महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे

महाराष्ट्र राज्य हे विषम हवामान असणारे राज्य आहे. आपल्या राज्यात उष्ण-थंड,सम-विषम,दमट-कोरडे असे वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आढळते. Maharashtratil top 10 Thand Havechi Thikane महाराष्ट्राचा खूप मोठा भाग पर्वतीय प्रदेशाने व्यापलेला आहे. या प्रदेशात जसजशी पर्वताची उंची वाढत जाते तसे तापमानात घट होऊन हवामान थंड होत जाते
महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळ्या पर्वत रांगा पसरलेल्या आहेत. सर्वात मोठा असणारा सह्याद्री पर्वत आणि त्या पर्वताच्या पूर्वेकडील भागात पसरलेल्या विविध पर्वत रांगांमध्ये जास्त उंचीच्या भागात खूप कमी प्रमाणात तापमान आढळते. या भागात अशी अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. महाराष्ट्राच्या विविध पर्वतरांगेमधील थंड हवेचे ठिकाणे, त्यांचा जिल्हा आणि पर्वत रांगेचे नाव खालील तक्त्यात देण्यात आले आहे
महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे (जिल्हानिहाय माहिती)
| अनु . क्र. | ठिकाण | जिल्हा | पर्वत रांगेचे नाव |
| 1 | आंबोली | सिंधुदुर्ग | सह्याद्री पर्वत |
| 2 | महाबळेश्वर | सातारा | सह्याद्री पर्वत |
| 3 | पाचगणी | सातारा | सह्याद्री पर्वत |
| 4 | माथेरान | रायगड | सह्याद्री पर्वत |
| 5 | पन्हाळा | कोल्हापूर | पन्हाळ्याचे डोंगर |
| 6 | तोरणमाळ | नंदुरबार | तोरणमाळ डोंगर |
| 7 | चिखलदरा | अमरावती | गाविलगडचे डोंगर |
| 8 | नरनाळा | अकोला | गाविलगडचे डोंगर |
| 9 | म्हैसमाळ | औरंगाबाद | वेरूळच्या टेकड्या |
| 10 | पाल | जळगाव | सातपुडा पर्वत |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
महाबळेश्वर (जि. सातारा) हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि क्षेत्रफळाने मोठे थंड हवेचे ठिकाण आहे. येथील आल्हाददायक हवामानामुळे याला ‘महाराष्ट्राचे नंदनवन’ असेही म्हटले जाते.
चिखलदरा हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण कॉफीच्या मळ्यांसाठी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सान्निध्यासाठी ओळखले जाते.
माथेरान (जि. रायगड). हे एक प्रदूषणमुक्त आणि अतिसंवेदनशील (Eco-sensitive) ठिकाण असून तेथे पर्यावरण रक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या इंधन-वाहनांना बंदी आहे.
लोणावळा आणि खंडाळा ही पुणे जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय आणि प्रमुख थंड हवेची ठिकाणे आहेत. ही दोन्ही ठिकाणे मुंबई-पुणे महामार्गावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेली आहेत.
तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे. हे ठिकाण येथील सीताखाई आणि यशवंत तलावासाठी प्रसिद्ध आहे. (स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न अनेकदा विचारला जातो.)
आंबोली हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो, त्यामुळे पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते.
पन्हाळा हे ऐतिहासिक व थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या ऐतिहासिक आठवणींसाठी पन्हाळगड प्रसिद्ध आहे.
महाबळेश्वर आणि पाचगणी (जि. सातारा) ही ठिकाणे त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखली जातात.
‘पाल’ हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत असलेले एक निसर्गरम्य आणि थंड हवेचे ठिकाण आहे.
पाचगणी (जि. सातारा) येथे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि सलग असे ज्वालामुखीय पठार आहे, ज्याला ‘टेबल लँड’ (Table Land) म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रात आढळणाऱ्या विविध खडकांचे प्रकार जाणून घ्या.