सराव पेपर-१५-भारताचे स्वाभाविक विभाग

sarav paper swabhavik vibhag

भारताचे स्वाभाविक विभाग-sarav paper swabhavik vibhag

भारताचे स्वाभाविक विभाग किंवा प्राकृतिक विभाग या भागात आपण भारताच्या विविध प्राकृतिक विभागाविषयी माहिती घेतली आहे. sarav paper swabhavik vibhag प्राकृतिक विभागाचा तेथील जीवनमानावर परिणाम होत असतो. या भागातील विविध उपघटकावर आधारित 30 प्रश्नांचे सराव चाचणी पेपर येथे उपलब्ध करून देत आहोत. हा चाचणी पेपर पीडीएफ स्वरूपाचा असून प्रत्येक प्रश्नाला तीन पर्याय आहेत. सराव पेपराच्या शेवटच्या पानावर उत्तराची सूची सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा सराव चाचणी पेपर आपण डाऊनलोड करून आपल्या संग्रही ठेवू शकतो.

अभ्यास करण्यासाठी आणि घटकाच्या दृढीकरणासाठी या पीडीएफ पेपरचा नक्कीच उपयोग होईल.

सराव चाचणी-१५ (1)

प्र.१ खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते ?

1. प्राकृतिक रचनेचा मानवी जीवनावर परिणाम होतो. 2. प्राकृतिक रचनेच्या मानवी जीवनावर परिणाम होत नाही 3. प्राकृतिक प्राकृतिक रचनेचा फक्त वनस्पतीवर परिणाम होतो.

प्र.2 प्राकृतिक रचनेनुसार भारताचे किती मुख्य विभाग पडतात ?

1. पाच विभाग  2. सात विभाग  3. चार विभाग

प्र.3 हिमालयाच्या पर्वतरांगा कोणत्या दिशेस पसरलेल्या आहेत ?
1.पूर्व पश्चिम 2.उत्तर दक्षिण 3.पश्चिम उत्तर

प्र.4 हिमालय पर्वताला समांतर अशा किती पर्वतरांगा आहेत ?
1. तीन 2. पाच 3. दोन

प्र.5 काराकोरम, बनिहाल ही कशाची नावे आहेत ?
1.पर्वत शिखरे 2.पर्वतरांगा 3.खिंडी

प्र.6 के-2 या शिखराची उंची किती मीटर आहे ?
A.8611 मीटर B.8411 मीटर C.7611 मीटर

प्र.7 हिमालय पर्वताची उंची कोणत्या दिशेकडे वाढत जाते ?
A.पूर्व दिशा B.पश्चिम दिशा C.दक्षिण दिशा

प्र.8 पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते ?
A.कांचनगंगा B.लुशाही C.के-2

प्र.9 पूर्व हिमालयातील खिंडी कोणत्या आहेत ?
A.जेलप B.नागा C.बनीहाल

प्र.10 उत्तर भारतीय मैदानी प्रदेश ची उंची किती मीटर पर्यंत आहे ?
A.400 मीटर B.300 मीटर C.200 मीटर

प्र.11 भारतीय महा वाळवंट कोणत्या मैदानी भागात आहे ?
A.उत्तर भारतीय पश्चिमेकडील मैदानी प्रदेश B.उत्तर भारतीय पूर्वेकडील मैदानी प्रदेश C.उत्तर भारतीय उत्तरेकडील मैदानी प्रदेश

प्र.12 उत्तर भारतातील पूर्व मैदानी प्रदेशातील मुख्य नदी कोणती ?
A.गंगा B गोदावरी C.सतलज

प्र.13 कोणत्या दोन नद्यामुळे भारतीय पठारी प्रदेशाचे उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार असे दोन विभाग पडतात ?
A.गंगा आणि यमुना B.नर्मदा आणि शोन C.कावेरी आणि कृष्णा

प्र.14 सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या पर्वताच्या ईशान्य भागात आहे ?
A.अरवली B.मारवाडी C.सातपुडा

प्र.15 उत्तर भारतीय पठारातील चंबळ, शिंद,पेटवा या नद्या कोणत्या दिशेस वाहतात ?
A.पूर्व B.पश्चिम C.उत्तर

प्र.16 अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
A.गुरुशिखर B.कांचनगंगा C.नंदादेवी

प्र.17 दख्खनचे पठार कोणत्या पठारास म्हणतात ?
A.दक्षिण भारतीय पठार B.उत्तर भारतीय पठार C.भारतीय महावाळवंट

प्र.18 सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव काय ?
A.सातपुडा B.पश्चिम घाट C.पूर्व घाट

प्र.19 महाराष्ट्र पठारावर कोणत्या डोंगर रांगा आहेत ?
A.अजिंठा B.अरवली C.हिमालय

प्र.20 पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते ?
A.अनैमुडी B.सातपुडा C.सारंगधर

सराव चाचणी भाग-2

प्र.21 पालघाट नावाची खिंड कोणत्या पर्वताच्या दक्षिणेस आहे ?
A.निलगिरी B.बालाघाट C.महादेव

प्र.22 खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात कोणत्या पठारावर सापडते ?
A.पूर्व किनारी प्रदेश B.छोटा नागपूरचे पठार C.सातपुडा पर्वत

प्र.23 महाराष्ट्र पठारावर कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ?
A.लोणार B.पालघाट C.श्रीशैलम

प्र.24 चिल्का, पुलिकत, कोलेरू ही सरोवरे कोणत्या किनाऱ्यावर आहेत ?
A.पूर्व किनारा B.पश्चिम किनारा C.सह्याद्री पर्वत

प्र.25 लक्षद्वीप बेटांची निर्मिती कशी झाली आहे ?
A.प्रवाळांच्या संचयनातून B.जमिनीच्या तुटलेल्या भागातून C.वाळूच्या संचयनाने

प्र.26 भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे ?
A.अंदमान समूहातील बॅरन बेटावर B.अंदमान समूहातील सॅडल बेटावर C.लक्षद्वीप बेटावर

प्र.27 हिमालय पर्वताचे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
1.नंगा पर्वत 2.नंदादेवी 3.के टू

भारतातील विविध नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *