Current Affairs Date -14 August 2022

Current Affairs Date -14 August 2022

Current Affairs-14 August 2022 Accidental death of Shiv Sangram Organization President Vinayak Mete Near Mumbai.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन.

महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासाठी लढा देणारे माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. ते 52 वर्षाचे होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील भातन बोगद्याजवळ ट्रक आणि कार अपघातात ते दगावले.Current Affairs-14 August 2022 विनायक मेटे हे पाच वेळा आमदार होते. त्यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील राजेगाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी मोठा लढा दिला होता. अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष होते.

महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांना खाते वाटप जाहीर.

महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारातील मंत्र्यांना खाते वाटप जाहीर झाले.

 • श्री.गुलाबराव पाटील-पाणीपुरवठा व स्वच्छता
 • श्री.दादा भुसे -बंदरे व खणीकर्म
 • श्री.संजय राठोड-अन्न व औषध प्रशासन
 • श्री.संदिपान भुमरे-रोजगार हमी योजना व फलोत्पादन
 • श्री.उदय सामंत-उद्योग
 • प्रा.श्री.तानाजी-सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
 • श्री.अब्दुल सत्तार-कृषी
 • श्री.दीपक केसरकर-शालेय शिक्षण व मराठी भाषा
 • श्री.शंभूराज देसाई-राज्य उत्पादन शुल्क
 • श्री.राधाकृष्ण विखे पाटील-महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
 • श्री.सुधीर मुनगंटीवार-वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय
 • श्री.चंद्रकांत पाटील-उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
 • डॉ.श्री.विजयकुमार गावित-आदिवासी विकास
 • श्री.गिरीश महाजन-ग्राम विकास आणि पंचायती राज वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण
 • श्री.सुरेश खाडे-कामगार
 • श्री.रवींद्र चव्हाण-सार्वजनिक बांधकाम अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
 • श्री.अतुल सावे-सहकार इतर मागास व बहुजन कल्याण
 • श्री.मंगल प्रभात लोढा-पर्यटन कौशल्य विकास व उद्योजकता महिला व बालविकास

शेअर बाजारातील गुरु राकेश झुनझुनवाला यांचे निधन.Current Affairs-14 August 2022

Current Affairs Date -14 August 2022

शेअर बाजारात गुरु म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे दिनांक 14 ऑगस्ट 2018 निधन झाले.त्यांचे वय 62 वर्ष होते.भारतीय शेअर बाजारात त्यांनी आपली विशिष्ट ओळख निर्माण केली होती.

महाराष्ट्रातील 84 पोलिसांना राष्ट्रपतीची पदके जाहीर.Current Affairs-14 August 2022

देशभरातील पोलीस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल दरवर्षी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतीची पदके देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातील 84 अधिकारी व कर्मचारी यांना ही पदके जाहीर झाली आहेत. उल्लेखनीय सेवा केली म्हणून तीन राष्ट्रपती पदके, 42 शौर्य पदके आणि गुणवत्ता पूर्ण सेवा केली म्हणून 39 पदके जाहीर झाली आहेत.

तीनही सैन्य दलातील प्रत्येक जवानाला मिळणार विशेष लष्करी पदक.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देश सेवा करणाऱ्या प्रत्येक भारतीय जवानाला विशेष पदक देण्यात येणार आहे. एका बाजूस अशोक स्तंभ तर दुसऱ्या बाजूस अशोक चक्र असणारे हे पदक प्रत्येक जवानाला प्राप्त होईल.

विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक विविध घटकाच्या सराव चाचण्यांचा सराव करण्यासाठी येथे भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *