समूहदर्शक,पिलूदर्शक,घरदर्शक शब्द

समूह,पिलू आणि घरदर्शक शब्द

collective baby house words

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच तलाठी, पोलीस आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी भाषेच्या पेपरमध्ये भाषा ज्ञान तपासण्यासाठी विविध घटकावर प्रश्न विचारले जातात. collective baby house words त्यात शब्द संपत्ती वरील प्रभुत्व तपासले जाते. त्यासाठी समूहदर्शक शब्द, घरदर्शक शब्द आणि पिल्लू दर्शक शब्द यावर आधारित प्रश्नांचा समावेश असतो. त्याचा सराव आणि अभ्यास व्हावा यासाठी पुढील भागात वरील तीनही घटकावर भरपूर शब्दसमूहांचा समावेश केला आहे.

समूहदर्शक शब्द collective baby house words

कोणत्याही एका वस्तू साठी एक विशिष्ट नाव असते परंतु तू त्या वस्तूच्या प्राण्याच्या समूहासाठी मात्र वेगळे नाव वापरले जाते.एक वस्तू आणि वस्तूंचा समूह यासाठी वेगवेगळ्या शब्दांची योजना केलेली असते त्यालाच समूह दर्शक शब्द असे म्हटले जाते. उदाहरणार्थ – एक पक्षी असेल तेव्हा पक्षी परंतु अनेक पक्षी याबद्दल जेव्हां बोलायचे असेल त्यावेळी पक्षांचा थवा असा शब्दप्रयोग केला जातो.

  • किल्ल्यांचा-जुडगा
  • दरोडेखोरांची-टोळी
  • ताऱ्यांचा-पुंजका
  • नाण्यांची-चळत
  • प्रश्नपत्रिकांचा-संच किंवा गठ्ठा
  • पुस्तकांचा-संच किंवा गठ्ठा
  • मडक्यांची-उतरंड
  • लाकडाची-मोळी
  • उसाची-मोळी
  • धान्याचा-ढीग
  • नोटांचे-बंडल
  • आंब्याची-राई
  • फळांचा-घोस
  • बांबूचे-बेट
  • मातीचा-ढिगारा
  • पक्षांचा-थवा
  • गुरांचा-कळप
  • उंटांचा-तांडा
  • हत्तीचा-कळप
  • हरिणांचा-कळप
  • प्रवाशांची-गर्दी किंवा झुंबड
  • खेळाडूंचा-संघ
  • मुंग्यांची-रांग
  • फुलांचा-गुच्छ
  • वेलींचा-कुंज
  • विमानाचा-ताफा
  • जहाजांचा-काफीला
  • वाद्यांचा-वृंद
  • माणसांचा-जमाव
  • महिलांचे-मंडळ
  • मेंढ्यांचा-कळप
  • मुलांचा-घोळका
  • विद्यार्थ्यांचा-गट
  • साधूंचा-जथा
  • सैनिकांची-तुकडी
  • करवंदाची-जाळी
  • नारळाचा-ढीग
  • धान्याची-रास
  • द्राक्षांचा-घड
  • गवताची-गंजी
  • गवताचा-भारा
  • केळ्यांचा-घड
  • घरांची-चाळ किंवा गल्ली
  • पिकत घातलेल्या आंब्याची-आढी
  • वारकऱ्यांची-दिंडी

Baby related words-पिलुदर्शक शब्द

मराठी भाषेमध्ये विविध प्राण्यांच्या पिलांना वेगवेगळी नावे आहेत.जसे हरिनाच्या पिलाला पाडस असे म्हटले जाते.

  • माणसाचे-बाळ किंवा लेकरू
  • गाईचे-वासरू
  • गाढवाचे-शिंगरू
  • घोड्याचे-शिंगरू
  • मांजराचे-पिल्लू
  • बकरीचे-बकरू किंवा करडू
  • मेंढीचे-कोकरू
  • म्हशीचे-रेडकू
  • वाघाचा-बच्चा किंवा बछडा
  • सिंहाचा-छावा
  • कुत्र्याचे-पिल्लू
  • हरिणाचे-पाडस
  • माकडाचे-पिल्लू

House of Animals related Words-घरदर्शक शब्द

माणूस हा घरात राहतो.माणसाच्या घराला घर असे म्हणतात.तसेच इतर अनेक सजीवही आपल्या घरात राहतात. काही सजीव स्वतःचे घर बनवतात तर काही पशुपक्षी नैसर्गिक असलेल्या आपल्या घरात राहतात. प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक घराला वेगळे नाव आहे.

  • गाईचा-गोठा
  • उंदराचे-बिळ
  • कोंबडीचे-खुराडे
  • चिमणीचे-घरटे
  • कावळ्याचे-घरटे
  • घोड्यांचा-तबेला किंवा पागा
  • पोपटाचा-पिंजरा किंवा ढोली
  • माणसाचे-घर
  • मधमाशांचे-पोळे
  • वाघाची-गुहा
  • सिंहाची-गुहा
  • घुबडाची-ढोली
  • हत्तींचा-हत्तीखाना किंवा अंबारखाना
  • मुंग्याचे-वारूळ
  • म्हशीचा-गोठा
  • ढेकूण-लाकडाची फट

मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचे अर्थ जाणून घ्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *