महाराष्ट्रातील बेटे
महाराष्ट्रातील बेटे Maharashtratil Bete

बेट म्हणजे काय ?
समुद्राच्या किनारपट्टीवर किंवा आतमध्ये पाण्याने वेढलेल्या जमिनीच्या भागास बेट असे म्हणतात. महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर नैसर्गिकरीत्या अनेक बेटे तयार झाली आहेत. Maharashtratil Bete त्यातील काही बेटे समुद्रकिनाऱ्यावर आहेत.काही बेटे समुद्रकिनाऱ्यापासून दूर समुद्रात आहेत.समुद्रकिनाऱ्यावरील काही बेटावर मोठमोठी शहरे वसलेली आहेत.काही बेटावर पुरातन काळात किल्ले सुद्धा उभारलेले आहेत. बेटावर वसलेल्या शहरांपैकी मुंबई शहर हे जग प्रसिद्ध आहे.कुरटे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे.समुद्रात असणाऱ्या जंजिरा नावाच्या बेटावर जंजिरा किल्ला आजही पाहावयास मिळतो.घारापुरी बेटावर प्राचीन लेणी कोरलेल्या आहेत.
बेटे आणि त्यांचा जिल्हा Maharashtratil Bete
अनुक्रमांक | बेटाचे नाव | जिल्हा |
१ | घारापुरी | रायगड |
२ | उंदेरी | रायगड |
३ | खांदेरी | रायगड |
४ | कासा | रायगड |
५ | कुलाबा | रायगड |
६ | जंजिरा | रायगड |
७ | कुरटे | सिंधुदुर्ग |
८ | मुंबई | मुंबई शहर व मुंबई उपनगर |
९ | साष्टी | मुंबई शहर व मुंबई उपनगर |
१० | मढ | मुंबई शहर व मुंबई उपनगर |
भारताची प्राकृतिक रचना जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.