भारतातील सर्वात उंच टॉवर जमीन दोस्त.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे अवैधरित्या बांधलेले भारतातील सर्वात उंच दोन टॉवर सरकारने पाडले आहेत.या दोन्हीही इमारतीचे बांधकाम सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवले होते.Current Affairs 28 August सुप्रीम कोर्टाने दोन्हीही इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून 3700 किलो फोटके वापरून इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या.
पहिली इमारत 32 मजली तर दुसरी इमारत 29 मजली होती.दोन्हीही इमारतीमध्ये 900 फ्लॅट होते.
सर्व फ्लॅट धारकांना व्याजासह त्यांच्या घराची किंमत परत मिळेल.
एशिया कपच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले.Current Affairs 28 August
दुबई येथे सुरू असलेल्या एशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले.
तीन विकेट घेऊन 33 रन मिळवणारा भारतीय खेळाडू हार्दिक पंड्या याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.या स्पर्धेत भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वात तर पाकिस्तान संघ बाबर आझम याच्या नेतृत्वात खेळत आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड ऑक्टोबर मध्ये होणार.
देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सीडब्ल्यूसी म्हणजेच काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाची निवडणुक 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल.2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता.
त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी होते. तदनंतर त्यांनी राजीनामा दिला.तेव्हापासून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्याकडे जबाबदारी आहे.