Current Affairs Date-26 August 2022
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा पक्षाचा राजीनामा.
राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. (Current Affairs 26 August) काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होत त्यांनी राजीनामा दिला.
गेली 50 वर्षे ते काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. गुलाम नबी आझाद यांनी 1973 पासून काँग्रेस पक्षाच्या कामाला सुरुवात केली.ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता असा त्यांचा राजकीय प्रवास होता. ऑल इंडिया युथ काँग्रेसचे अध्यक्ष,लोकसभेचे खासदार,राज्यसभेचे खासदार,जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री,विविध खात्याचे केंद्रीय मंत्री,काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेता अशा अनेक पदावर काम केले आहे.
फीफाने भारताचे निलंबन हटवले.Current Affairs 26 August
फीफाने मागील 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय फुटबॉल फेडरेशन वर निलंबनाची कार्यवाही केली होती. निलंबनाची कार्यवाही आज रद्द करण्यात आली.
17 ते 30 ऑक्टोबर या दरम्यान होणाऱ्या सतरा वर्षाखाली जागतिक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे.आता ही स्पर्धा ठरलेल्या वेळी पार पडेल.
विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील 21 विद्यापीठांना केले बोगस घोषित.Current Affairs 26 August
राष्ट्रीय स्तरावरील विद्यापिठाना अनुदान देणारी संस्था UGC ने भारतातील विविध 21 विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे.त्यात अनेक मान्यता प्राप्त विद्यापीठे आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 1956 च्या कायद्यातील अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल ही कार्यवाही करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठाचा यात समावेश आहे.
महाराष्ट्रात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती
नुकताच सत्तेबाहेर झालेला शिवसेना पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या एका गटाने निवडणूक पूर्व युती केली आहे.
संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या एका गटाचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी ही युती केली आहे.
संभाजी ब्रिगेड या पक्ष संघटनेचे अनेक गट आहेत.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताची जोडी दाखल.
टोक्यो येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी च्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने धडक मारली आहे.
या स्पर्धेत भारताचे एक पदक निश्चित झाले आहे.जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीचा त्यांनी पराभव केला.
स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक दैनिक घडामोडी वाचण्यासाठी येथे भेट द्या.