Current Affairs Date-20 September 2022

Current Affairs Date-20 September 2022

नारायण राणे यांच्या बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडावे लागणार,मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय Current Affairs 20 September

Current Affairs 20 September

मुंबई जुहू येथील नारायण राणे यांच्या मालकीच्या अधीश नावाच्या बंगल्यामध्ये केलेल्या Current Affairs 20 September अवैध बांधकाम प्रकरणी मुंबई सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी दिले. त्याच सोबत दहा लाख रुपयाच्या दंडही आकारला.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी याचिका दाखल केली होती. किनारपट्टी नियमन नियमावली (सीआरझेड) आणि चटई क्षेत्र निर्देशांक नियम म्हणजे (एसएफआय) या दोन्हीही नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला.

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.Current Affairs 20 September

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले होते. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पुन्हा आरक्षण मिळवण्यासाठी सध्याच्या महाराष्ट्र सरकारने तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उप समिती बनवली आहे. उप समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक तसेच आर्थिक स्थितीबाबत अहवाल मिळवून त्यावर शिफारस करण्याची कार्यवाही ही समिती करेल.

2022 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड.

चित्रपट क्षेत्रातील जागतिक चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार असलेल्या ऑस्कर साठी भारतामधून दरवर्षी चित्रपटाची निवड केली जाते.

भारतीय चित्रपट महामंडळ म्हणजे एफएफआय ही संस्था भारतातील चित्रपटाची निवड करते. 2022 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतामधून गुजरातच्या ग्रामीण भागातील मुलाच्या चित्रपट प्रेमावर आधारित छेल्लो शो या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पेन नलीन यांनी केले आहे.ऑस्कर पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2023 रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सचे गठन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 महाराष्ट्रात प्रभावीपणे लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टास्क फोर्स म्हणजेच कार्य गटाचे गठन केले आहे.

या कार्य गटाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर सदस्य पदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास आणि उद्योग मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राधा कृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री गिरीश महाजन आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तारयांची नियुक्ती करण्यात आली

तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी सदस्य सचिव असतील.

ऑगस्ट महिन्याच्या संपूर्ण घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *