Current Affairs Date-30 October 2022
इस्रोच्या सीई-20 इंजिन प्रक्षेपक यंत्राची यशस्वी चाचणी.Current Affairs Cryogenic engine-20
इस्रो केंद्राच्या महेंद्र गिरी येथील अति उच्च पातळी चाचणी केंद्रात सीई-20 इंजिन (Cryogenic engine-20 ) Current Affairs प्रक्षेपक यंत्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.ही चाचणी 28 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आली.आजपर्यंतचे इस्रोचे हे सर्वात अवजड प्रक्षेपक यंत्र आहे.
प्रक्षेपक यंत्राद्वारे उपग्रह अवकाशात सोडला जातो.प्रक्षेपक यंत्र हे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी सर्वात महत्त्वाचे इंजिन असते.(भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो) भारताची राष्ट्रीय अवकाश संस्था आहे. ज्याचे मुख्यालय बंगळुरू कर्नाटक येथे आहे.
खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत साक्षी म्हस्केला सुवर्णपदक Current Affairs Cryogenic engine-20
गाजियाबाद येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या साक्षी म्हस्केने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक कमावले. साक्षी म्हस्के ही यवतमाळ येथील रहिवासी आहे. साक्षीने स्नैच मध्ये 73 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 95 किलो असे एकूण 168 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले.
याच प्रकारात सौम्या दळवी हिला रौप्य पदक तर भूमिका मोहिते आणि अनन्या पाटील यांना काश्य पदकावर समाधान मानावे लागले.
आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राची भाग्यश्री पाटील विजेती
इंडोनेशिया येथील बाली येथेआशियाई बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे.अती जलद स्विस लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत भाग्यश्री पाटील हीने सात फेऱ्या अखेर विजेते पद मिळवले.
भाग्यश्री ही महाराष्ट्रातील जळगाव येथील रहिवासी आहे.
ऑगस्ट 2022 या महिन्यातील चालू घडामोडी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .