भारताची राष्ट्रीय प्रतीके

National Symbols of India-भारताची राष्ट्रीय प्रतीके

Top 14 Nationals Symbols of India

प्रत्येक देशाला आपला सांस्कृतिक वारसा असतो. National symbols of India प्रत्येक देशाचे राष्ट्रीय प्रतीके ही त्या देशाची सांस्कृतिक शान असतात . प्रत्येक देशाची राष्ट्रीय प्रतीके ही त्या देशाचा सन्मान असतात.राष्ट्रीय प्रतिकांचा आपण सन्मान केला पाहिजे.सतत त्यांना जपले पाहिजे.भारताची राष्ट्रीय प्रतीके ही अतिशय मौल्यवान सांस्कृतिक वारसाची प्रतीके आहेत.

National Symbols of India

राष्ट्रमुद्रासारनाथ येथील अशोक स्तंभावरील चार सिंह असलेली राजमुद्रा भारत देशाने स्वीकारली आहे.
चार सिंहापैकी तीन सिंहाचे मुख प्रतिमेत दिसतात.
राष्ट्रध्वजभारताने आपला राष्ट्रध्वज म्हणून खादी कापडाने विणलेला तिरंगी ध्वज स्वीकारला आहे.राष्ट्रध्वजाचा आकार हा आयताकृती असून त्याच्या लांबी रुंदीचे प्रमाण 3:2 असे असते.
राष्ट्रगीतभारताचे राष्ट्रगीत हे जन गण मन हे आहे. पश्चिम बंगालमधील जगप्रसिद्ध लेखक आणि कवी असलेले रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये हे गीत लिहिलेले आहे.या गीताचे एकूण पाच कडवे आहेत.पहिले कडवे हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.
बोधवाक्यभारताचे राष्ट्रीय बोध वाक्य हे सत्यमेव जयते असे आहे. सम्राट अशोकाने बनवलेल्या चार सिंहाच्या मुख असलेल्या अशोक स्तंभाच्या खालील बाजूस देवनागरीत “सत्यमेव जयते” हे वाक्य लिहिलेले आहे.
प्राणीवाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मांजर कुळातील वाघ हा सर्वात मोठा प्राणी आहे.
वाघ हा राष्ट्रीय प्राणी म्हणून १९७२ साली घोषित करण्यात आला.
पक्षीमोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. 20 जानेवारी 1963 साली मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली.
भाषाभारताची राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी भाषेची निवड करण्यात आली आहे.
फूलकमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. भारता सोबतच व्हिएतनाम या देशाचे सुद्धा कमळ हे राष्ट्रीय फुल आहे.
खेळभारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे.भारतामध्ये मेजर ध्यानचंद यांना ‘ हॉकीचे जादूगर ’असे म्हणतात.
लिपिभारताची राष्ट्रीय लिपी ही देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपीतील अक्षरे ही डावीकडून उजवीकडे लिहिली जातात.
वृक्षभारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून वड या वृक्षाची निवड करण्यात आली आहे.
फळभारताचे राष्ट्रीय फळ हे आंबा आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीचा हापूस आंबा हा जग प्रसिद्ध आहे.
जलचर प्राणीभारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डॉल्फिन या प्राण्याची ओळख आहे.
भारताचा वारसा प्राणीहत्ती हा भारताचा वारसा प्राणी आहे.

भारतात खेळले जाणारे विविध खेळ,खेळाडू आणि विविध स्पर्धा यांची माहिती मिळवण्यासाठी येथे भेट द्या.

भारताचे भौगोलिक स्थान आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *