रिलायन्स जिओ ची फाईव्ह जी सेवा दिवाळीपासून सुरू होणार Current Affairs 29 August
दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जिओची फाईव्ह जी सेवा दिवाळीपासून देशातील चार महानगरात सुरू होईल Current Affairs 29 August अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज अंबानी यांनी केली.रिलायन्स कंपनीच्या 45 व्या वार्षिक सर्व साधारण सभेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्याकडे रिलायन्स मधील डिजिटल बिजनेसची जबाबदारी आहे.मुलगी ईशा अंबानी कडे रिटेल व्यापाराची जबाबदारी देण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांचे सर्वात लहान पूत्र अनंत अंबानी आता न्यू एनर्जी आणि इतर उद्योगधंदे सांभाळतील.
जगातील सर्वात शक्तिशाली बँक फेड आपले व्याजदर वाढवण्यावर ठाम.

अमेरिकेमधील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व ही जगातील सर्वात शक्तिशाली बँक आहे.या बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी महागाई दराबाबत आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदर वाढवण्याची कठोर भूमिका घेतली आहे.त्याचे परिणाम संपूर्ण जगातील जागतिक चलनावर आणि बाजारावर पाहायला मिळाले.जगातील अनेक देशाच्या प्रमुख भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक प्रतिक्रिया दिसून आल्या.फेडरल रिझर्व सिस्टिम या नावाने प्रसिद्ध असलेल्या समूहात बारा फेडरल रिझर्व बँका आहेत.
प्रसिद्ध सिनेमा नट रणवीर सिंह यांची चौकशी
भारतीय सिने क्षेत्रातील अभिनेता रणवीर सिंग याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.
मागील काही दिवसापूर्वी केलेल्या एका मासिकासाठी नग्न फोटोग्राफी केली होती.
त्या प्रकरणी त्याच्यावर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात दिनांक 26 जुलै 2022 रोजी गुन्हा दाखल आहे.
त्याने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याच्या या कृत्याबद्दल अनेक नट नट्यानी त्याचे समर्थन केले आहे.
प्रशिदध फोटोग्राफर आशीष शाह यांनी त्याचे फोटोशूट केले होते. पेपर नावाच्या मासिकासाठी त्याने हे फोटो काढले होते .
मागील महिन्यातील चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.