Current Affairs Date-09.08.2022

Current Affairs Date-09.08.2022

Current Affairs Date-09.08.2022 Expansion of Cabinet of Maharashtra-महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्र राज्यातील नव्यानेच स्थापन झालेल्या शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार 39 दिवसापासून प्रतीक्षेत होता. Current Affairs Date-09.08.2022 मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिला विस्तार करण्यात आला.यात खालील मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कडून १.राधाकृष्ण विखे पाटील, २.सुधीर मुनगंटीवार, ३.चंद्रकांत पाटील, ४.डॉ. विजयकुमार  गावित, ५.गिरीश महाजन, ६.सुरेश खाडे, ७.अतुल  सावे, ८.मंगल प्रभात लोढा आणि ९.रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेतली. शिंदे गटाकडून खालील नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. १.गुलाबराव पाटील, २.दादा भुसे, ३.संजय राठोड, ४.संदिपान भुमरे, ५.उदय सामंत, ६.डॉ.तानाजी सावंत, ७.अब्दुल सत्तार, ८.दीपक केसरकर आणि ९.शंभुराजे देसाई.

बिहार राज्यात नवीन महाआघाडीचे सरकार येणार

बिहार राज्यात गेले नऊ वर्ष नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त आघाडीचे सरकार काम करत होते.

परंतु आता बिहार मध्ये नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नवीन महाआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. सध्याच्या विधानसभेत असे संख्याबळ आहे. 

  • जनता दल युनायटेड-46
  • राष्ट्रीय जनता दल-79
  • काँग्रेस-19
  • भाकपा माले-12
  • भाकपा-2
  • मापक-2
  • हिंदुस्तानीआवाम मोर्चा-4
  • भाजप-77  
  • AIMIM-1

महाराष्ट्र राज्यात सात हजाराच्या वर शिक्षक उमेदवार TET परीक्षा मधून कायमचे बाद.Current Affairs Date-09.08.2022

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी या परीक्षेत मागील काळात केलेला गैरव्यवहारात उघडकीस आल्यामुळे राज्यातील 7880 शिक्षक उमेदवार कायमचे बाद करण्यात आले आहे.

परीक्षेत गैरव्यवहार करून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी अंबादास दानवे.

औरंगाबाद येथील विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांची महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे. अंबादास दानवे हे शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानावर छापेमारी.

Current Affairs Date-09.08.2022

अमेरिकेची गुप्तचर संस्था FBI ने माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाजगी निवासस्थानावर छापेमारी केली आहे. राष्ट्राध्यक्ष पद सोडताना आपल्या सोबत काही महत्त्वाचे राष्ट्रीय दस्तावेज नेऊन ती नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन.Current Affairs Date-09.08.2022

मराठी भाषेतील बहु आयामी कलाकार प्रदीप पटवर्धन यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांनी चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका अशा सर्वच माध्यमांमध्ये लोकप्रियता मिळवली होती. त्यांना पट्या या नावाने ओळखले जायचे.

छत्रपती संभाजी राजे यांची नवीन संघटना जाहीर.

शिवरायांचे वंशज असलेले छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्य नावाची नवी संघटना स्थापन केली आहे. ही संघटना शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पाच प्रश्नावर काम करेल.

महाराष्ट्रातील विविध नद्या आणि उपनद्या यांची माहितीजाणून घ्या. येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *