नामाचे एकवचन आणि अनेकवचन

Singular And Plural Noun-नामाचे एकवचन आणि अनेकवचन

What is Singular And Plural of Noun-वचन म्हणजे काय ?

मराठी भाषेत किंवा व्याकरणात वचन ही संकल्पना नाम या शब्दाच्या जातीशी संबंधित आहे. Singular And Plural Noun एखाद्या वाक्यातील नामावरून एक किंवा अनेकाची ओळख वा बोध होत असेल त्यास नामाचे वचन असे म्हणतात.एखादी वस्तू एक आहे की एकापेक्षा जास्त आहे हे समजणे म्हणजेच वचन होय.

वचनाचे प्रकार

मराठी व्याकरणात वचनाचे दोन प्रकार आढळतात.

  • एक वचन
  • अनेक वचन

एकवचन-दिलेल्या नामाच्या रूपावरून जेव्हा एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एक वचन असते.नामाचे वचन ओळखण्यासाठी सर्वनामाची मदत घेता येते.सर्वनामावरून एक वचनाची ओळख होते.

एक वचन दर्शवणारी सर्वनामे – मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण.या सर्वनामांचा वापर करून एक वचन ओळखता येते.

अनेक वचन-वाक्यातील नामावरून सेवा अनेक वस्तूचा बोध किंवा ओळख होते तेव्हा तेथे नामाचे अनेक वचन असते.अनेक वचनाची ओळख होण्यासाठी विविध सर्वनामाची मदत होते.

अनेक वचन दर्शवणारी सर्वनामे -आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या, त्या.

काही वेळा नामाचे वचन बदलताना त्या शब्दात काहीही बदल होत नाही. म्हणजेच एक वचन आणि अनेक वचन यासाठी एकच शब्द वापरला जातो. तेव्हा त्या नामाच्या वचनाचा प्रकार वाक्यातील क्रियापदावरून ठरवतात.

उदाहरणार्थ –

रामू पेरू खातो. येथे पेरू एक वचन आहे.

रामूने पेरू खाल्ले. येथे पेरू अनेक वचन आहे.

पुल्लिंगी शब्द एक आणि अनेकवचने.

Singular And Plural Noun
शब्दाचा प्रकारएकवचन-अनेकवचन
सर्व सामान्य शब्द आंबा-आंबे
कुत्रा-कुत्रे
ससा-ससे
मासा-मासे
कावळा-कावळे
बगळा-बगळे
मळा-मळे
कोल्हा-कोल्हे
माळा-माळे
घोडा-घोडे
रस्ता-रस्ते
शब्दाचा प्रकारएकवचन-अनेकवचन
अकारांत शब्द दिवस-दिवस
वार-वार
वीर-वीर  
तीर-तीर
पथक-पथक 
मार्ग-मार्ग
तरुण-तरुण
मित्र-मित्र  
पुत्र-पुत्र  
सैनिक-सैनिक
उमेदवार-उमेदवार
पक्ष-पक्ष
गुन्हेगार-गुन्हेगार
पोलीस-पोलीस
चोर-चोर
गृहस्थ-गृहस्थ
शब्दाचा प्रकारएकवचन-अनेकवचन
इकारांत शब्द शेतकरी-शेतकरी
रोगी-रोगी
धोबी-धोबी
कोळी-कोळी
माळी-माळी
व्यापारी-व्यापारी
शिंपी-शिंपी
ऊकारांत शब्दलाडू-लाडू
पेरू-पेरू
खडू-खडू
चिकू-चिकू
गुरु-गुरु
साधू-साधू
चेंडू-चेंडू

स्त्रीलिंगी शब्द एक आणि अनेक वचने.Singular And Plural Noun

शब्दाचा प्रकारएकवचन-अनेकवचन
सर्व सामान्य शब्द धार-धारा
वाट-वाटा
खाट-खाटा
लाट-लाटा
माळ-माळा
घागर-घागरी
भिंत-भिंती
सहल-सहली
पंगत-पंगती
वरात-वराती
सर-सरी
नथ-नथी
भुवई-भुवया
लढाई-लढाया
रजई-रजया
बाई-बाया
सुई-सुया
चटई -चटया
होडी-होड्या
पोरगी-पोरी
मुलगी-मुली
सोय-सोयी
सासु-सासवा
जाऊ-जावा
गाय-गाई
ऊ-ऊवा
शब्दाचा प्रकारएकवचन-अनेकवचन
सर्व
सामान्य
शब्द
नदी-नद्या
चांदणी-चांदण्या
वाडी-वाड्या
भाकरी -भाकऱ्या
खाडी-खाड्या
साडी-साड्या
नक्कल-नकला
थप्पड-थापडा
पक्कड-पकडी
चप्पल-चपला
किंमत-किंमती
गंमत-गंमती
रक्कम-रकमा
जीभ-जिभा
स्त्री-स्त्रीया
बी-बीया
वीट-विटा
शीर-शिरा
शीग-शिगा
चूक-चूका
बहीण-बहीणी
मिरवणूक-मिरावणूका
मैत्रीण-मैत्रिणी
निवडणूक-निवडणूका
विहीर-विहिरी
सून-सूना
तारीख-तारखा
खारीक-खारका
शब्दाचा प्रकारएकवचन-अनेकवचन
आकारांत शब्द घंटा-घंटा
शाळा-शाळा
प्रार्थना -प्रार्थना
प्रतिज्ञा-प्रतिज्ञा
दिशा-दिशा
भाषा-भाषा
इकारांत शब्दतरुणी-तरुणी
युवती-युवती
देवी-देवी
महिला-महिला
व्यक्ती-व्यक्ति
दासी-दासी
शब्दाचा प्रकारएकवचन-अनेकवचन
उकारांत शब्द वस्तू-वस्तू
वास्तु-वास्तु
वधू-वधू

नपुसकलिंगी शब्द एक आणि अनेकवचने.

शब्दाचा प्रकारएकवचन-अनेकवचन
सर्वसामान्य शब्द झाड-झाडे
गाव-गावे
घर-घरे
दार-दारे
मत-मते
फळ-फळे
गाणे-गाणी
तळे-तळी
खेडे-खेडी
मडके-मडकी
डोके-डोकी
खेळणे-खेळणी
पिल्लू-पिल्ले
लिंबू-लिंबे
वासरू-वासरे
शब्दाचा प्रकारएकवचन-अनेकवचन
सर्वसामान्य शब्दपाखरू-पाखरे
लेकरू-लेकरे
छप्पर-छपरे
डुक्कर-डुकरे
हरिण-हरिणे
गळू-गळवे
लाकूड-लाकडे
देऊळ-देऊळे
शीत-शीते
मुल-मुले
सील-सीले
फुल-फुले
मूळ-मुळे
कोकरू-कोकरे

सन्मानाने मोठ्या असलेल्या आदरणीय व्यक्तींसाठी नेहमी अनेक वचनाचा वापर केला जातो. त्यांना आदरार्थी बहुवचन किंवा आदरार्थी अनेक वचन असे म्हणतात.

येथे क्लिक करून – मराठी व्याकरणातील म्हणी आणि त्यांचे अर्थ जाणून घ्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *