चालू घडामोडी दिनांक-28 सप्टेंबर 2022

भारत देशाचे नवे अटॉर्णी जनरल आर. वेंकटरामानी यांची नियुक्ती.Chalu Ghadamodi 28 Saptembar

भारत देशाचे नवे अटॉर्णी जनरल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ आर. व्यंकटरामानी यांची पुढील तीन वर्षाकरिता Chalu Ghadamodi 28 Saptembar नियुक्ती करण्यात आली आहे.

  • सध्याचे अटॉर्णी जनरल के. के. वेणूगोपाल यांची नियुक्ती 30 सप्टेंबर 2022 रोजी संपणार आहे.
  • आर वेंकटरामानी हे 1979 पासून सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून काम करतात.
  • 1 ऑक्टोंबर 2022 पासून पुढील तीन वर्षापर्यंत त्यांचा कालावधी असेल.
  • भारताच्या अटॉर्णी जनरल यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून होत असते.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI या संघटनेवर केंद्र शासनाची पाच वर्षाची बंदी.Chalu Ghadamodi 28 Saptembar

काही दहशतवादी संघटनांची संबंध असल्याचा ठपका ठेवून केंद्रीय गृह मंत्रालयाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षाची बंदी घातली. मागील काही दिवसापासून या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यावर कार्यवाही करण्यात आली होती. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची संबंधित खालील आठ संघटनावरही बंदी घालण्यात आली.

  • कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया
  • रेहाब इंडिया फाउंडेशन
  • ऑल इंडिया इमाम कौन्सिल
  • नॅशनल कॉन्फरेशन ऑफ ह्यूमन राईट ऑर्गनायझेशन
  • नॅशनल फ्रंट वुमेन्स फ्रंट
  • ज्युनियर फ्रंट
  • इम्पॉवर इंडिया फाउंडेशन
  • रेहाब फाउंडेशन केरळ

भारतीय सैन्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDM म्हणून ले.जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती.

सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून भारतीय संरक्षण मंत्रालयाने केली आहे. त्याच सोबत भारत सरकारच्या सैन्य विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील.

  • अनिल चौहान यांचा जन्म 18 मे 1961 रोजी उत्तराखंड राज्यातील पौढी येथे झाला.
  • 1981 ते 2021 पर्यंत त्यांनी भारतीय सैन्याच्या अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले.
  • भारतीय सैन्याच्या पूर्व विभागाचे ते जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून काम पाहिले.
  • मे 2021 मध्ये त्यांनी निवृत्ती पत्करली.
  • ऑपरेशन सनराइज या मोहिमेचे ते प्रमुख होते.
  • ऑपरेशन सनराइज या मोहिमे अंतर्गत भारत म्यानमार यांच्या संयुक्त सैन्याने सीमेजवळील उग्रवादाविरुद्ध अभियान चालवले होते.

ऑगस्ट 2022 या पूर्ण महिन्यातील चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे भेट द्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *