Current Affairs Date-14 September 2022

current affairs congress party

गोवा राज्यातील काँग्रेस पक्ष पुन्हा फुटला current affairs congress party

महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्यामध्ये काँग्रेस पक्षात पुन्हा फूट पडली आहे. काँग्रेसच्या 11 पैकी आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. current affairs congress party गोवा राज्यात मार्च 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या.

दिगंबर कामत, मायकल लोबो, डीलेला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक संकल्प अमोनकर,अलेक्स सिक्वेरा, रुडल्फ फर्नांडिस या आठ आमदारांनी पक्ष सोडला. अकरा आमदारांपैकी युरी आलेमाव, अल्ट्रोन डीकोस्टा, आणि कार्लोस अल्वा रेस फरेरा हे तीनच आमदार काँग्रेसमध्ये शिल्लक आहेत.

जुलै 2019मध्येही काँग्रेस पक्षाचे 10आमदार फुटून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.

प्रसिद्ध कलावती गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन.current affairs congress party

प्रसिद्ध कलावती लोककलाकार गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने दिनांक 14 सप्टेंबर रोजी निधन झाले.मागील 50 वर्ष त्यांनी आपल्या लोककलेने महाराष्ट्राला मोहिनी घातली होती.

महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. निधना समयी त्यांचे वय 90 वर्ष होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियातील मॉस्को येथे अनावरण .

प्रसिद्ध समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांचा पुतळा रशियातील मास्को येथील ‘मार्गारिटा रुडामिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर’ या संस्थेच्या आवारात उभारण्यात आला आहे.अन्नाभाऊ साठे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कार्ल मार्क्स यांचा प्रभाव होता.

या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर,डॉ.विनय सहस्रबुद्धे,सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

बीसीसीआय च्या अध्यक्ष व सचिव पदी सौरव गांगुली आणि जय शहा 

बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिव पदी सौरभ गांगुली आणि जय शहा हेच आणखी तीन वर्ष कायम असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय च्या घटनादुरुस्तीला परवानगी दिल्यानंतर पुढील तीन वर्ष हेच अध्यक्ष व सचिव पदी कायम असणार आहे.

भारताचे स्वाभाविक विभाग याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *