चालू घडामोडी दिनांक-02 October 2022

Chalu Ghadamodi 02 October
Wind Turbines’

भारतातील अक्षय ऊर्जेचे जनक समजले जाणारे तुलसी तांती यांचे निधन.Chalu Ghadamodi 02 October

जागतिक स्तरावर नावाजलेल्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक तुलसी तांती यांचे शनिवारी निधन झाले. सुझलॉन ही पवन टरबाइन उत्पादन करणारी कंपनी आहे. 

  • तुलसी तांती यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1958 रोजी गुजरात मधील राजकोट येथे झाला.
  • भारताचे विंड मॅन म्हणून तुलसी कांती यांना ओळखले जाते.
  • सुझलॉन एनर्जी जगातील विविध 17 देशांमध्ये व्यवसाय करते.

इंडोनेशियात फुटबॉल सामन्या दरम्यान दुर्घटना 125 प्रेक्षक मृत्युमुखी Chalu Ghadamodi 02 October

इंडोनेशिया देशाच्या जावा बेटावर दोन स्थानिक संघाच्या फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसक चेंगराचेंगरी 125 प्रेक्षकांचा मृत्यू झाला आहे.ही घटना जावा बेटावरील घडली. 

  • मलंग शहराची अरेमा एफ सी आणि पर्सेबाया या दोन फुटबॉल संघामधील हा सामना होता. 
  • हा सामना कांजूरुहान या स्टेडियम मध्ये खेळला जात होता. 
  • अरेमा एफसी हा संघ हरल्यानंतर त्याच्या समर्थकांनी उलटबाजी सुरू करून त्यात 125 प्रेक्षकांची मृत्यू झाला.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिले स्केटिंग मध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाला सुवर्णपदक

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्केटिंग पुरुष संघाने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. 

  • रिले स्केटिंग पुरुष संघात विक्रम इंगळे, सिद्धार्थ कांबळे, सुरूद सुर्वे आणि आर्य जुवेकर यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील विविध ऊर्जा प्रकार आणि प्रकल्पांची माहिती येथे जाणून घ्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *