वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग

Marathi Vakprachar vakyat upyog

Marathi Vakprachar vakyat upyog-७५ वाक्प्रचार अर्थ आणि वाक्यात उपयोग

सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त Marathi Vakprachar vakyat upyog असणारे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ  या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहेत. त्याच सोबत प्रत्येक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग ( वा.उ ) सुद्धा करून दाखवलेला आहे.वाक्प्रचार आणि वाक्यातील उपयोग वाचल्यामुळे नक्कीच त्या वाक्प्रचाराचा अर्थ आणखी स्पष्ट होईल आणि कायम साठी लक्षात राहील. 

Marathi Vakprachar vakyat upyog-सर्वसामान्य वाक्प्रचार अर्थ आणि वाक्यात उपयोग

 • अनर्थ गुदरणेएका एकी मोठे संकट येणे-लग्न सोहळा चालू असताना वादळाच्या रूपाने अनर्थ गुदरला. 
 • अवदसा आठवणेअविचाराने वागणे-परवाच्या कार्यक्रमात मला उगाचच अवदसा आठवली. 
 • अव्हेर करणेदूर लोटणे,दुर्लक्ष करणे-काही दिवसापासून माझा जवळचा मित्र मला अव्हेर करू लागला. 
 • ऊत येणेअतिरेक होणे-दररोज गावातल्या बागेत उनाड मुलांचा ऊत येतो. 
 • उहापोह करणेचर्चा करणे-वडिलांनी ताईच्या लग्नाबाबत काकांशी ऊहापोह केला . 
 • कायापालट होणेपूर्णपणे स्वरूप बदलणे-मागच्या वर्षी बदलून आलेल्या सरांनी शाळेचा कायापालट केला.  
 • कास धरणेएखाद्याचा आश्रय घेणे-आई वारलेल्या रामूने आता मामाची कास धरली.  
 • काहूर माजणेविचारांचा गोंधळ उडणे-महात्मा फुले यांचे ते पुस्तक वाचून माझ्या डोक्यात काहूर माजले.  
 • गाळण उडणेभीतीने गांगरून जाणे-दप्तरात पाल पाहून राधाची गाळण उडाली.  
 • छाप पडणेमनावर परिणाम होणे-सरांच्या भाषणाची माझ्यावर छाप पडली.  
 • जगातून उठणेबेअब्रू होणे-थोड्याशा चुकीच्या वागण्यामुळे रामू जगातून उठला. 
 • जन्माचे सार्थक होणेकार्य यशस्वी होणे-स्पर्धा परीक्षेत रामूने यश मिळवले यामुळे त्याच्या जन्माचे सार्थक झाले. 
 • जन्माचे दारिद्रय फिटणेगरिबी नाहीशी होणे -रामूच्या नोकरी लागल्यामुळे काकूचे जन्माचे दारिद्र फिटले. 
 • तडीस नेणेयशस्वी रीतीने पूर्ण करणे-दिनेशने बारावीचा अभ्यास तडीस नेला.  
 • दशा होणेवाईट अवस्था होणे-शेजारच्या आजीची खूप दशा झाली आहे.  
 • निभाव लागणे-टिकाव लागणे-फुटबॉलच्या मॅचमध्ये पुढच्या टीमचा निभाव लागला नाही.
 • ब्रम्हांड आठवणे-मोठे संकट येणे-आई आजारी पडल्यामुळे बाबाला ब्रम्हांड आठवले.
 • भगीरथ प्रयत्न करणे-चिकाटीचे प्रयत्न करणे -रामूने बारावी पास होण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले.
 • भारून टाकने-पूर्णपणे मोहुन टाकने -रस्त्यावरच्या गाणाऱ्याने आम्हाला भारून टाकले.
 • भुरळ पाडणे-आकर्षित करणे-बागेतील फुलांची मला भुरळ पडली.
 • रडकुंडीस येणे-अतिशय त्रास होणे-घराचे काम करताना बाबा रडकुंडीस आले.
 • राम म्हणणे-शेवट होणे किंवा मृत्यू येणे -शेजारच्या म्हातारीने काल राम म्हटले.
 • शर्थ करणे-पराकाष्टा करणे-कालच्या मॅच मध्ये भारताने शर्थ केली आणि विजय मिळवला.
 • क्षिती न बाळगणे-पर्वा न करणे-नाटकात काम करण्यासाठी रामूने कुणाचीही क्षीती बाळगली नाही.

Marathi Vakprachar vakyat upyog about things-वस्तूच्या नावाचे वाक्प्रचार

 • सोने होणेउत्तम स्थिती प्राप्त होणे-पुण्याला नोकरी लागल्यामुळे बाळूचे सोने झाले.
 • सुवर्णमध्य साधणे-तडजोड करणे-दोन भावांच्या भांडणात मामाने सुवर्णमध्य साधला.
 • राख होणे-पूर्णपणे नष्ट होणे-अमेरिकेच्या हल्ल्यात हिरोशिमा शहराची राख झाली.
 • मोट बांधणे-अशक्य गोष्ट करू पाहणे-मामाने मोट बांधून घराचे काम पूर्ण केले.
 • मेख मारणे-विघ्न आणणे-रस्त्याच्या कामात शेजाऱ्यांनीच मेख मारली.
 • मुसळाला अंकुर फुटणे-अशक्य गोष्टी घडून येणे-शेजारचा बाळू बारावी पास झाला आणि मुसळाला अंकुर फुटले.
 • भोवऱ्यात सापडणे-अडचणीत येणे-ताईच्या आजारपणामुळे बाबा भोवऱ्यात सापडले.
 • मुसक्या बांधणे-करकचून पकडणे-पोलिसाने चोराच्या मुसक्या बांधल्या.
 • पैजेचा विडा उचलणे-प्रतिज्ञा करणे-शिवाजीला संपवण्याचा अफजलखानाने पैजेचा विडा उचलला.
 • बोळ्याने दूध पिणे-बुद्धिहीन असणे-आमच्या शेजारचा बाळू अजूनही गोळ्याने दूध पितो.
 • तलवार गाजवणेपराक्रम करणे-पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी तलवार गाजवली.  
 • तळ ठोकणे-मुक्काम करणे-साताऱ्याचे बाबा पाच दिवसापासून तळ ठोकुन आहेत.
 • घोडे मारणेनुकसान करणे-राम मला बोलत नाही मी त्याला म्हणालो,“मी तुझे काय घोडे मारले ?” 
 • घोडे पेंड खाणेअडचण निर्माण होणे-चालू असलेल्या रस्त्याच्या कामात घोड्याने पेंड खाली. 
 •  घर डोक्यावर घेणेअतिशय थयथयाट करणे -रामूला पेन आणला नाही म्हणून त्याने घर डोक्यावर घेतले.  
 • काडीमोड घेणेसंबंध तोडणे-खोटारड्या रामुशी मी काडीमोड घेतला. 
 • अन्न अन्न करणे-खायला अन्न न मिळणे-चार दिवसापासून रस्त्याच्या पलीकडची म्हातारी अन्न अन्न करत होती. 
 • आसमान ठेंगणे होणे-अतिशय गर्व होणे-स्पर्धा परीक्षा पास झाल्याने गणेशला आसमान ठेंगणे झाले.
 • गावी नसणे-माहिती नसणे-बाहेर पाऊस पडतोय हे बाबांच्या गावीही नाही.
 • पाणी दाखवणे-सामर्थ्य दाखवणे-कबड्डीच्या मैदानात छोट्याशा रामूने आपले पाणी दाखवले.
 • पाढा वाचणे-सविस्तर माहिती सांगणे-बाबा घरी आल्यावर मी रामूच्या तक्रारीचा पाढा वाचला.
 • मुळावर येणे-नाशास कारण होणे-राम दहावीला नापास झाला,त्याचा मित्र त्याच्या मुळावर आला.
 • अक्कल गुंग होणे-बुद्धी न चालणे-हिमालयाचे अतिविराट रूप पाहून माझी अक्कल गुंग झाली. 

vakyat upyog on orguns-अवयवाच्या नावावरून वाक्प्रचार

 • कपाळ उठणेत्रास होणे,डोके दुखणे-शेजारच्या भोंग्यामुळे बाबाचे कपाळ उठले. 
 • उराशी बाळगणेमनात ठेवणे-स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम येण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले आहे . 
 • अंगावर घेणेजबाबदारी स्वीकारणे-दादाने लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम अंगावर घेतला . 
 • अंगाचा तिळपापड होणेअतिशय संताप येणे -परिक्षेला उशिरा आलेल्या रामूला पाहून गुरुजींच्या अंगाचा तिळपापड झाला .  
 • नांगी टाकने-हात पाय गाळणे-तळपत्या उन्हात मजुरांनी नांगी टाकली.
 • कपाळ फुटणेदुर्दैव ओढवणे-गणेशच्या अपघाताने शेजारच्या काकूचे कपाळ फुटले . 
 • छातीचा कोट करणेजिद्दीने मुकाबला करणे -काका वारल्यावर काकूने छातीचा कोट करून मुलांना वाढवले.  
 • कानाशी लागणे-चहाड्या करणे-शेजारची पूजा नेहमी माझ्याबद्दल सीमाच्या कानाशी लागते.  
 • कान टोचणेसमजावून सांगणे-दादाने अभ्यासाबद्दल रामूचे कान टोचले.  
 • चतुर्भुज होणेलग्न करणे-मागच्या रविवारी राजू चतुर्भुज झाला. 
 • तोंड टाकणेअद्वातद्वा बोलणे-खिडकीला चेंडू लागल्यामुळे आजोबाने तोंड टाकले.  
 • तोंड पूजा करणे-खोटी प्रशंसा करणे-रामू नेहमी गजाननची तोंड पूजा करतो.
 • तोंडाला पाणी सुटणेलोभ उत्पन्न होणे-गळाला अडकवलेली भाकरी पाहून माशाच्या तोंडाला पाणी सुटले. 
 • दाताच्या कण्या करणे-खूप समजावणे-रामूला बाबांनी अभ्यासाविषयी अभ्यास करण्याविषयी दाताच्या कण्या केल्या.
 • दातखिळी बसणे-बोलणे अवघड होणे -नवरा-बायकोच्या भांडणात शेजार्‍याची दातखिळी बसली.
 • दाती तृण धरणे-शरणागती पत्करणे-मागील क्रिकेट च्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाने दाती तृण धरले.
 • पाठीचे धिरडे करणे-खूप मारणे-अभ्यास केला नाही म्हणून मामाने माझ्या पाठीचे धिरडे केले.
 • पोटात शिरणे-मर्जी संपादन करणे -महिन्याभरापूर्वी आलेला रामू बाबाच्या पोटात शिरला.
 • पोटात घालने-क्षमा करणे-शेजारच्या रामूने बाळाला मारले तरीही बाबाने त्याला पोटात घातले.
 • पित्त खवळलेखूप राग येणे किंवा रागावणे -पांगवलेला पसारा पाहून आईचे पित्त खवळले.
 • मुठीत ठेवणे-ताब्यात ठेवणे-नवीनच आलेल्या वहिनीने दादाला मुठीत ठेवले आहे.
 • मुठ माती देणे-अंत्यक्रिया उरकणे-बाहेर गावी वारलेल्या पाहुण्यांना तेथेच मुठ माती दिली.
 • मुठ दाबणे-लाच देणे-आज-काल प्रत्येक कार्यालयात मुठ दाबूनच काम करतात.
 • रक्ताचे पाणी करणे-अतिशय मेहनत करणे -स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी मुले रक्ताचे पाणी करतात.

हे वाचा –मराठी भाषेतील ७५ म्हणी आणि त्यांचे अर्थ.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *