विभाज्यतेच्या कसोट्या.

Vibhajtechya kasotya Vibhajyatechya kasotya-विभाज्यतेच्या कसोट्या.

Vibhajtechya kasotya Vibhajyatechya kasotya

विभाज्य म्हणजे काय ?

भागाकार करताना जेव्हा एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागायचे असते. म्हणजेच ज्या संख्येचे भाग करायचे असतात ती संख्या भाज्य आणि जेवढे भाग करायचे असतात ती संख्या भाजक असते. Vibhajtechya kasotya Vibhajyatechya kasotya भाज्याला भाजकाने भाग दिल्यानंतर बाकी शून्य राहते. त्यावेळी तेथे भाज्याला विभाज्य असे म्हटले जाते.

गणितात याला नि:शेष भाग जाणे असेही समजले जाते. सोप्या भाषेत… एखादा भागाकार केल्यानंतर बाकी जर शून्य राहत असेल तर

त्यावेळी भाज्य विभाज्य म्हणून ओळखला जातो तर भाजक हा विभाजक म्हणून ओळखला जातो.

नि:शेष भागाकारात भाजकाला विभाजक किंवा अवयव असे सुद्धा म्हटले जाते.

कोणत्याही संख्येचे अनेक अवयव असू शकतात. मात्र 1 आणि ती मूळ संख्या असे दोन अवयव प्रत्येक संख्येचे असतातच. म्हणजे प्रत्येक संख्येला दोन अवयव असतातच.

शून्याला कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे शून्याचे कोणतेही अवयव नाहीत.

1 या अंकाचा 1 हाच अवयव आहे. 1 या अंकाला दोन अवयव नाही.

संख्येला कोण कोणत्या अंकाने निशेष भाग जातो ? म्हणजेच कोण कोणते अंक त्या संख्येचे अवयव असू शकतील ? यासंबंधी काही सूत्र ठरलेली आहेत त्यांनाच विभाज्यतेच्या कसोट्या असे म्हटले जाते.

संख्या आणि त्यांचे प्रकार माहीत करून घ्या. येथे क्लिक करा.

List Of Vibhajyatechya kasotya-विभाज्यतेच्या कसोट्या.

2 ची कसोटी-ज्या संख्येच्या एककाच्या जागी 0,2,4,6,8 यापैकी कोणताही एक अंक असेल तेथे त्या संख्येस 2 ने नि:शेष भाग जातो.

उदाहरणार्थ – 20,42,46,48,80,106,88.

3 आणि 9 ची कसोटी-ज्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज केली असता, त्या बेरजेस जर तीन ने नि:शेष भाग जात असेल तर त्या मूळ संख्येला सुद्धा 3 आणि 9 ने नि:शेष भाग जातो.

उदाहरणार्थ – 2352  येथे 2+3+5+2 = 12 येथे दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज 12 आली आणि 12 ला 3 ने  भाग जातो

म्हणून 2352 या संख्येला 3 आणि 9 ने भाग जातो.   

4 ची कसोटी-एखाद्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी मिळून जी संख्या तयार होईल ,

त्या संख्येस जर 4 ने नि:शेष भाग जात असेल, तर त्या मूळ संख्येसही 4 ने नि:शेष भाग जाईल.

5 ची कसोटी-दिलेल्या संख्येच्या एककाच्या जागी जर 0 आणि 5 या दोन अंकापैकी एक अंक असेल तर त्या संख्येस 5 ने नि:शेष भाग जातो.

6 ची कसोटी-ज्या संख्येस 2 आणि 3 या दोन्हीही अंकाने नि:शेष भाग जातो.त्याच संख्येस 6 ने नि:शेष भाग जातोच.

म्हणजे ज्या संख्येचा अवयव 2 आणि 3 हे दोन्हीही अंक असतील त्या संख्येचा 6 सुद्धा अवयव असेलच.

8 ची कसोटी -ज्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने नि:शेष भाग जातो.

तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 8 ने नि:शेष भाग जातो व ज्या संख्येच्या शेवटच्या तीन स्थानी 0 असतील त्याही संख्येसही 8 ने नि:शेष भाग जाईल.

10 ची कसोटी-दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तरच त्या संख्येस 10 ने पूर्ण भाग जातो.

11 ची कसोटी -एखाद्या संख्येतील सर्व सम अंकांची बेरीज आणि सर्व विषम अंकांची बेरीज या दोन्हीच्या बेरजेतील फरक

म्हणजे वजाबाकी जर 0 असेल,अथवा अकराच्या पाढ्यातील एखादी संख्या असेल तर त्या मूळ संख्येस 11 ने पूर्ण भाग जातो.

12 ची कसोटी -ज्या संख्येस 3 आणि 4 या दोन्हीही अंकाने नि:शेष भाग जात असेल

त्या संख्येस 12 ने सुद्धा नि:शेष भाग जाईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *