Current Affairs Date-24 August 2022

Current Affairs 24 August

डॉ.संगीता बर्वे लिखित ‘पियुची वही’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार.Current Affairs 24 August

प्रसिद्ध बाल साहित्यकार कवयित्री डॉ.संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या पियुची वही या पुस्तकाला 2022 या वर्षीचा Current Affairs 24 August साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार-2022 प्राप्त झाला आहे.साहित्य अकादमी देशातील विविध भाषे मधील साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करते.मराठी भाषेसाठी यंदा संगीता बर्वे यांच्या पियूची वही या बालसाहित्याला हा बहुमोल सन्मान प्राप्त झाला आहे.संगीता बर्वे यांनी गंमत झाली भारी,उजेडाचा गाव,रानफुले,झाड आजोबा,खारुताई आणि सावलीबाई,मीनूचे मनोगत,भोपळ्याचे बी,नलदमयंती यासारख्या अनेक कथा आणि पुस्तके लिहिली आहेत.५०००० रू रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.साहित्य अकादमीचे अध्यक्ष सध्या डॉ.चंद्रशेखर कंबार हे आहेत.

अनु. क्र भाषा पुरस्कार प्राप्त पुस्तक लेखक
आसामी दनगोर माणूहोर साधू दिंगत ओझा
बांगला चार पांच जोन बोंधु जय मित्र
बोडो लांगोनाणी बखाली गथ देवबार रामसियारी
डोंगरी शिकख मत राजेश्वर सिंग राजू
इंग्रजी महाभारत फॉर चीलद्रण अरशीया सत्तार
गुजराथी खिस कोली ने कंपुटर छे लेऊ कीर्ती गोस्वामी
हिन्दी क्षमा शर्मा की चुणिणद बाल कहानिया क्षमा शर्मा
कन्नड बावालि गुहे तम्मना बिगारा
काश्मिरी दाइएल कमर हमी दुल्लाह
१० कोंकणी मयूरी ज्योति कुंकळकर
११ मैथिली उडन छु विरेन्द्र झा
१२ मल्याळम चेककुट्टी सेतू (ए सेतू माधवण )
१३ मणीपुरी टॉम थिन अमसुंग खुजी नाऑरेम लोकेश्वोरे सिंह
१४ मराठी पियूची वही संगीता बर्वे
१५ नेपाली कोपीलाका रडहरू मीना सुब्बा
१६ ओडिसी कोलाहल ना हलाहल नरेंद्र प्रसाद दास
१७ राजस्थानी माछळ्या रा आंसु विश्वामित्र दाधीच
१८ संस्कृत सचित्रम प्रहेलीका शतकं कुलदीप शर्मा
१९ सिंधी अनोखीयुन आखानीयुन मनोहर नीहलानी
२० तमिळ मल्लीगावीन विदू जी.मीनाक्षी
२१ तेलुगू बालाला ताता बापुजी पाट्टीपाका मोहन
२२ उर्दू हौसलों की उडान जफर कमाली

स्वातंत्र्य सैनिक केशवराव धोंडगे यांचा शतकपूर्ती निमित्त सत्कार.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे यांनी नुकतीच वयाची शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.या निमित्ताने महाराष्ट्राच्या विधान भवनात त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष,विरोधी पक्ष नेते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य असलेले डॉ.केशवराव धोंडगे यांनी 60 वर्ष राजकारण केले परंतु एकदाही पक्ष बदल केला नाही.हैदराबादचा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात केशवराव धोंडगे यांनी बहुमोलाचे योगदान दिले आहे.सर्व सामान्य माणसाच्या शिक्षणासाठी त्यांनी 1948 साली शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

आशिया चषकासाठी हंगामी प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण काम पाहणार.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाल्यामुळे UAE येथे होणाऱ्या आशिया चषक क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही.भारतीय क्रिकेट संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून ज्येष्ठ फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यांना नेमले आहे.क्रिकेट खेळातील पारंपारिक विरोधक असलेल्या पाकिस्तान संघाविरुद्ध अर्थात पहिला सामना होईल.आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा यांच्याकडे जबाबदारी आहे.

मराठी लेखन आणि त्यांची टोपण नावे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *