शब्द समुहाबद्दल एक शब्द

word about a phrase
शब्द समुहाबद्दल एक शब्द
आग विझवनारे यंत्र – अग्निशामक यंत्र

मराठी भाषेत बोलताना अनेक वेळा शब्द समूहाचा शब्द समुहाबद्दल एक शब्द-word about a phrase वापर करावा लागतो.

वेळी भला मोठा शब्दसमूह वापरणे संयुक्तिक होत नाही.

त्या ऐवजी शब्द समुहाबद्दल एक शब्द वापरला तर भाषा अधिक समृद्ध वाटते. ते वाक्य ऐकणारालासुद्धा ऐकायला चांगले वाटते.

कमी शब्दात आपले म्हणणे मांडणे कधीही प्रभावशाली असते. नेहमी शब्द समुहाबद्दल एक शब्द वापरला पाहिजे.

अनेकदा शब्दसमूह वापरल्याने ते वाक्य खूपच लांब होते,

समजण्यास अवघड वाटते. त्याऐवजी शब्द समुहाबद्दल एक शब्द वापरुन आपण वाक्याची लांबी कमी करू शकतो.

शब्द समुहाबद्दल एक शब्द वापरल्याने वाक्याचा अर्थ अजिबात बदलत नाही.

Shabd Samuhabaddal Ek Shabd-शब्द समुहाबद्दल एक शब्द

Shabd Samuhabaddal Ek Shabd part-one

अरण्याचा किंवा वनाचा राजा वनराज
अरण्याची शोभावनश्री
अनेक ठिकाणी लक्ष ठेवणाराअष्टावधानी
आग विझवनारे यंत्रअग्निशामक यंत्र
आपल्या लहरी प्रमाणे वागणारास्वच्छंदी
ईश्वर आहे असे मानणाराआस्तिक
ईश्वर नाही असे मानणारानास्तिक
इनाम म्हणून मिळालेली जमीनवतन
उंचावरून कोसळणारा किंवा पडणारा पाण्याचा प्रवाहधबधबा
ऐकायला न येणाराबहिरा
बोलायला न येणारामुका
भाषण करणारावक्ता
भाषण ऐकणाराश्रोता
कथा सांगणाराकथेकरी
कथा ऐकणाराश्रोता
कथा लिहिणाराकथाकार
लेख लिहिणारालेखक
कविता लिहिणाराकवी
अंग राखून काम करणाराअंग चोर
कल्पना नसताना आलेले संकटघाला
कधीही जिंकला न जाणाराअजिंक्य
कर्तव्याकडे पाठ फिरवणाराकर्तव्य परमुख
आपले कर्तव्य तात्काळ पार पाडणाराकर्तव्यदक्ष
कष्ट करून जगणाराकष्टकरी  किंवा श्रमजीवी
कसलीच इच्छा नसणारानिरिच्छ
गाणे गाणारागायक
कविता रचणारीकवयित्री
कमी आयुष्य असणाराअल्पायुषी
भरपूर कष्ट आयुष्य असलेलादीर्घायुषी
कमी वेळ टिकणाराअल्पजीवी, क्षणभंगुर
कादंबऱ्या लिहिणारा किंवा लिहिणारी व्यक्तीकादंबरीकार
किल्ल्याच्या सभोवताली असणारी भिंततट किंवा तटबंदी
कुस्ती खेळण्याची जागा किंवा मैदानआखाडा किंवा हौद
दुसऱ्याने केलेले उपकार जाणणाराकृतज्ञ
दुसऱ्याने केलेले उपकार विसरणाराकृतघ्न
कैदी किंवा बंदी ठेवण्याची जागाकारागृह किंवा बंदीशाळा किंवा बंदीगृह
शिक्षा झालेला आरोपीबंदिवान
खूप दानधर्म करणारा व्यक्तीदानशूर किंवा दानवीर
खूप मोठा विस्तार असलेले शेत किंवा मैदानविस्तीर्ण किंवा ऐसपैस
खूप पाऊस पडणे अतिवृष्टी
गाई गुरांसाठी बांधलेले घरगोठा
घोड्यांसाठी बांधलेले घर किंवा घोडे बांधायची जागा तबेला
घरदार किंवा संसार नष्ट झाला निर्वासित

Part two Shabd Samuhabaddal Ek Shabd

चरित्र लिहिणारा व्यक्तीचरित्रकार
चार रस्ते एकत्र येतात ती जागाचौक किंवा चव्हाटा
तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण किंवा जागातिठा
अनेक लोक एकत्र येतातगर्दी
चांदण्या रात्रीचे पंधरा दिवस किंवा पंधरवाडाशुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष
चित्रे काढणारा व्यक्तीचित्रकार
जमिनीखाली राहणारे विविध प्राणीभूचर
समुद्रात किंवा पाण्यात राहणारे विविध प्राणीजलचर
पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणीउभयचर
जमिनी खाली असलेला गुप्त मार्ग किंवा रस्ताभुयार
जमिनीचे दान करणेभूदान
अचानक पणे जमीन हलायला लागणेभूकंप
जादूचे खेळ दाखवणारा व्यक्तीजादूगार
ज्याला आई-वडील नाहीत असा मुलगा किंवा मुलगीअनाथ/पोरका/पोरकी
ज्याच्या हातात चक्र आहे असा व्यक्तीचक्रधर/चक्रपाणि
ज्याला मरण नाही असा व्यक्तीअमर
ज्याला शत्रू नाही असा व्यक्तीअजात शत्रू
ज्याला लाज नाही असा व्यक्तीनिर्लज्ज
ज्याची खोली मोजता येत नाही किंवा ज्याला तळ नाही असाअथांग
दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमान पत्रदैनिक
ठराविक दिवसाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे पत्रनियतकालिक
सात दिवस किंवा आठवड्याने प्रसिद्ध होणारे पत्रसाप्ताहिक
एक महिना किंवा तीस दिवसाने प्रसिद्ध होणारे पत्रमासिक
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे पत्रत्रैमासिक
दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे पत्रषण्मासिक
दर वर्षाला किंवा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे चित्रवार्षिक
ढगांनी भरलेले आभाळढगाळलेले
थोड्या वर संतुष्ट असणारा व्यक्तीअल्पसंतुष्ट
दररोजचा ठरलेला कार्यक्रम किंवा नित्यक्रमदिनक्रम
दारावर दारावर उभा असलेला व्यक्ती किंवा पहारेकरीद्वारपाल किंवा दारवान
दुष्काळात सापडलेले लोकदुष्काळग्रस्त
दुसऱ्यावर अवलंबून असलेला व्यक्तीपरावलंबी
दुसऱ्यावर अवलंबून असलेला व्यक्ती किंवा माणूसस्वावलंबी
दोन नद्या एकत्र येतात ते ठिकाणसंगम
देशाची सेवा करणारा व्यक्तीदेशसेवक
लोकांची सेवा करणारा व्यक्तीलोकसेवक
लोकांचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्तीलोकप्रतिनिधी
समाजाची सेवा करणारा व्यक्तीसमाजसेवक
देवापुढे सतत जळणारा दिवानंदादीप
दुसऱ्यावर उपकार करणारा व्यक्तीपरोपकारी

Part threeShabd Samuhabaddal Ek Shabd

धान्य ठेवण्याची किंवा साठवण्याची जागाकोठार
नदीची सुरुवात होते ते ठिकाणउगम
नदी समुद्राला जाऊन मिळते ते ठिकाणनदीचे मुख
नदीच्या खोलगट भागात साचलेल्या पाण्याची खोल जागाडोह
नाटक लिहिणारा व्यक्तीनाटककार
नाटकात वा चित्रपटात काम किंवा भूमिका करणारा व्यक्तीनट,नटी किंवा अभिनेता,अभिनेत्री
नाव किंवा गाडी चालवणारानावाडी किंवा नाखवा किंवा नाविक
नेहमी घरात बसून राहणार व्यक्तीघरकोंबडा
पहाटे पूर्वीची वेळउषा:काल
मुळीच पाऊस न पडणेअनावृष्टि किंवा अवरशन
पायापासून डोक्यापर्यंतचा भागआपाद मस्तक
पायात जोडे नसलेला व्यक्तीअनवाणी
पाहण्यासाठी आलेले लोकप्रेक्षक
पायी जाणारा व्यक्तीपादचारी
पाण्याच्या खालून जाणारी बोट पाणबुडी
पुराच्या पाण्यामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे असे लोकपुरग्रस्त
पूर्वी कधी घडला नाही असा प्रसंगअभूतपूर्व
प्रेरणा देणारा व्यक्तीप्रेरक
फुकट भोजन व जेवण मिळण्याचे ठिकाणसदावर्त किंवा अन्नछत्र
राज्यातील लोक किंवा माणसेप्रजाजन,रयत किंवा प्रजा
विकत जेवण मिळण्याचे ठिकाणखानावळ
फुकट वा विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाणपाणपोई
बसगाड्या थांबण्याचे ठिकाणबसस्थानक
विमाने थांबण्याचे ठिकाणविमानतळ
आगगाडी थांबण्याचे ठिकाणरेल्वेस्टेशन
बातमी आणून देणारा व्यक्तीबातमीदार
बातम्या वाचणारा व्यक्तीवृत्त निवेदक किंवा वृत्त निवेदिका
मन किंवा चित्त आकर्षित करणारामनोहर,मनोवेधक,चित्तवेधक किंवा चित्ताकर्षक
मालाचा साठा करून ठेवण्याची जागाकोठार,गोदाम किंवा वखार
माकडाचा खेळ करून दाखवणारा व्यक्तीमदारी
मासे पकडणारा व्यक्तीकोळी
मूर्ती बनवणारा व्यक्तीमूर्तिकार
मूर्तीची पूजा करणारा व्यक्तीमूर्तिपूजक
मूर्तीची मोडतोड करणारा व्यक्तीमूर्तीभंजक
मंदिरात पूजा करणारा व्यक्तीपुजारी
मोजता येत नाही असेअगनिक
महान असा ऋषीमहर्षी
मृत्यू वर विजय मिळवणारा व्यक्तीमृत्युंजय
योजना आखणारा व्यक्तीयोजक
रनांगणावर आलेले मरणवीरमरण
रक्षण करणारा व्यक्तीरक्षक
रात्रीचा पहारा देणारा व्यक्तीजागल्या

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Shabd Samuhabaddal Ek Shabd

रोग्याचा उपचार करणारा व्यक्तीडॉक्टर
रोग्याचा सेवा सुश्रुषा करणारी व्यक्तीपरिचारिका
लग्नासाठी जमलेली माणसेवऱ्हाडी
लढण्याची विद्या किंवा शिक्षणयुद्धकला
लाखो रुपयांचा मालकलक्षाधीश
कोटी रुपयांचा मालककोट्याधीश
लिहिता वाचता येणारा व्यक्तीसाक्षर
लिहिता वाचता न येणारा व्यक्तीनिरक्षर
लोकांचा आवडता व्यक्तीलोकप्रिय
लोकांनी मान्यता दिलेला व्यक्तीलोकमान्य
लोकांचे नेतृत्व करणारा व्यक्तीलोकनायक
वनात किंवा जंगलात राहणारे प्राणीवनचर
वनात किंवा जंगलात राहणारे माणसेवनवासी
डोंगराच्या कपारीत राहणारे लोकगिरीजन
वाड वडीलाकडून मिळालेली संपत्तीवडिलोपार्जित
विमान चालवणारी व्यक्तीवैमानिक
वाहन चालवणारी व्यक्तीचालक
व्याख्यान देणारा व्यक्तीव्यक्ती
शत्रूच्या गोटातील बातमी काढणारा व्यक्तीहेर
शत्रूला सामील झालेला व्यक्तीफितूर
शिकारी साठी उंचावर बांधलेला मळामचान
शेती करणारा व्यक्तीशेतकरी
शोध लावणारा व्यक्तीसंशोधक
सर्व इच्छा पूर्ण करणारे झाडकल्पवृक्ष
सर्व इच्छा पूर्ण करणारी गायकामधेनु
संकट दूर करणाराविघ्नहर्ता किंवा संकट मोचक
सांगितले तेवढेच काम करणारासांगकाम्या
सिनेमाच्या कथा लिहिणारापटकथाकार किंवा लेखक
कायम सुखाच्या मागे लागणारासुखलोलुप
स्वतः संपादन केलेलीस्वसंपादित
स्वतः काम न करता खाणाराऐतखाऊ
स्वतः च्याच फायद्याचा विचार करणारा स्वार्थी
स्वतः बद्दल अभिमान असलेलास्वाभिमानी
स्वतः बद्दल अभिमान नसलेलास्वाभिमानशून्य
दुसऱ्याला सहज काहीही देणारा उदार किंवा दिलदार
स्वदेशीचा अभिमान असलेलास्वदेशभिमानी
दुसऱ्याची सतत स्तुती करनाराभाट
हत्तीला काबूत ठेवणारा व्यक्तीमाहूत
हरिनासारखी डोळे असणारी स्रीमृगनयना,मृगाक्षी,हरिनाक्षी,कुरंग नयना.
हिंडून करायचा पहारा किंवा राखणगस्त
हिमालयापासून कन्या कुमारी पर्यंत आसेतू हिमालय
पंचवीस वर्षांनी साजरा केलेला महोत्सवरौप्य महोत्सव
पन्नास वर्षांनी साजरा केलेला महोत्सवसुवर्ण महोत्सव
दगडाचे काम करणारा व्यक्तीपाथरवट
सतत काम करणारा व्यक्तीदीर्घोद्योगी

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *