतिक पातळीवरील विविध फुटबॉल च्या विविध स्पर्धा घेणारी शिखर संस्था जागतिक फुटबॉल संघटनेने भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. यापुढील काळात जागतिक स्तरावरील विविध स्पर्धेत भारतीय फुटबॉल खेळाडू खेळू शकणार  नाहीत.  त्यामुळे 11 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणारी 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. ही स्पर्धा भारतात होणार .होती.

भारतीय फुटबॉल महासंघात इतर पक्षांचा हस्तक्षेप वाढल्याचे दिसताच फिफा म्हणजेच जागतिक फुटबॉल संघटनेने ही कार्यवाही केली आहे. 

बी.सी.सी.आय चे माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे आजारपणाने निधन Current Affairs 16 August

भारतीय क्रिकेट मधील सर्वोच्च संस्था बीसीसीआय The Board of Control For Cricket चे  माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. 

निधना समयी त्यांचे वय 62 वर्षांचे होते.अमिताभ चौधरी हे माजी पोलिस अधिकारी होते.झारखंड क्रिकेट संघटनेचे ते माजी अध्यक्ष सुद्धा होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *