Current Affairs- Date-03 August 2022

Current Affairs-03 August 2022

Current Affairs-03 August 2022-Appointment of Suresh Patel as Central Vigilance Commissioner of India.

भारताच्या केंद्रीय दक्षता आयुक्त पदी सुरेश पटेल यांची नियुक्ती.

भारताच्या केंद्रीय दक्षता आयोग ( CVC Central Vigilance Commission) च्या आयुक्तपदी आंध्र बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री सुरेश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.Current Affars-03 August 2022

त्याच सोबत अरविंद कुमार आणि प्रवीण कुमार श्रीवास्तव या दोघांची सुद्धा केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय दक्षता आयोग भारतातील विविध खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार नियंत्रण करणारी सर्वोच्च संस्था आहे.

CVC ची स्थापना सन 1964 मध्ये करण्यात आली.

जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका यातील वाढलेली सदस्य संख्या रद्द.

मागील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय दिनांक 11 नोव्हेंबर 2019 रोजी घेतला होता.

नवीन शिंदे सरकारने मागील सरकारचा हा नियम मोडीत काढला आहे. 2017 साlली जेवढी सदस्य संख्या असेल तेवढीच सदस्य संख्या ठेवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Current Affars-03 August 2022-ऊसाला आता प्रति टन 3050 रुपये हमीभाव केंद्र सरकारचा निर्णय.

सन 2022-23 या वर्षासाठी ऊस या पिकासाठी केंद्र सरकारने प्रति टन 3050 रुपये हमीभाव जाहीर केला आहे.तसेच उसाच्या साखर उताऱ्याचा बेस रेट आता बदलून 10% ऐवजी 10.25% एवढा करण्यात आला आहे.

Current Affars-03 August 2022

सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता एटीएस करणार उच्च न्यायालयाचा निर्णय.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्येला सात वर्ष पूर्ण होत आहेत.त्यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटी या विशेष पथकाकडून हा तपास काढून एटीएस म्हणजेच महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

येथे क्लिक करा. भारताची राष्ट्रीय प्रतीके माहिती करून घ्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *