Current Affairs Date-06.08.2022

Current Affairs Date-06.08.2022

Current Affairs Date-06.08.2022

Current Affairs Date-06.08.2022-Jagdeep Dhankhad is the new Vice President of India-जगदीप धनखड यांची भारताच्या नव्या उपराष्ट्रपती पदी निवड

दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाली आहे. Current Affairs Date-06.08.2022 जगदीप धनखड हे राजस्थान मधील मूळ रहिवासी आहेत.त्यांनी अनेक वर्षे वकिली केली आहे. तसेच आमदार,खासदार,मंत्री म्हणून काम केले आहे.उपराष्ट्रपती हे भारताच्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.जगदीश धनखड यांचा शपथ विधी दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी पार पडणार आहे.जगदीप धनखड हे पश्चिम बंगाल या राज्याचे माजी राज्यपाल होते.

22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे ने स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.Current Affairs Date-06.08.2022

22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत मूळचा बीड येथील अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे.

अंतिम फेरीत 8 मिनिटे 11.20 सेकंद या राष्ट्रीय विक्रमी वेळेत त्याने रौप्य पदक मिळविले. 3000 मीटर स्टीपल चेस या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा अविनाश साबळे हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. स्टीपलचेस म्हणजे विविध अडथळ्यावरून उंच उड्या मारत धावणे.

शरीरावर टॅटू काढण्यासाठी एकच सुई वापरली आणि 14 जणांना एचआयव्हीचा संसर्ग.

उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात अंगावर टॅटू काढल्यामुळे 14 जणांना एचआयव्ही या संसर्गजन्य रोगाचा रोगाची लागण झाली आहे.

14 जणांनी एकाच सुईने टॅटू बनवले होते. प्रत्येक वेळी नवीन सुई न वापरता एकच सुईने टॅटू काढल्यामुळे हा अतिशय गंभीर प्रकार घडला.

22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये रवी दहिया आणि नवीन कुमार यांना सुवर्णपदके.

बर्मिंगहॅम येथे होत असलेल्या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 74 किलो वजन गटात नवीन कुमार यांनी सुवर्णपदक मिळवले .

तर 57 किलो वजन गटात रवी दहिया याने सुवर्णपदकावर नाव कोरले.

भारतातील विविध क्षेत्रातील प्रथम व्यक्ती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *