Current Affairs Date-5 August 2022

Current Affairs Date-5 August 2022

Current Affairs Date-5 August 2022

Reserve Bank of India hikes repo rate by half a percent-भारतीय रिझर्व बँकेकडून रेपोच्या दरात अर्धा टक्क्याने वाढ.

भारतीय रिझर्व बँकेने रेपो दरामध्ये पुन्हा अर्धा टक्क्याची वाढ केली आहे. ( Current Affairs Date-5 August 2022) त्याचा परिणाम म्हणून सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते काही प्रमाणात वाढणार आहेत. भारतीय रिझर्व बँक ही भारतातील संपूर्ण बँक प्रणालीची शिखर बँक आहे. ती बँक वेळोवेळी कर्जाच्या रेपोदराचा आढावा घेऊन त्यात बदल करत असते.

मागील तीन महिन्यात तीन वेळा रेपो दर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजदरात वाढ होऊन कर्जाच्या मासिक हप्त्यात वाढ होते.

In Maharashtra, certain powers of the Minister are vested in the Secretary-महाराष्ट्रात मंत्र्याचे काही अधिकार सचिवांना.Current Affairs Date-5 August 2022

महाराष्ट्र राज्यात सध्या मंत्रिमंडळात फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचीच नियुक्ती आहे. इतर मंत्री पदे रिकामे आहेत.

सर्वसामान्य जनतेची विविध कामे मार्गी लागावी म्हणून मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना देण्यात आले आहे.

नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिल्यामुळे विविध विभागातील कामकाज अडून पडणार नाही.

Zilla Parishad and Panchayat Samiti elections postponed-जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक स्थगित.Current Affairs Date-5 August 2022

राज्यात काहीच महिन्यात 25 जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत 284 पंचायत समित्यांमध्ये निवडणूक होणार होती.

नवीन सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये अध्यादेश काढून बदल केला आहे.

Resignation of Global Teacher Award winner Ranjit Singh Disle rejected

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजीत सिंह डीसले यांचा राजीनामा नामंजूर.Current Affairs Date-5 August 2022

जागतिक शैक्षणिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा, ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजीत सिंह डीसले यांनी काही कारणास्तव मागील दिवसांमध्ये आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. प्रशासनाने त्यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. डीसले सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात पुस्तकांमध्ये प्रत्येक घटकावर क्यू आर कोड बनवून शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती केली होती. त्यांना जागतिक ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त झाला होता.

Three Indian wrestlers win gold medals in wrestling at the 22nd Commonwealth Games

22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताच्या तीन मल्लांना सुवर्णपदके.

बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनिया याने 65 किलो गटात, साक्षी मलिक हिने 62 किलो गटात तर दीपक पुनिया याने 86 किलो गटात सुवर्णपदक प्राप्त केले.

Gold Medal in Power Lifting at the 22nd Commonwealth Games-22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॉवर लिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक.

बर्गिंहॅम येथे पार पडत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 87.30 किलो शारीरिक वजन गटात 212 किलो असे विक्रमी वजन उचलून खेळाडू सुधीर याने सुवर्णपदक मिळवले

In the US declared health emergency -अमेरिकेत आरोग्य विषयक आणीबाणी जाहीर.

अमेरिकेत मंकी बॉक्स या नवीन साथ रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे . या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संपूर्ण अमेरिकेत आरोग्य आणि आरोग्य विषयक आणीबाणी जाहीर केली आहे.

चालू घडामोडी Current Affairs वाचण्यासाठी येथे क्लिक करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *