चालू घडामोडी दिनांक-24 सप्टेंबर 2022

चालू घडामोडी दिनांक-24 सप्टेंबर

मुंबई शहराचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सीबीआयकडून अटक Chalu Ghadamodi 24 September 2022

2009 ते 2017 या काळात भारतीय टेलिग्राफ कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन करून राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या दूरध्वनी अभिवेक्षण केले. हा आरोप ठेवून जुलै 2022 मध्ये सीबीआयने संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. Chalu Ghadamodi 24 September 2022 त्याच प्रकरणात संजय पांडे यांना शनिवारी दिल्ली येथून अटक करण्यात. संजय पांडे हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते.


वीस ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडररचा टेनिसला निरोप

स्वित्झर्लंड देशाचा महान टेनिस खेळाडू रॉजर फेडररने टेनिस खेळातून निवृत्ती पत्करली आहे. रॉजरने त्याच्या क्रीडा जीवनात वीस ग्रँड स्लॅम पदके मिळवली होती.लेव्हर चषक स्पर्धेतील दुहेरी सामन्याच्या अखेरच्या लढतीत फ्रान्सिस आणि जॅक सॉक या जोडीकडून रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या जोडीला पराभव पत्करावा लागला. हा सामना रॉजरच्या क्रीडा जीवनातील शेवटचा सामना ठरला. त्याने टेनिस खेळातून निवृत्ती जाहीर केली.


महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर

एकनाथ शिंदे सरकारमधील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पालकमंत्री हे जिल्ह्याचे जिल्हा नियोजन समिती तसेच इतर सरकारी कामकाजाचे प्रमुख असतात. महाराष्ट्रातील नवीन पालकमंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे..

 1. दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर
 2. अतुल सावे – जालना, बीड
 3. शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
 4. मंगल प्रभात लोढा – मुंबई उपनगर
 5. राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर
 6. चंद्रकांत दादा पाटील – पुणे
 7. विजयकुमार गावित – नंदुरबार
 8. गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड
 9. गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
 10. सुरेश खाडे – सांगली
 11. संदीपान भुमरे – औरंगाबाद
 12. उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
 13. तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद
 14. रवींद्र चव्हाण -पालघर सिंधुदुर्ग
 15. अब्दुल सत्तार – हिंगोली
 16. देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली
 17. सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया
 18. दादा भुसे – नाशिक
 19. संजय राठोड – यवतमाळ, वाशिम

महाराष्ट्राचे २५ मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *