Types Of Tense-काळ प्रकार

Types of Tense Kalache Prakar

Types of Tense Kalache Prakar in Marathi-काळाचे प्रकार

What is Tense ? काळ म्हणजे काय ?

कोणतेही वाक्य हे काही शब्दांचे मिळून तयार झाले असते. प्रत्येक वाक्यात नाम आणि क्रियापद हे असतेच. त्या वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला त्या वाक्यात काय घडते आहे याचा बोध होतो. Types of Tense Kalache Prakar त्या वाक्यातील क्रियापद वाक्यातील कार्याविषयी माहिती देत असते. त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला ते कार्य घडण्याची वेळ समजत असते. क्रियापदावरून वाक्यातील कार्य घडण्याची जी वेळ असते त्यास काळ असे म्हणतात.

Types of Tense Kalache Prakarक्रियापदावरून काळाचे तीन प्रकार

वर्तमान काळ

क्रियापदावरून क्रिया सध्या तात्काळ घडत आहे किंवा क्रिया चालू आहे. याचा बोध होत असेल. तर तेथे त्या क्रियापदाचा वर्तमान काळ आहे असे मानले जाते.

भूतकाळ काळ

क्रियापदावरून वाक्यातील क्रिया घडवून गेली असेल, म्हणजे कार्य पूर्ण झालेले असेल असा बोध होत असेल. तर तेथे क्रियापदाचा भूतकाळ काळ आहे असे समजले जाते.

भविष्यकाळTypes of Tense Kalache Prakar

ज्या वाक्यातील क्रियापदावरून एखादी कार्य भविष्यात घडणार असेल किंवा वाक्यातील क्रिया भविष्यकाळात पुढे केव्हातरी घडेल असा बोध होत असतो. तेथे त्या क्रियापदाचा भविष्यकाळ आहे. असे संबोधले जाते.क्रियापदाचा काळ कोणता आहे हे खालील उदाहरणावरून आणखी स्पष्ट होईल

वाक्य अर्थ काळ
रामू अभ्यास करतो.
आई गावाला जात आहे.
मी व्यायाम करतो.
या वाक्यात अभ्यास करण्याची क्रिया,गावाला जाणे आणि व्यायाम करणे हे सध्या चालू आहे,घडत आहे.
म्हणून येथे क्रियापदाचा वर्तमानकाळ आहे.
वर्तमानकाळ
रामूने अभ्यास केला.
आई गावाला गेली.
मी व्यायाम केला
.
या वाक्यात अभ्यास करण्याची क्रिया,गावाला जाणे आणि व्यायाम करणे हे पूर्ण झाले आहे,
म्हणून येथे क्रियापदाचा भूतकाळ आहे.
भूतकाळ
रामू अभ्यास करेल.
आई गावाला जाईल.
मी व्यायाम करेन.
या वाक्यात अभ्यास करण्याची क्रिया, गावाला जाणे आणि व्यायाम करणे हे पुढे केव्हातरी होणार आहे,
हे कार्य घडण्याची घडण्याची क्रिया भविष्यात कधीतरी होईल म्हणून येथे क्रियापदाचा भविष्यकाळ आहे.
भविष्यकाळ

सर्वनामे आणि रडणे या क्रियापदाचा तीनही काळातील तक्ता

सर्वनामवर्तमान काळभूतकाळभविष्यकाळ
मीरडतोरडलोरडेन
आम्हीरडतोरडलोरडू
तु रडतोसरडलासरडशील
तुम्हीरडतारडलातरडाल
तोरडतोरडलारडेल
ती ( एकवचन )रडतेरडलीरडेल
ते ( एकवचन )रडतेरडलेरडेल
ते ( अनेकवचन )रडतातरडलेरडतील
त्यारडतातरडल्यारडतील
ती ( अनेकवचन )रडतातरडलीरडतील

संख्या आणि त्यांचे प्रकार अतिशय सोप्या भाषेत जाणून घ्या

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *