परिमिति

परिमिति

कोणत्याही आकृतीला आपला स्वतःचा आकार असतो.लांबी रुंदी उंची असते. कोणतीही आकृतीही सर्व बाजूंनी बंद झाल्यावर त्या आकृतीला आपला स्वतःचा आकार प्राप्त होतो.जी आकृती सर्व बाजूने बंद नसते तिला आकार प्राप्त होत नाही.स्वतंत्र आकार असलेल्या आकृतीची परिमिती कशी काढावी ? हे खालील भागात स्पष्ट केले आहे.

परीमिती म्हणजे काय ?

कोणत्याही आकाराच्या परंतु बंद असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची केलेली बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती होय.उदाहरणार्थ एखाद्या शेताला कुंपण करायचे असेल तर एकूण किती लांबीची तार लागेल हे शोधणे म्हणजेच त्या शेताची परिमिती काढणे. शेताच्या आतील भाग किती आकाराचा आहे याचा परिमितीशी काहीही संबंध नाही. बाहेरील सर्व बाजू त्या कमी लांब असतील,सरळ रेषेत असतील,वाकड्या रेषेत असतील.त्या सर्व बाजूंची लांबी मोजणे म्हणजेच परिमिती होय.याचाच अर्थ त्या आकृतीच्या सर्व बाजूची लांबी एकत्रितपणे मोजणे ही परीमिती असते.

त्रिकोणाची परिमिती

तीन बाजू असलेल्या बंद आकृतीला त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाला कमी,जास्त किंवा सारख्या आकाराच्या तीन बाजू असतात.त्या तीनही बाजूच्या लांबीची एकत्रितपणे केलेली बेरीज म्हणजे त्रिकोणाची परीमिती Perimeter parimiti होय.
त्रिकोणाची परीमिती = पहिली बाजू + दूसरी बाजू + तिसरी बाजू

Perimeter parimiti

अपूर्णांकबद्दल संपूर्ण माहिती येथे जानुन घ्या.

चौरसाची परिमीती

चार बाजूने बंद असलेल्या आकृतीला चौरस असे संबोधले जाते.चौरसाच्या चारही बाजू या समान आकाराच्या लांबीच्या असतात.सर्व समान बाजूंच्या लांबीची बेरीज ही चौरसाची परिमिती Perimeter parimiti असते.
चौरसाची परीमिती = 4 × एका बाजूची लांबी.

Perimeter parimiti

आयताची परीमिती Perimeter of rectangle ?

चौरसाप्रमाणेच आयत हा चार बाजूने तयार झालेला असतो. परंतु आयताच्या चारही बाजू समान लांबीच्या नसतात.समोरासमोरील दोन बाजू समान लांबीच्या उर्वरित दोन बाजू समान लांबीच्या असतात.
आयताची परीमिती = 2 × लांबी + 2× रुंदी

Perimeter parimiti

बहुभुजाकृतीची परिमिती-Perimeter of Polygon shape

एखाद्या आकृतीला चार बाजूपेक्षा जास्त बाजू असतात.त्या आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती होय.उदाहरणार्थ. षटकोन,अष्टकोन यांची परिमिति म्हणजे आकृत्यांच्या सहा बाजू किंवा आठ बाजू यांची बेरीज होय.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs – Perimeter in Marathi)

१. परिमिती म्हणजे काय?

उत्तर -कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या सर्व बाह्य (बाहेरच्या) बाजूंच्या लांबीच्या एकूण बेरजेला ‘परिमिती’ (Perimeter) असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, आकृतीच्या कडेची (सीमेची) एकूण लांबी म्हणजे परिमिती होय.

2. आयताची परिमिती काढण्याचे सूत्र काय आहे?

उत्तर: आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. त्यामुळे आयताची परिमिती काढण्याचे सूत्र २ × (लांबी + रुंदी) असे आहे. (Perimeter = 2 × (Length + Breadth)).

३. चौरसाची परिमिती कशी काढतात?

उत्तर: चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. त्यामुळे चौरसाची परिमिती काढण्यासाठी एका बाजूला ४ ने गुणले जाते. सूत्र: ४ × बाजूची लांबी (4 × Side).

४. त्रिकोणाची परिमिती काढण्याचे सूत्र काय आहे?

उत्तर: त्रिकोणाची परिमिती काढण्यासाठी त्याच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज केली जाते. सूत्र: पहिली बाजू + दुसरी बाजू + तिसरी बाजू (a + b + c). जर समभुज त्रिकोण असेल, तर सूत्र ३ × बाजू असे असते.

५. परिमिती आणि क्षेत्रफळ यातील मुख्य फरक काय आहे?

उत्तर: ‘परिमिती’ म्हणजे आकृतीच्या सीमेची (कडांची) एकूण लांबी, तर ‘क्षेत्रफळ’ (Area) म्हणजे त्या आकृतीने आतमध्ये व्यापलेली एकूण जागा (पृष्ठभाग) होय. परिमिती मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये मोजतात, तर क्षेत्रफळ चौरस मीटर (Sq.m) मध्ये मोजतात.

६. वर्तुळाच्या परिमितीला काय म्हणतात आणि त्याचे सूत्र काय?

उत्तर: वर्तुळाच्या परिमितीला ‘परिघ’ (Circumference) असे म्हणतात. वर्तुळाचा परिघ काढण्याचे सूत्र २πr (2 × π × त्रिज्या) किंवा πd (π × व्यास) असे आहे. (येथे π ची किंमत साधारणपणे २२/७ किंवा ३.१४ घेतली जाते).

७. अनियमित आकाराच्या आकृतीची (Irregular Shape) परिमिती कशी काढावी?

उत्तर: आकृतीचा आकार कसाही असला (उदा. पंचकोन, षटकोन किंवा वाकडीतिकडी आकृती), तरी तिची परिमिती काढण्यासाठी त्या आकृतीच्या बाहेरच्या सर्व बाजूंच्या लांबीची फक्त बेरीज करावी लागते.

८. परिमिती मोजण्याचे एकक (Unit) कोणते असते?

उत्तर: परिमिती ही एक प्रकारची लांबी (Length) असते. त्यामुळे परिमिती मोजण्याचे एकक सेंटीमीटर (cm), मीटर (m), किलोमीटर (km), इंच किंवा फूट असे असते.

९. जर एका चौरसाची बाजू ५ सेमी असेल, तर त्याची परिमिती किती असेल?

उत्तर: चौरसाची परिमिती = ४ × बाजू. त्यामुळे ४ × ५ = २० सेमी. म्हणजेच त्या चौरसाची परिमिती २० सेंटीमीटर असेल.

१०. दैनंदिन जीवनात परिमितीचा उपयोग कुठे होतो?

उत्तर: दैनंदिन जीवनात परिमितीचा खूप उपयोग होतो. उदा. शेताला किंवा बागेला कुंपण घालण्यासाठी किती तार लागेल हे ठरवण्यासाठी, फोटोला फ्रेम बनवण्यासाठी किंवा साडीला लेस (Border) लावण्यासाठी परिमिती मोजली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

majhishala.in