महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने: प्रश्नसंच (२० प्रश्न)
महाराष्ट्रात संजय गांधी (बोरिवली), ताडोबा, पेंच, नवेगाव, गुगामल (मेळघाट) आणि चांदोली अशी सहा राष्ट्रीय उद्याने आहेत. ही उद्याने राज्याच्या जैवविविधतेचे आणि वन्यजीव संरक्षणाचे महत्त्वाचे केंद्र मानली जातात. MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रश्न संच या घटकावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. उद्यानाचे नाव, जिल्हा, तेथील प्रमुख वन्यजीव आणि स्थापना वर्ष यांची अचूक माहिती असल्यास हे प्रश्न सहज सोडवता येतात.
या प्रश्नसंचात परीक्षाभिमुख बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह दिले आहेत. तुमची तयारी तपासण्यासाठी आणि उजळणीसाठी हा सराव नक्की सोडवा.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने नाव-जिल्हा-स्थापना वर्ष -क्षेत्रफळ संपूर्ण माहिती
प्र. १. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत?
(अ) ४ (ब) ५ (क) ६ (ड) ७
प्र. २. महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?
(अ) ताडोबा-अंधारी (ब) पेंच (क) नवेगाव (ड) चांदोली
प्र. ३. महाराष्ट्रातील सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान कोणते?
(अ) पेंच (ब) गुगामल (क) संजय गांधी (ड) चांदोली
प्र. ४. मुंबई शहरात असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते?
(अ) नवेगाव (ब) संजय गांधी (क) गुगामल (ड) पेंच
प्र. ५. ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
(अ) नागपूर (ब) गडचिरोली (क) चंद्रपूर (ड) भंडारा
प्र. ६. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
(अ) भंडारा (ब) नागपूर (क) चंद्रपूर (ड) गोंदिया
प्र. ७. पेंच राष्ट्रीय उद्यान (महाराष्ट्रातील भाग) कोणत्या जिल्ह्यात आहे?
(अ) नागपूर (ब) वर्धा (क) अमरावती (ड) यवतमाळ
प्र. ८. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
(अ) अकोला (ब) अमरावती (क) बुलढाणा (ड) वाशीम
प्र. ९. चांदोली राष्ट्रीय उद्यान मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आहे?
(अ) सातारा (ब) कोल्हापूर (क) सांगली (ड) पुणे
प्र. १०. कान्हेरी लेणी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहेत?
(अ) ताडोबा-अंधारी (ब) संजय गांधी (क) पेंच (ड) चांदोली
प्र. ११. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे?
(अ) ताडोबा (ब) पेंच (क) सह्याद्री (ड) मेळघाट
प्र. १२. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे?
(अ) सह्याद्री (ब) मेळघाट (क) बोर (ड) पेंच
प्र. १३. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या सरोवरासाठी प्रसिद्ध आहे?
(अ) कोयना जलाशय (ब) लोणार सरोवर (क) नवेगाव सरोवर (ड) वारणा जलाशय
प्र. १४. पेंच राष्ट्रीय उद्यानाचे अधिकृत नाव काय आहे?
(अ) राजीव गांधी (ब) इंदिरा प्रियदर्शनी (क) जवाहरलाल नेहरू (ड) महात्मा गांधी
प्र. १५. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(अ) १९७५ (ब) १९८३ (क) १९८७ (ड) १९५५
प्र. १६. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सुरुवात कोणत्या नावाने झाली?
(अ) बोरिवली राष्ट्रीय उद्यान (ब) कान्हेरी उद्यान (क) तुंगारेश्वर उद्यान (ड) ठाणे उद्यान
प्र. १७. १९७५ मध्ये स्थापन झालेली दोन राष्ट्रीय उद्याने कोणती?
(अ) ताडोबा व पेंच (ब) गुगामल व चांदोली (क) नवेगाव व पेंच (ड) संजय गांधी व नवेगाव
प्र. १८. चांदोली राष्ट्रीय उद्यानात आढळणारा महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?
(अ) माळढोक (ब) शेकरू (क) काळवीट (ड) रोहित
प्र. १९. राष्ट्रीय उद्यानांची तरतूद कोणत्या कायद्यात आहे?
(अ) वन अधिनियम, १९२७ (ब) पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ (क) जैवविविधता कायदा, २००२ (ड) वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२
प्र. २०. चांदोली राष्ट्रीय उद्यानाजवळ कोणता जलाशय आहे?
(अ) वारणा (ब) कोयना (क) जायकवाडी (ड) भातस
उत्तरसूची
प्र. उत्तर प्र. उत्तर
१ (क) ६ ११ (ड) मेळघाट
२ (अ) ताडोबा-अंधारी १२ (अ) सह्याद्री
३ (ड) चांदोली १३ (क) नवेगाव सरोवर
४ (ब) संजय गांधी १४ (ब) इंदिरा प्रियदर्शनी
५ (क) चंद्रपूर १५ (ड) १९५५
६ (ड) गोंदिया १६ (अ) बोरिवली राष्ट्रीय उद्यान
७ (अ) नागपूर १७ (क) नवेगाव व पेंच
८ (ब) अमरावती १८ (ब) शेकरू
९ (क) सांगली १९ (ड) वन्यजीव (संरक्षण)अधिनियम, १९७२
१० (ब) संजय गांधी २० (अ) वारणा
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने-सराव प्रश्न संच PDF डाउनलोड करा.