महाराष्ट्र राज्य माहिती: २० सराव प्रश्न (उत्तरांसह)

महाराष्ट्र राज्य माहिती सराव प्रश्न हा घटक MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारला जातो. या पोस्टमध्ये महाराष्ट्राची स्थापना, सीमा, विस्तार आणि ६ प्रशासकीय विभाग यावर आधारित २० बहुपर्यायी प्रश्न स्पष्टीकरणासह दिले आहेत. आधी प्रश्न स्वतः सोडवा, मग उत्तरसूचीशी पडताळणी करा.

महाराष्ट्र राज्य संपूर्ण माहिती अभ्यासा.

महाराष्ट्र राज्य माहिती सराव प्रश्न (२० MCQ)

१. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
(अ) १ ऑगस्ट १९४७ (ब) १ मे १९६० (क) २६ जानेवारी १९५० (ड) १ नोव्हेंबर १९५६

२. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार झाली?
(अ) राज्य पुनर्रचना कायदा १९५६ (ब) भारत सरकार कायदा १९३५ (क) मुंबई पुनर्रचना कायदा १९६० (ड) भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७

३. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
(अ) वसंतराव नाईक (ब) शंकरराव चव्हाण (क) बाळासाहेब खेर (ड) यशवंतराव चव्हाण

४. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
(अ) पहिला (ब) दुसरा (क) तिसरा (ड) चौथा

५. लोकसंख्येनुसार (जनगणना २०११) महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
(अ) पहिला (ब) दुसरा (क) तिसरा (ड) पाचवा

६. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ सुमारे किती आहे?
(अ) १,९६,०२४ चौ. किमी (ब) २,४०,९२८ चौ. किमी (क) ३,०७,७१३ चौ. किमी (ड) ३,४२,२३९ चौ. किमी

७. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार कोणता?
(अ) ६८°३६’ पूर्व ते ७८°५४’ पूर्व (ब) ७२°३६’ पूर्व ते ८०°५४’ पूर्व (क) ७५°०६’ पूर्व ते ८५°५४’ पूर्व (ड) ७०°०६’ पूर्व ते ७८°०६’ पूर्व

८. महाराष्ट्राच्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी सुमारे किती आहे?
(अ) ४५० किमी (ब) ५५० किमी (क) ६५० किमी (ड) ७२० किमी

९. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाही?
(अ) गुजरात (ब) राजस्थान (क) छत्तीसगड (ड) कर्नाटक

१०. महाराष्ट्राच्या नैर्ऋत्येस (दक्षिण-पश्चिमेस) कोणते राज्य आहे?
(अ) गोवा (ब) केरळ (क) तेलंगणा (ड) तमिळनाडू

११. महाराष्ट्राच्या सीमा एकूण किती राज्यांना भिडलेल्या आहेत?
(अ) ४ (ब) ५ (क) ६ (ड) ७

१२. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा कोणता, जो ठाणे जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला?
(अ) पालघर (ब) गोंदिया (क) वाशीम (ड) हिंगोली

१३. महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत?
(अ) ३३ (ब) ३४ (क) ३५ (ड) ३६

१४. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
(अ) ४ (ब) ५ (क) ६ (ड) ८

१५. सर्वाधिक जिल्हे असलेला प्रशासकीय विभाग कोणता?
(अ) कोकण (ब) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (क) पुणे (ड) नागपूर

१६. कोल्हापूर जिल्हा कोणत्या विभागात येतो?
(अ) कोकण (ब) नाशिक (क) पुणे (ड) छत्रपती संभाजीनगर

१७. गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?
(अ) अमरावती (ब) नागपूर (क) नाशिक (ड) छत्रपती संभाजीनगर

१८. जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?
(अ) पुणे (ब) अमरावती (क) नाशिक (ड) कोकण

१९. यवतमाळ जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?
(अ) नागपूर (ब) अमरावती (क) छत्रपती संभाजीनगर (ड) पुणे

२०. खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण विभागात येत नाही?
(अ) रायगड (ब) पालघर (क) सातारा (ड) सिंधुदुर्ग


उत्तरसूची

उत्तरसूची येथे पहा.
क्र.उत्तर
१(ब)
२(क)
३(ड)
४(क)
५(ब)
६(क)
७(ब)
८(ड)
९(ब)
१०(अ)
११(क)
१२(अ)
१३(ड)
१४(क)
१५(ब)
१६(क)
१७(ब)
१८(क)
१९(ब)
२०(क)

स्पष्टीकरण

क्र.       स्पष्टीकरण

१        (१ मे १९६० रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

२       मुंबई राज्याची विभागणी होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये निर्माण झाली.

३        यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री.

४        राजस्थान, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र तिसरा.

५        उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक.

६        सुमारे ३,०७,७१३ चौ. किमी.

७        ७२°३६’ पूर्व ते ८०°५४’ पूर्व (अक्षवृत्तीय विस्तार: सुमारे १५°३६’ उत्तर ते २२°०२’ उत्तर).

८        कोकण किनारपट्टी सुमारे ७२० किमी.

९        राजस्थानची सीमा महाराष्ट्राला लागत नाही.

१०     सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा लागून आहे.

११     गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा (सोबत केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेली व दमण-दीव).

१२     पालघर जिल्ह्याची निर्मिती १ ऑगस्ट २०१४ रोजी झाली.

१३     एकूण ३६ जिल्हे.

१४     कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर.

१५     या विभागात ८ जिल्हे आहेत.

१६     पुणे विभाग: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

१७     (नागपूर विभाग: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

१८     नाशिक विभाग: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर.

१९     अमरावती विभाग: अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ.

२०     सातारा हा पुणे विभागात येतो. कोकण विभागात ७ जिल्हे आहेत: मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.


महाराष्ट्र राज्य माहिती ऑनलाइन टेस्ट चालू करा .

महाराष्ट्र राज्य माहिती: २० सराव प्रश्न (उत्तरांसह) pdf डाउनलोड करा .


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

majhishala.in