Current Affairs Date-16 September 2022

SCO एससीओ ची 22 वी वार्षिक परिषद समरकंद येथे संपन्न.

(SCO एससीओ परिषद समरकंद ) भारताच्या उत्तरे कडील आठ देशांची मिळून असलेली ही संघटना आहे. या संघटनेची स्थापना सन 2001 मध्ये करण्यात आली.या संघटनेत सुरुवातीला सहा देशांचा समावेश होता.नंतर यात भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला.भारत या संघटनेत 2017 साली सामील झाला.

सध्या,भारत,कझाकिस्तान,चीन,किर्गिस्तान,रशिया,पाकिस्तान,ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या आठ देशांना SCO पूर्ण सदस्यांचा दर्जा आहे.

अफगाणिस्तान,बेलारूस,इराण आणि मंगोलिया यांना SCO मधील सह निरीक्षक दर्जा आहे.अझरबैजान,आर्मेनिया,कंबोडिया,नेपाळ,तुर्की आणि श्रीलंका या सहा देशांना संवाद भागीदार दर्जा आहे.

परस्परांची सुरक्षा,जागतिक राजकारण आणि आर्थिक संघटन या विषयावर ही संघटना काम करते.या संघटनेचे मुख्यालय चीनमधील बेजींग या शहरात आहे.

हेड्स ऑफ स्टेट कौन्सिल (HSC) ही SCO मधील निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.SCO मधील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी दरवर्षी वेग वेगळ्या देशात एकदा बैठक होते.

यावर्षी या संघटनेचे संमेलन उजबेकिस्तान या देशातील समरकंद या शहरात संपन्न झाले.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाचे प्रतिनिधीत्व केले.यावेळी त्यांनी जगासमोर अन्नधान्य,खते आणि  इंधन टंचाई या जागतिक समस्येविषयी चिंता व्यक्त केली.उजबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्जियोयेव यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

ऑगस्ट-2022 या संपूर्ण महिन्याच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी येथे भेट द्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *