वाक्य आणि वाक्याचे प्रकार
Types of Sentence vakyache prakar-वाक्य आणि वाक्याचे प्रकार
वाक्य म्हणजे काय ?
वेगवेगळे शब्द जेव्हा एकत्र येऊन त्या शब्दांचा समूह तयार होतो तेथे वाक्य तयार होते.Types of Sentence vakyache prakar कोणत्याही शब्दांचा समूह एकत्र आला म्हणजे वाक्य तयार झाले असे होत नाही.त्या समूहातील शब्द हे अर्थपूर्ण असावेत. त्या सर्व शब्दांचा मिळून एक अर्थ तयार व्हावा.सर्व शब्दांचा मिळून समजणारा अर्थ निघतो तेव्हा त्या शब्दांचे वाक्य तयार होते.अर्थपूर्ण वाक्यातील प्रत्येक शब्दाचा एकमेकाशी संबंध असतो. त्या वाक्यातील प्रत्येक शब्द निरर्थक असेल तर वाक्य अर्थपूर्ण होणार नाही. शब्दाच्या एकमेकाशी असलेल्या संबंधामुळेच त्या वाक्याचा पूर्ण अर्थ समजणे सोपे जाते. अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी त्यात वेगवेगळ्या जातीची शब्द असावे लागतात.एकाच जातीचे शब्द वापरल्याने अर्थपूर्ण वाक्य तयार होत नाही. वाक्यात फक्त क्रियापदेच वापरले तर काय होईल हे खालील उदाहरणावरून लक्षात येईल.
- केले खाल्ले गेले आणले पिले ठेवले.
वरील वाक्यात सर्व क्रियापदे वापरली आहेत परंतु अर्थपूर्ण वाक्य तयार झाले नाही.अर्थपूर्ण वाक्यासाठी शब्दांच्या वेगवेगळ्या जातीचे शब्द जसे-नाम,सर्वनाम,विशेषण,क्रियापद क्रियाविशेषण,शब्दयोगी अव्यय,उभयान्वयी अव्यय,केवलप्रयोगी अव्यय अशा अनेक प्रकारच्या शब्दांचा योग्य वापर करावा लागतो.
Types of Sentence vakyache prakar–वाक्याचे मुख्य तीन प्रकार
- वाक्याच्या अर्थावरून
- वाक्यातील क्रियापदाच्या विविध रूपावरून
- वाक्यामधील उद्देश आणि विधेय यांच्यावरून
अ.वाक्याच्या अर्थावरून-प्रत्येक वाक्याचा एक विशिष्ट अर्थ असतो त्या अर्थावरून वाक्याचे पाच उपप्रकार तयार होतात.Types of Sentence vakyache prakar
- विधानार्थी वाक्य-एखाद्या वाक्य कर्त्याने केवळ एखादी विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.उदा. माझे वडील आज शेतात गेले.
- प्रश्नार्थक वाक्य-काही वाक्यात एखादा प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हटले जाते.उदा.तुझे नाव काय ?
- उद्गारार्थी वाक्य-काही वाक्यात आपल्या मनातील भावना प्रदर्शित झालेल्या दिसतात. त्यातून काही उद्गार निघतात.ज्या वाक्यात असे उद्गार आलेले दिसतात त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हटले जाते.
- उदा.अरे बापरे ! किती मोठा साप आहे तो.
- होकारार्थी वाक्य-एखाद्या वाक्याच्या अर्थावरून तेथे होकार आहे असा बोध होतो ते वाक्य होकारार्थी असते.उदा.मी शाळेत जाणार आहे.
- नकारार्थी वाक्य-एखाद्या वाक्याच्या अर्थावरून तेथे नकार आहे असा बोध होतो ते वाक्य नकारार्थी आहे असते.उदा.आज मी शाळेत जाणार नाही.
ब.वाक्यातील क्रियापदाच्या विविध रूपावरून वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे चार उपप्रकार तयार होतात.
- स्वार्थी वाक्य-एखाद्या वाक्याच्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असे संबोधले जाते.
- उदा. रामू पत्र लिहितो.या वाक्यात क्रियापदाचा साधा वर्तमान काळ कळतो.
- आज्ञार्थी वाक्य-एखाद्या वाक्यातील क्रियापद हे आज्ञा आशीर्वाद विनंती किंवा उपदेश दर्शवत असेल त्या वाक्याला अज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
- उदा. 1.पोरांनो चांगला अभ्यास करा. येथे उपदेश दिला आहे. 2.श्याम माझे एक काम करशील का ? येथे विनंती केली आहे.3.आत्ताची आत्ता चालता हो. या वाक्यात आज्ञा केली आहे.
- विध्यर्थी वाक्य-एखाद्या वाक्याच्या क्रियापदावरून तर्क,शक्यता,कर्तव्य,योग्यता,इच्छा इत्यादी चा बोध होत असेल त्या वाक्याला विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.
- उदा. १.मला वाटते तू लवकर यावे.या वाक्यात इच्छा प्रकट झाली आहे.२.तुझा नक्कीच पहिला नंबर येईल.तू खूप हुशार आहेस. येथे योग्यता दर्शवली गेली आहे.
- संकेत अर्थाचे वाक्य-एखाद्या वाक्याच्या क्रियापदावरून असे केले तर तसे होईल तसे केले तर असे होईल असा जर तर चा वापर केला जातो किंवा अट ठेवली जाते ते वाक्य संकेत अर्थाचे असते.
- उदा. १.जर मला बरे वाटले तर मी शाळेत जाईन. २.त्याने माझी माफी मागितली तरच मी त्याच्याशी बोलेन.
क.वाक्यामधील उद्देश आणि विधेय यांच्यावरून वाक्याचे तीन उपप्रकार तयार होतात.
- केवल वाक्य-या वाक्यप्रकारात फक्त एकच उद्देश आणि एकच विधेय असतो.एकच उद्देश आणि एकच विधेय असणारे दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने एकत्र जोडली जाऊ शकतात.
- उदा. १.दादा चहा पतो. २.मी शाळेत जातो. ३.ऑफिसला सुट्टी असल्यामुळे बाबा घरीच आहे.
- संयुक्त वाक्य-दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली तर तेथे संयुक्त वाक्य तयार होते.
- उदा. १.मी सकाळी फिरायला जातो किंवा मित्रांसोबत चालतो. २.गणेशने खूपच अभ्यास केला म्हणून त्याचा प्रथम क्रमांक आला.
- मिश्र वाक्य-ही वाक्ये गौणत्व सुचक उभयान्वयी अव्ययाने जोडून तयार होतात.यात एक प्रधान वाक्य असते आणि दुसरे गौणत्व सूचक वाक्य असते.
- उदा. १.सर म्हणाले प्रत्येकाने नियमित अभ्यास केला पाहिजे. २.आमचे शरीर नीट राहावे म्हणून आम्ही रोज फिरायला जातो.
नामाचे एकवचन आणि अनेक वचन जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.