भारतातील प्रथम व्यक्ति विशेष-पहिल्या ३५ व्यक्ति-First Person In India

First Person In India

Top 35 First Person In India-भारतातील प्रथम व्यक्ति विशेष-पहिल्या ३५ व्यक्ति

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानानंतर भारतातील प्रथम(First Person In India) म्हणजेच पहिल्यांदा पदे भूषवलेल्या ३५ महान व्यक्ति रेखाबद्दल माहिती या भागात घेण्यात आली आहे.

First Person In India in Politices-राजकीय क्षेत्रातील भारतातील प्रथम पुरुष

पहिले ब्रिटिश गव्हर्नर-वॉरन हेस्टिंग्ज हे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते.1772 ते 1785 पर्यंत पश्चिम बंगाल या राज्याचे ब्रिटिश गव्हर्नर होते.

ब्रिटिश व्हाइसरॉय-भारतातील प्रथम-लॉर्ड कॅनिंग हे भारतातील पहिले ब्रिटिश व्हाइसरॉय होते.

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर-स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी होते.

दिनांक-21.06.1948 ते 26.01.1950 पर्यंत भारताचे चे गव्हर्नर होते.नंतर त्यांची मद्रास राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.  

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष-व्योमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली.

काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून व्योमेशचंद्र बॅनर्जी यांची निवड करण्यात आली.त्यांचा जन्म 1844 मध्ये कलकत्ता येथे झाला. 

लोकसभेचे पहिले सभापती-भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळणकर होते.सन 1952 ते 1956 पर्यंत ते लोकसभेचे सभापती होते.

त्यांचा जन्म दिनांक-27.11.1888 रोजी गुजरात राज्यातील वडोदरा येथे झाला. 

भारतातील पहिले आयसीएस अधिकारी -सत्येंद्रनाथ टागोर यांना भारतातील पहिले आयसीएस अधिकारी म्हणून ओळखले जाते.

त्यांनी आय.सी.एस.परीक्षा 1863 मध्ये पास केली ते रवींद्रनाथ टागोर यांचे भाऊ होते.त्यांनी ‘बौद्धधर्म’नावाचा ग्रंथ बंगाली भाषेत लिहिला. 

ब्रिटिश संसदेचे पहिले सदस्य-ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय सदस्य दादाभाई नवरोजी हे होते.

सन 1892 पासून1895 पर्यंत “ हाऊस ऑफ कॉमन्स “ या ब्रिटिश संसदेचे सदस्य होते.त्यांचा जन्म 04.09.1825 साली झाला.त्यांचा मृत्यू  30.06.1917 साली झाला. 

पंतप्रधान-पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते.दिनांक-15.08.1947 ते 27.05.1964 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते.

त्यांचा जन्म दिनांक-14.11.1889 या दिवशी झाला.पंडित नेहरू यांना ‘चाचा नेहरू’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. 

इतर क्षेत्रातील भारतीय प्रथम व्यक्ति

भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर-भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर श्री.चिंतामणराव डी देशमुख हे होते.बँकेची स्थापना 1943 मध्ये झाली.

रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर(First Person In India )म्हणून श्री.चिंतामणराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड येथे 14.01.1896 साली झाला.

वैमानिक-जे आर डी टाटा हे पहिले भारतीय वैमानिक होते.जहागीर रतनजी दादाभाई टाटा हे त्यांचे पूर्ण नाव होय.त्यांचा जन्म 29.07.1904 साली झाला.

त्यांचा मृत्यू 29.11.1993 साली झाला.त्यांना भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जाते. 

माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गिर्यारोहक-तेनसिंग नोर्गे हे माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करणारे पहिले भारतीय गिर्यारोहक होते.तेनसिंग नोर्गे यांनी आलमंड हीलरी या महिलेसोबत दिनांक-29.05.1953 या दिवशी 8504 मिटर उंच असलेले एव्हरेस्ट शिखर पार केले. 

नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय-नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय म्हणून रवींद्रनाथ टागोर यांना ओळखले जाते.

रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यामध्ये दिला जाणारा नोबेल पुरस्कार ‘गीतांजली’ या साहित्यकृतीसाठी 1913 मध्ये प्राप्त झाला. 

अंतराळवीर-राकेश शर्मा भारतातील पहिले अंतराळवीर हे होय.2 एप्रिल 1984 रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमाच्या अंतर्गत रशियाच्या शोयूज-11 या अंतराळ यानातून राकेश शर्मा यांनी उड्डाण केले.भारतीय वायू दलात ते वैमानिक म्हणून कार्यरत होते.अशोक चक्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

फिल्ड मार्शल-सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल जनरल एस.एच.एफ.जे.मानेकशॉ हे होते.1971 मध्ये झालेले भारत पाकिस्तान युद्ध त्यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले.

त्यांचा जन्म पंजाब मधील अमृतसर येथे 3 एप्रिल 1914 साली झाला.त्यांचे निधन 27 जून 2008 साली झाले.

मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय-मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा भावे होते.1958 मध्ये त्यांना ‘कम्यूनिटी लीडरशिप’ साठी हा पुरस्कार मिळाला. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात झाला.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूदान चळवळ अतिशय प्रसिद्ध आहे.

First Ladies In India-भारतातील प्रथम महिला

वैमानिक-प्रेमा माथूर या पहिल्या महिला वैमानिक होत्या.जुलै 1948 मध्ये त्यांनी विमान चालवले.

उपकुलगुरू-हंसाबेन मेहता या महाराजा सयाजीराव विद्यापीठ,वडोदरा या विद्यापीठात मध्ये सन 1949 साली उपकुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिले.

पंतप्रधान-श्रीमती इंदिरा गांधी या भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. 1966 मध्ये त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारले.

मुख्यमंत्री-सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.उत्तर प्रदेश’ या राज्यांमध्ये हे सन 1963 ते 1967 या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला.

आयपीएस अधिकारी-किरण बेदी या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत.1972 सालच्या आयपीएस बॅचच्या त्या अधिकारी आहेत.

एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला-एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला बचेंद्री पाल या आहेत.मे 1984 साली त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले.

भारतीय वंशाची पहिली अंतरिक्ष यात्री-महिला भारतीय वंशाची ही पहिली अंतरिक्ष यात्री महिला कल्पना चावला होय.

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश-एम साहीब फातिमा या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या.1989 साली त्यांनी आपला पदभार स्वीकारला.

नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिला पहिल्या महिला-मदर तेरेसा या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला भारतीय होत.1979 साली त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला.

राष्ट्रपती-श्रीमती.प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.2007 ते 2012 या कालावधीत त्या देशाच्या राष्ट्रपती होत्या.

लोकसभा अध्यक्ष-मीरा कुमार या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष होत्या.2009 साली त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष पद भूषवले.

ओलंपिक पदक विजेती पहिली महिला-ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पहिली महिला पदक विजेत्या कर्णम मल्लेश्वरी या होत्या.त्यांनी वेट लिफ्टिंग या प्रकारात 2000 सालच्या ऑलिम्पिक पदक मिळवले.

एसबीआय बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष-या बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य या होत्या.भारतीय स्टेट बँक या भारतातील सर्वात मोठी बँक आहे.

वायुदलातील पहिल्या महिला वैमानिक-वायू दलातील पहिल्या महिला वैमानिक हरिता देवोल या होत्या.2सप्टेंबर 1994 या दिवशी त्यांनी भारतीय वायुदलातील विमान उडवले.

पहिल्या महिला राज्यपाल-सरोजिनी नायडू यांनी पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले.उत्तर प्रदेश या राज्याच्या त्या राज्यपाल होत्या.

हे आपल्याला आवडेल – महाराष्ट्रातील प्रथम|पहिले व्यक्ति|first person in Maharashtra|पहिले मुख्यमंत्री| 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *