चालू घडामोडी दिनांक-29 सप्टेंबर 2022

Chalu Ghadamodi 29 Saptembar

24 आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपात प्रत्येक महिलेचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.Chalu Ghadamodi 29 Saptembar

महिला विवाहित असो किंवा अविवाहित 24 आठवड्या पर्यंत सुरक्षित गर्भपात हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे असा महत्त्वपूर्ण निकाल Chalu Ghadamodi 29 Saptembar सर्वोच्च न्यायालयाने दिला.

 • भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत कोणत्याही महिलेला मुल जन्माला घालावे की न घालावे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. 
 • कायद्यान्वये बलात्कार पीडीत,अल्पवयीन,अपंग महिलांना 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. 
 • विधवा किंवा अविवाहित महिलांना कायद्यान्वये 20 आठवड्या पर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. 
 • नवीन नियमानुसार सर्व महिलांना स्वच्छेने 24 आठवड्या पर्यंत कायद्याने गर्भपात करता येईल.
 • वैद्यकीय गर्भपात कायद्याची सुस्पष्ट व्याख्या करण्याचा हा निकाल न्या.धनंजय चंद्रचूड, न्या.जे पी पारडीवाला, यांच्या खंडपीठाने दिला.

युक्रेन देशाचे चार प्रदेश दिनांक 30 सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या रशियात विलीन करण्यात येणार.Chalu Ghadamodi 29 Saptembar

मागील काही काळापासून सुरू असलेल्या युक्रेन रशिया युद्धामध्ये रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेन देशातील चार प्रदेशाचे रशियात अधिकृतरित्या विलिनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 • युक्रेन मधील डोनेट, खेरसन, लूनांस्क आणि झापोरिझिया या भागावर रशियाने नियंत्रण केले होते. 
 • या भागात रशियन सरकारने जनतेचे सार्वमत घेतले गेले.
 • या चारही प्रदेशात जनतेने रशियात विलीन होण्याच्या बाजूने कौल दिला आहे.
 • रशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आहे.
 • क्रेमलीन मधील जॉर्ज सभागृहात या विलीनीकरणाच्या करारावर सह्या करण्यात येतील.

उत्तर प्रदेश मधील समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी अखिलेश यादव यांची बिनविरोध निवड.

उत्तर प्रदेश राज्यातील सध्याचा विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखिलेश यादव यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे.

 • समाजवादी पक्षाची स्थापना ऑक्टोबर १९९२ करण्यात आली. 
 • मुलायम सिंग यादव पक्षाचे माजी अध्यक्ष होते. 
 • अखिलेश यादव यांची 1 जानेवारी 2017 रोजी पहिल्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

ऑगस्ट -2022 या महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *