Current Affairs Date-10 September 2022

Current Affairs King Charles

ब्रिटनचे नवे सम्राट किंग चार्ल्स तिसरे Current Affairs King Charles

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटन देशाचे नवे सम्राट म्हणून त्यांचे सुपुत्र किंग चार्ल्स तिसरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. Current Affairs King Charles

महाराणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी निधन झाले. ब्रिटन देशाच्या सिंहासनावर विराजमान झालेले किंग चार्ल्स यांचे वय 73 वर्ष आहे.

येथे नव्या राज्याची घोषणा करण्याचे काम तेथील ऍक्सेशन कौन्सिल करत असते. त्यात अनेक वरिष्ठ राजकारणी,धर्मगुरू,महापौर,सरकारी अधिकारी आणि पंतप्रधान यांचा समावेश असतो.

ब्रिटन देशाचे राजे हे 56 स्वतंत्र राष्ट्राच्या राष्ट्रकुलाचे प्रमुख असतात. त्याच सोबत ब्रिटन,ऑस्ट्रेलिया,अँटिगा आणि बार्बोडा,बहामा, बेलीझ,कॅनडा,ग्रीनाडा,जमैका,पापुआ,न्यू गिनी, सेंट क्रिस्टोफर आणि नेव्हीस,सेंट लुसिया,सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेदाईंस,न्यूझीलंड,सोलोमन बेटे आणि तूवालू या 14 राष्ट्राचे ते प्रमुख असतात

केरळमधील पत्रकार सिद्दिक कप्पन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर.

मागील दोन वर्षांपूर्वी 5 ऑक्टोबर 2020 मध्ये मथुरा येथे कप्पन यांना अटक झाली होती. उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील दलित मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी कप्पन हाथरस येथे जात होते.

त्यांच्यावर दंगल भडकवण्याचे साहित्य बाळगण्याचा आरोप ठेवून यूपीए कायद्याखाली अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.

मध्य प्रदेश मधील भारत भवन या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.वामन केंद्रे यांची निवड.

नाटक, संगीत, ललित कला, लोककला, साहित्य, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील महत्त्वाचे विभाग सांभाळणारी सांस्कृतिक संस्था म्हणून मध्य प्रदेशातील भारत भवन या संस्थेचा नाव लौकिक आहे.

ही संस्था 1982 साली स्थापन करण्यात आली. भारत भवन संस्था मध्य प्रदेश सरकारची स्वायत्त संस्था आहे.

या संस्थेच्या अध्यक्षपदी मराठी भाषिक असलेले वामन केंद्रे हे पहिले मराठी अध्यक्ष आहेत. वामन केंद्रे हे प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आहेत.

त्यांना भारत सरकारचा नाट्यदिग्दर्शनासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2012 मध्ये प्राप्त झाला आहे. 2019 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांनी 2013 ते 2018 या कालावधीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली या संस्थेचे संचालक पद सांभाळले आहे.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघाचा कर्णधार आरोन फिंच याची वन डे क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा.Current Affairs King Charles

ऑस्ट्रेलियाचा एक दिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार आरोन फिंच याने एक दिवशीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

यावेळी त्याचे वय 35 वर्षे आहे. फिंचने कारकिर्दीत 145 सामने खेळले आहेत.

ऑक्टोबर नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचे कर्णधार पद फिंच हाच सांभाळणार आहे.

भारत देशाची प्राकृतिक रचना कशी आहे ? हे जाणून घेण्यासाठी तेथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *