geographic location-भारताचे भौगोलिक स्थान
जगाच्या नकाशातील भारताचे भौगोलिक स्थान- geographic location of India हे आशिया खंडात आहे.आशिया खंडातील प्रमुख देश म्हणून ओळखले जाते.भारत देशाला अतिशय प्राचीन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आहे.
- भारताचे भौगोलिक स्थान
- भारतातील एकूण राज्ये
- भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेश
- भारताच्या प्रमुख सीमारेषा
- भारताच्या शेजारील देश
- भारताच्या सीमेवरील देशाला शेजारी राज्ये
- भारता शेजारील देशांच्या सलग्न सीमेची लांबी
In World geographic location-जगाच्या नकाशात भारताचे भौगोलिक स्थान
भारताचे स्थान-भारताचे जगातील नकाशातील स्थान हे आशिया खंडात आहे.आशिया खंडातील प्रमुख देश म्हणून ओळखले जाते.
पूर्व पश्चिम अंतर–अक्षवृत्तीय विस्तार-८ ४ ‘ २८” उत्तर ते ३७ १७ ‘५३ “ उत्तर रेखावृत्तीय विस्तार- ६८ ७ ‘३३” पूर्व ९७ २४ ‘४७ पूर्व
दक्षिण उत्तर अंतर-भारताचे दक्षिण ते तर हे अंतर ३२१४ किलोमीटर एवढे आहे.
भारताचे क्षेत्रफळ-भारताच्या संपूर्ण भूभागाचे क्षेत्रफळ ३२८७२६३ चौरस किलोमीटर एवढे आहे.
States In India (geographic location of India)-भारतातील एकूण राज्य
| अरुणाचल प्रदेश | बिहार | उत्तर प्रदेश | मध्य प्रदेश |
| नागालँड | कर्नाटक | गोवा | तामिळनाडू |
| आसाम | महाराष्ट्र | छत्तीसगड | हिमाचल प्रदेश |
| पंजाब | केरळ | राजस्थान | त्रिपुरा |
| आंध्र प्रदेश | मिझोराम | झारखंड | .तेलंगाना |
| पश्चिम बंगाल | गुजरात | सिक्किम | उत्तराखंड |
| उडीसा | मेघालय | हरियाणा | मनिपुर |
Union Territories In India (geographic location of India)-भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेश
| अंदमान आणि निकोबार | पांडेचरी | लक्षद्वीप |
| दिल्ली | जम्मू आणि काश्मिर | दमण आणि दीव |
| चदिगड | लडाख | दादरा नगर हवेली |
भारताच्या जलसीमा-भारताच्या जलसीमा किंवा समुद्र किनारा ७५१७ किलोमीटर एवढी आहे.
भारताची भू सीमा-भारताशी भूसीमा किंवा जमिनीचा एकूण बाहेरील भाग हा १५२०० किलोमीटर एवढा लांबीचा आहे.
भारताच्या प्रमुख सीमारेषा
१.मॅकमोहन रेषा-भारत आणि चीन या दोन देशाच्या दरम्यान निश्चित केलेली सीमारेषा म्हणजेच मॅकमोहन रेषा होय. सर हेनरी मॅकमोहन यांनी या दोन देशाच्या या सीमारेषेचा वाद होऊ नये म्हणून ही रेषा निश्चित केलेली आहे.
२.रेंडक्लिफ रेषा-भारत आणि पाकिस्तान दोन देशातील सीमारेषेचे चा वाद होऊ नये म्हणून सन १९४७ मध्ये सर रेंडक्लिफ यांनी ही रेषा आखुन दिलेली आहे.हिलाच रेंडक्लिफ रेषा असे म्हणतात.
भारताच्या शेजारील देश
| पूर्व दिशा | बांगलादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर |
| पश्चिम दिशा | पाकिस्तान,अरबी समुद्र |
| उत्तर दिशा | नेपाळ, भूतान, चीन |
| दक्षिण दिशा | श्रीलंका, पाल्कची समुद्रधूनी, मन्नारचे आखात |
| वायव्य दिशा | अफगानिस्थान |
भारताच्या सीमेवरील देशाला शेजारी राज्ये
| बांगलादेश | पश्चिम बंगाल,आसाम,मेघालय,त्रिपुरा,मिझोराम ही राज्य बांगलादेशाच्या सीमारेषेवर जोडलेली आहेत. |
| म्यानमार | हिमाचल प्रदेश,नागालँड,मनिपुर,मिझोराम ही राज्य मॅनमार व भारत देशाच्या सीमारेषेवर जोडलेली आहेत. |
| चीन | जम्मू आणि काश्मीर,हिमाचल प्रदेश,उत्तराखंड, सिक्किम,अरुणाचल प्रदेश. |
| पाकिस्तान | गुजरात,राजस्थान,पंजाब,जम्मू आणि काश्मिर ही राज्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या सीमारेषेवर जोडलेली आहे. |
| अफगाणिस्तान | जम्मू आणि काश्मिर |
| नेपाळ | उत्तर प्रदेश,उत्तराखंड,बिहार,पश्चिम बंगाल,सिक्किम हि राज्ये नेपाळ आणि भारताच्या सीमेवर जोडलेली आहेत. |
| भूतान | सिक्किम,पश्चिम बंगाल,आसाम,अरुणाचल प्रदेश ही राज्य भूतान आणि भारताच्या सीमेवर जोडलेली आहेत. |
भारता शेजारील देशांच्या सलग्न सीमेची लांबी
| बांगलादेश | ४०९६ किलोमीटर |
| मॅनमार | १४५८ किलोमीटर |
| चीन | ३९१७ किलोमीटर |
| पाकिस्तान | ३३१० किलोमीटर |
| अफगानिस्थान | ८० किलोमीटर |
| नेपाळ | १७५२ किलोमीटर |
| भूतान | ५८७ किलोमीटर |
हे वाचा – भारतातील घटक राज्ये आणि राज्याची राजधानी-वैशिष्ट्ये सन -2022