चालू घडामोडी दिनांक-23 September 2022
टाटा समूहातील वेगवेगळ्या सात धातू कंपन्यांचे टाटा स्टील मध्ये महा एकत्रिकरण. चालू घडामोडी 23 September
टाटा समूहातील 1.टाटा मेंटॅलिस्ट, 2.टाटा तीन प्लेट, 3.टाटा स्टील लॉंग प्रॉडक्ट, चालू घडामोडी 23 September 4.टीआरएफ लिमिटेड, 5.इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट, 6.टाटा स्टील मायनिंग लिमिटेड 7.एस अँड टी मायनिंग कंपनी या सात कंपन्यांचे एकत्रीकरण टाटा स्टील या कंपनीत होणार आहे.
इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी के राजा प्रसाद रेड्डी
इंडियन न्यूज पेपर सोसायटी ही संपूर्ण भारत देशातील वर्तमानपत्र आणि नियतकालिक यांच्या प्रकाशकांची सर्वोच्च शिखर संस्था आहे.
सोसायटीच्या 2022-23 या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या सोसायटीच्या अध्यक्षपदी तेलगू भाषेतील साक्षी दैनिकाचे के राजा प्रसाद रेड्डी यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष म्हणून आज समाजचे राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली. तन्मय महाश्वरी मानद खजिनदार व मेरी पॉल यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली. सोसायटीच्या सदस्य पदी विवेक गोयंका, प्रताप पवार, विजय दर्डा, करण दर्डा, किरण ठाकूर, विलास मराठे, अनंत नाथ, कुंदन व्यास, शैलेश गुप्ता, होरसूमजी कामा इत्यादी सदस्यांची निवड करण्यात आली.
न्यूयॉर्क येथे ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक संपन्न
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची मिळून असलेल्या ब्रिक्स या संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक न्यूयॉर्क येथे पार पडली. त्यात जागतिक दहशतवादाबाबत संयुक्त राष्ट्रांनी भूमिका घ्यायला हवी असा आग्रह धरण्यात आला.
भारत देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे या बैठकीत सहभागी झाले होते.
हॉकी इंडिया संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप तिर्की यांची निवड. चालू घडामोडी 23 September
भारतातील हॉकी इंडिया ही हॉकी खेळातील सर्वोच्च संघटना आहे.हॉकी इंडिया च्या अध्यक्षपदी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की यांची निवड झाली आहे.
संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली असून या निवडीला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ म्हणजे एफआयएच ने मान्यता दिली आहे.