Current Affairs Date-02 November 2022

digital currency RBI cbdc

एक नोव्हेंबर 2022 पासून सीबीडीसी अर्थात डिजिटल रुपया याचा वापर सुरू होणार. what is digital currency RBI cbdc ?

भारतीय रिझर्व बँकेच्या डिजिटल रुपया अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (digital currency RBI cbdc) संपूर्ण देशभरात दिनांक एक नोव्हेंबर 2022 प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे.डिजिटल करन्सी चा वापर करण्यासाठी देशभरातील नऊ बँकांची निवड करण्यात आली आहे.1.स्टेट बँक ऑफ बडोदा,2.युनियन बँक,3.एचडीएफसी बँक, 4.आयसीआयसीआय बँक, 5.कोटक महिंद्रा बँक, 6.एस बँक,7.आयडीएफसी फर्स्ट बँक, 8.एच एस सी बी बँक आणि 9.स्टेट बँक ऑफ इंडिया.डिजिटल रुपया हे भारतीय रिझर्व बँकेचे डिजिटल रूपातील नवीन चलन आहे.सध्या त्याचा वापर घाऊक व्यवहार करण्यासाठी करण्यात येईल.

ब्राझील देशाच्या अध्यक्षपदी लुईस इनाशिवो लुला डिसिल्वा यांची निवड.

ब्राझील देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत लुईस इनाशिवो डिसिल्वा यांची पुन्हा निवड झाली आहे.

  • ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष बोल्सनारो यांना 49.1% मते मिळाली.
  • डिसिल्वा यांना 50.9% मते मिळाली.
  • माजी अध्यक्ष बोल्सनारो हे अति उजव्या विचारसरणीचे मानले जातात.
  • डिसिल्वा हे 2003 ते 2010 या काळात ब्राझीलचे अध्यक्ष होते.

गुजरात मधील मोरबी पूल दुर्घटनेमधील मृतांची संख्या 134 झाली.

रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी मोरबी नदीवरील झुलता पूल कोसळून दुर्घटना घडली.

  • या दुर्घटनेत 134 लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • मोरबी येथील मच्छु नदीवर हा झुलता पूल होता.
  • या पुलाचे वय शंभर वर्ष होते.

ऑक्टोबर-2022 या महिन्यात देशात जीएसटीचे 1.52 लाख कोटी रुपये संकलन what is digital currency RBI cbdc ?

ऑक्टोबर 2022 या महिन्यात देशातील जीएसटी चे विक्रमी संकलन झाले आहे.

  • ऑक्टोबर महिन्यात देशभरात जीएसटीचे 1.52 लाख कोटी रुपय संकलित झाले आहेत.
  • ऑक्टोबर 2019 च्या तुलनेत 29 टक्के वाढ ऑक्टोबर 2022 मध्ये झाली.
  • जीएसटी संकलनात देशात महाराष्ट्र क्रमांक एक वर आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *