Current Affairs Date-11 August 2022

Current Affairs Date-11 August 2022

चार भारतीय जवानांचे बलिदान.Current Affairs Date-11 August 2022

जम्मू राज्यातील राजुरी जिल्ह्यात लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात भारताचे चार जवान शहीद झाले.Current Affairs Date-11 August 2022 लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना जवानांनी त्यांना रोखले आणि आपल्या प्राणाचे बलिदान दिले. सुभेदार राजेंद्र प्रसाद,राजस्थान, रायफल मॅन मनोज कुमार हरियाणा, रायफल मॅन लक्ष्मनन डी तामिळनाडू,रायफल मॅन निशांत मलिक हरयाणा यांचा समावेश आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ.

भारताचे नव निर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवार दिनांक 11.08.2022 रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. जगदीप धनखड हे भाजपचे नेते आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते.

केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत फेरबदल.

असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी तयार करण्यात आलेली एपीआय म्हणजेच अटल पेन्शन योजना यात सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. एक ऑक्टोबर 2022 पासून जी व्यक्ती आयकर भरत असेल त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 2015 साली या योजनेची सुरुवात करण्यात आली. ही योजना केंद्र सरकार सर्व राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबवते.

स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे व्याकरणातील विविध घटक अभासण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *