Current Affairs 31 August 2022

Current Affairs 31 August 2022

सन 2022 चे रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

Current Affairs 31 August

फिलिपिन्स देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारे मॅगसेसे पुरस्कार यंदा जगातील चार महान Current Affairs 31 August व्यक्तींना जाहीर झाले आहेत.आशिया खंडातील लोकांची निस्वार्थपणे सेवा करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

  • कंबोडिया देशातील मानसोपचार तज्ञ सोथियारा छीम 
  • व्हिएतनाम देशातील हजारो ग्रामीण लोकांवर नेत्रोपचार करणारे जपान देशातील नेत्ररोगतज्ञ तदाशी हातोरी 
  • फिलिपिन्स देशातील मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचार करणारे बालरोग तज्ञ बर्नाडेट मैड्रिड 
  • इंडोनेशिया देशातील नद्या प्रदूषण मुक्त करणारे फ्रान्सचे पर्यावरण कार्यकर्ते गैरी बेनचेघिब 

यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.मनीला येथे 30 नोव्हेंबर 2022 रोजी या पुरस्काराचे वितरण होईल.

महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील भारतीय बनावटीची लस आज पासून उपलब्ध.

Current Affairs 31 August

पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या औषध कंपनीने बनवलेली संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वावॅक लस आज पासून बाजारात उपलब्ध झाली आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील ही लस अत्यंत प्रभावी आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालय यांनी या लसीला परवानगी दिली आहे.भारतामधील महिलाच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड मोठे आहे. भारतात दरवर्षी सुमारे एक लाख 23 हजार महिलांमध्ये या कर्करोगाचे निदान होते. सुमारे 68 हजाराच्या जवळ पास महिला मृत्यूमुखी पडतात.सध्या उपलब्ध असलेल्या लसीच्या तुलनेत ही लस हजार पटींनी परिणामकारक आहे.असे संशोधना मधून निष्पन्न झाले आहे.

सोव्हिएत संघाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन Current Affairs 31 August

सोव्हिएत संघाचे म्हणजेच युनियन ऑफ सोव्हिएत सोशालिस्ट रिपब्लिक्सचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले.

निधनाच्या वेळी त्यांचे वय 91 वर्ष होते. सोव्हिएत संघाचा त्यांनी 25 डिसेंबर 1991 रोजी राजीनामा दिला होता.

राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी सोव्हिएत संघातील अनेक राष्ट्रांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले.

अनेक राष्ट्रांचा संघ असलेला सोव्हिएत संघ एकत्र ठेवण्याचे काम मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी केले होते.

संपूर्ण ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *