प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन.Current Affairs 04 September
जगप्रसिद्ध अशा टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी कार अपघातात निधन झाले.सायरस त्यांचे पूर्ण नाव सायरस पालोनजी मिस्त्री असे होते. त्यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी मुंबई येथे पारसी कुटुंबात झाला. ते आयरिश देशाचे नागरिक होते.जगप्रसिद्ध टाटा समूहाचे ते 28 डिसेंबर 2012 ते 24 ऑक्टोबर 2016 या कालावधीमध्ये टाटा ग्रुपचे अध्यक्ष होते.सायरस मिस्त्री हे टाटा समूहातील 18.5% भागधारक आहेत. या समूहातील सर्वात जास्त वैयक्तिक शेअर त्यांच्याकडे आहेत. विविध कंपन्यातील त्यांची संपत्ती ऐंशी हजार कोटीच्या जवळ आहे.
एशिया कप ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात पाकिस्तान करून भारताची हार Current Affairs 04 September
दुबई येथे सुरू असलेल्या एशिया कप 20-20 क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाला पाच विकेटने हरवले.
पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद नवाज यास मॅन ऑफ द मॅच किताब जाहीर झाला.गेल्या आठ वर्षातील पाकिस्तानकडून भारताची पहिली हार आहे.
भारतीय संघ रोहित शर्मा तर पाकिस्तानी संघ बाबर आजम याच्या नेतृत्वात खेळत आहे.
ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण दिवसाचे current affairs पाहण्यासाठी येथे भेट द्या.