Current Affairs Date-23 August 2022

Current Affairs 23 August

सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराने निधन-Current Affairs 23 August

हरियाणा राज्यातील अभिनेत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या असलेल्या सोनाली फोगाट यांचा हृदय विकाराने गोवा येथे मृत्यू झाला त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या होत्या. Current Affairs 23 August तसेच रियालिटी शो बिग बॉस मध्ये त्यांनी भाग घेतला होता.

फोगाट यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूबद्दल घातपाताची शंका उपस्थित केली आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या सरकारचा पेच 5 सदस्य घटनापीठ सोडवणार.

महाराष्ट्र राज्याच्या सत्ता संघर्षाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत आता पाच सदस्य असलेले घटना पीठ निर्णय घेणार आहे.

महाराष्ट्राच्या माजी विधानसभा उपाध्यक्ष यांनी शिवसेनेच्या सोळा आमदाराच्या विरोधात बजावलेली अपात्रतेची नोटीस आणि इतर बाबीचा निर्णय या घटना पिठापुढे होईल. घटनेच्या विविध कलमांचा आणि अनुसूचीचा विचार यावेळी केला जाईल.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण.Current Affairs 23 August

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाली आहे.UAE येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी राहुल द्रविड भारतीय संघासोबत जाणार नाही.

आशिया चषक स्पर्धा 27 ऑगस्ट पासून सुरू होत असून 11 सप्टेंबर रोजी शेवटचा सामना होईल.

भारतीय संघाच्या प्रभारी प्रशिक्षक पदाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात पारस म्हांब्रे यांच्याकडे असेल.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची निवडणूक दोन सप्टेंबर रोजी होणार.Current Affairs 23 August

ए.आय.एफ.एफ AIFF म्हणजेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणी समितीची निवडणूक येत्या दोन सप्टेंबर 2022 रोजी संपन्न होईल. 25 ऑगस्ट पासून नामांकन दाखल करता येतील. सर्वोच्च न्यायालयाने मागील काही दिवसापूर्वी ही निवडणूक लांबणीवर टाकली होती. दरम्यान अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे काळजीवाहू महासचिव सुनंदो धर यांनी फिफाकडे पत्र पाठवून बंदी मागे घेण्याची विनंती केली आहे

दिनांक 15ऑगस्ट 2022 रोजी फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घातली होती.

अदानी समूहाचे न्यूज चॅनल क्षेत्रात पदार्पण

गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने न्यूज चॅनलच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. NDTV म्हणजे न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड या समूहाचे 29 टक्के भाग भांडवल या अदानी समूहाने विकत घेतले आहे.एनडीटीव्ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा चॅनल समूह आहे.

या समूहातर्फे एनडीटीव्ही इंग्रजी न्यूज,एनडीटीव्ही इंडिया हिंदी न्यूज आणि बिझिनेस न्यूज असे तीन राष्ट्रीय चॅनल चालवली जातात.

Current Affairs Date-22 August 2022 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *